अंबादास दानवे
Appearance
अंबादास एकनाथराव दानवे हे एक मराठी राजकारणी आहेत. ते शिवसेनेचे नेते असून महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते.
- ते औरंगाबाद - जालना स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत.[१][२]
कारकीर्द
[संपादन]त्यांचे वडील एकनाथराव दानवे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी करत होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) व भारतीय जनता पक्ष येथून झाली.
२००० मध्ये, औरंगाबाद शहरातील अजबनगरमधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून अंबादास दानवे यांनी महानगरपालिका निवडणूक जिंकली. २०१९ मध्ये, ते औरंगाबाद - जालना स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले.[३]
भूषवलेली पदे
[संपादन]| वर्ष | पद | नोंदी |
|---|---|---|
| २००० | औरंगाबाद महानगरपालिकेचे नगरसेवक | औरंगाबाद शहरातील अजबनगर येथून शिवसेनेचे उमेदवार, सदस्य म्हणून निवडून आले.[४] |
| २०११ | औरंगाबाद जिल्हा प्रमुख | या संघटनात्मक पदावर नियुक्ती.[४] |
| २०१९ | महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य | औरंगाबाद - जालना स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून निवडून आले.[२] |
संदर्भ
[संपादन]- ↑ "औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणुकीत अंबादास दानवे विजयी".
- 1 2 "Shiv Sena candidate Ambadas Danve wins Maharashtra Legislative Council election". India Today. Press Trust of India. 22 August 2019. 20 September 2019 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव "MLCAUG" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ↑ Kulkarni, Dhaval (Aug 10, 2022). "Ambadas Danve – A grassroots leader from Aurangabad and the voice of opposition in council". हिंदुस्तान टाइम्स.
- 1 2 "अंबादास दानवे...नगरसेवक, दीड दशक जिल्हाप्रमुख ते आमदार".