Jump to content

अंतरा नंदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंतरा नंदी

अंतरा नंदी
आयुष्य
जन्म ११ डिसेंबर, १९९९ (1999-12-11) (वय: २४)
जन्म स्थान सिबसागर, आसाम
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
भाषा आसामी
पारिवारिक माहिती
आई जुई नंदी
वडील अनिमेश नंदी
नातेवाईक अंकिता नंदी (बहीण)
संगीत साधना
गायन प्रकार शास्त्रीय संगीत, चित्रपट संगीत, पाश्चात्य संगीत
संगीत कारकीर्द
पेशा गायिका

अंतरा नंदी ही एक आसाममधील भारतीय पार्श्वगायिका आहे. झी टीव्हीवर प्रसारित झालेल्या संगीत प्रतिभा आणि वास्तव प्रदर्शनी 'सा रे ग मा प ल'इल चॅम्प्स -२००९' मधील अंतिम फेरी गाठून त्यात ती तिसऱ्या क्रमांकावर निवडून आली.[१][२]

प्रारंभिक जीवन आणि कारकीर्द

[संपादन]
२०१२ मध्ये जिम अंकन डेकासोबत अंतरा नंदी (उजवीकडे)

अंतरा नंदी चा जन्म दिनांक ११ डिसेंबर १९९९ रोजी आसाम मधील सिबसागर येथे अनिमेश आणि जुई नंदी यांच्या पोटी झाला. तिला अंकिता नावाची एक बहीण देखील असून काही गाणी या दोघींना जोडीने गायली आहेत. अंतराचे शालेय शिक्षण 'दिल्ली पब्लिक स्कूल, रुबी पार्क, कोलकाता' येथून पूर्ण केले आणि आता सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात मास कम्युनिकेशन चे शिक्षण घेत आहे. तिने वयाच्या ५व्या वर्षी पद्मश्री उस्ताद राशीद खान यांच्या हातून भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. नंतर ती 'आयटीसी संगीत संशोधन अकादमी'मध्ये दाखल झाली. इ.स. २०१३ मध्ये अंतरा ए.आर. रहमान द्वारा स्थापित 'केएम म्युझिक कंझर्व्हेटरी'मध्ये सामील झाली. जिथे तिने पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिने उल्लास आणि विविध स्तरावरील इतर आंतरशालेय संगीत स्पर्धेत विजेते पद प्राप्त केले आहे.[३][४]

अंतराने 'या देवी' गाणे लिहिले आणि त्याला संगीत देखील दिले. तिच्या या पहिल्याच रचनेला "दिल्ली शॉर्ट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल-15" मध्ये "सर्वोत्कृष्ट संगीत – म्युझिक व्हिडिओ" चा पुरस्कार मिळाला.[५][६] तिला २०१३ मध्ये सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका श्रेणीतील 'रामधेनु व्ह्यूअर्स चॉईस अवॉर्ड्स'साठी नामांकन मिळाले होते. ती 'स्टार वॉर्स अवॉर्ड २०१२'ची देखील प्राप्तकर्ता आहे, जो ड्रीम कॅचर्स, सिंगापूर ने प्रदान केला होता. तसेच तिला २०१४ मध्ये 'यंग अचिव्हर अवॉर्ड' इन्टिग्रेटेड कौन्सिल फॉर सोशल-इकॉनॉमिक प्रोग्रेस, कोलकाता द्वारे प्रदान करण्यात आला. तिने सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र – भारत सरकार (CCRT) येथे आपले कौशल्य सिद्ध केले होते. प्रतिष्ठित दरबार हॉल, कोलकाता येथे आपली गायकी सादर करणारी ती सर्वात तरुण बंगाली गायिका आहे.[७]

अंतराने वयाच्या ९व्या वर्षी कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये तिचा पहिला मोठा सार्वजनिक परफॉर्मन्स दिला आणि २०१० मध्ये तिचा पहिला अल्बम 'ऐ जिबोन नोहोइ झुना बोंधू' (हे जीवन नाहीये माझ्या दोस्ता) (एक आसामी अल्बम) रिलीज केला. या अलबम साठी तिला अलका याज्ञिक , कविता कृष्णमूर्ती, पुलक बॅनर्जी, देबोजित साहा, लुना भराली दास आणि देबाजीत चौधरी यांसारख्या प्रसिद्ध गायकांनी तिने सहकार्य केले. तिचा दुसरा अल्बम 'एसो मातोह लक्की देवी'[८] (एक बंगाली भक्ती अल्बम) बॉलीवूड पार्श्वगायक राघव चॅटर्जी सह कोलकाता येथे रिलीज झाल्यानंतर ३ आठवड्यांच्या आत टॉप ४ स्थानावर पोहोचला. तिने इतर अनेक सहयोगी अल्बममध्ये गाणी गायली होती. कॉन्सर्टमध्ये अलाइव्ह-इंडिया सारख्या काही प्रतिष्ठित कार्यक्रमांसह ती देशभरात परफॉर्म करत होती. अनेक कॉलेज शो आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये शो देखील केलेत.[९]

इ.स. २००९ मध्ये, अंतराची निवड 'सा रे ग मा प लिटिल चॅम्प्स 2009', झी टीव्ही द्वारे आयोजित संगीत वास्तव प्रदर्शनी आणि टॅलेंट शोसाठी झाली होती, जी तिच्या आयुष्यातील एक मोठी पायरी ठरली.[१०][११]

इ.स. २०१३ मध्ये, अंतराने हेंगुल थिएटरसाठी 'पोलीस बाबू' आणि 'नाजानू' सारखे हिट गाणे गायले. नाजानू ने २०१३ मध्ये रामधेनू व्ह्यूअर्स चॉईस अवॉर्ड जिंकला. त्याच वर्षी, तिने टाइम्स म्युझिक, मुंबई या बॅनरखाली डॉ. बिक्रम बोरकोटोकी यांची अर्ध शास्त्रीय रचना असलेल्या "झारोडी पुवा" या आसामी अल्बममध्ये तिने तिचा आवाज दिला.[१२] तिने स्टार आनंदा, ईटीव्ही बांगला आणि इतर चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या विविध बांगला टीव्ही मालिकांसाठी अनेक थीम आणि शीर्षक गीते रेकॉर्ड केली होती.

अल्बम आणि टीव्ही मालिकांव्यतिरिक्त, अंतराने काही प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. तिने 'खेल – द गेम' या आसामी चित्रपटासाठी ओपनिंग आयटम सॉंग गायले होते. २०१७ मध्ये, तिने बंगाली चित्रपट "किचुता सोमोय" आणि हिट आसामी गाणे "बिंदास" साठी रेकॉर्ड केले.

२०१२ मध्ये अंतराने आसामी संगीतकार जिम अंकन डेका यांच्यासोबत दिल्ली सामूहिक बलात्काराच्या घटनेवर आधारित महिलांवरील हिंसेविरुद्धच्या मोहिमेसाठी सहकार्य केले. आसामी गायिका क्वीन हजारिका आणि पार्श्वगायिका ऋत्विका भट्टाचार्य यांच्यासमवेत या जोडीने 'आवाज - स्पीक अप अगेंस्ट सेक्शुअल व्हायोलंस' हा संगीत व्हिडिओ रिलीज केला, जिथे अंतराने बाल लैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. हे गाणे बेंगळुरूस्थित ईस्टर्न फेअर म्युझिक फाऊंडेशनने तयार केले असून व्हिडिओचे दिग्दर्शन परमिता बोराह यांनी केले आहे. या व्हिडिओने विविध संगीत आणि चित्रपट महोत्सवांमध्ये अनेक पुरस्कार जिंकले.[१३]

२०१५ मध्ये, अंतराने तिचा पहिला आसामी संगीत व्हिडिओ 'आकाक्सोक सुबो खोजो' रिलीज केला,[१४] जिम अंकन डेका यांनी संगीतबद्ध केलेले गाणे 'चाय ट्युन्स म्युझिक' व्हिडिओ मालिकेतील ती दुसरी होती.[१५]

ऑक्टोबर २०१५ मध्ये, अंतराने तिचा व्हिडिओ "या देवी",[१६] हे गाणे रिलीज केले जे तिने स्वतः संगीतबद्ध केले आणि गायले देखील आहे.[१७] या गाण्याने दिल्ली शॉर्ट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'15 मध्ये म्युझिक व्हिडिओ प्रकारात सर्वोत्कृष्ट संगीताचा चौथा पुरस्कार पटकावला.[१८] आणि मुंबई शॉर्ट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल - ज्युरी मेन्शन 2015 मध्ये संगीत श्रेणीमध्ये देखील जिंकली. तिचे नवीन एकल गीत "दोहाई" डिसेंबर २०१५ मध्ये रिलीज झाले जे बांग्लादेशी लोकांचे हिंदुस्थानी शास्त्रीय तराना यांच्या सह संयोजन आहे.[१९]

अंतराने भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध लाइव्ह शोमध्ये परफॉर्म केले आहे.[२०]

अंतराने तिची बहीण अंकिता नंदी सोबत प्रयोग केले होते, कप म्युझिक आणि क्लॅप म्युझिक आणि त्यांची दोन गाणी पिंगा आणि हम्मा हम्मा 2016 मध्ये सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.[२१][२२]

"जा उड जा रे" हे अंतराने ऑगस्ट २०१७ मध्ये रिलीज केलेले एक आधुनिक गाणे आहे. हे गाणे अंतराने ती शाळेत असताना लिहिले होते. तिने हे गाणे तयार केले आणि संगीताची व्यवस्था प्रतिभावान अंबर दास यांनी केली.[२३]

कारकीर्द

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
वर्ष चित्रपट गाणे सह-गायक संगीत दिग्दर्शक संदर्भ
2015 खेल - द गेम निक्षती जोतो रोंगे सोलो जयंता पाठक [२४]

डिस्कोग्राफी

[संपादन]
वर्ष अल्बम भाषा संदर्भ
२०१० ई जि बोन नोहोई क्सुना बंधु आसामी [२५]
२०११ एसो मातोह लाखी देवी बंगाली [२६]
२०१३ तुमी आहिबा बुली आसामी [२७]
२०२० गौरी एलो बंगाली
२०२० आयी रे बदरा मैथिली
२०२० वुई विल बी ओके - कोरोना गाणे हिंदी
२०२० पुराणो शेई डीनेर कोथा बंगाली

एकेरी गायन

[संपादन]
 • आवाज - स्पीक अप अगेंस्ट सेक्शुअल व्हायोलंस (२०१२) [२८]
 • पोलीस बाबू (२०१३) [२९]
 • नजानू (२०१३) [३०]
 • आकाझोक सुबो खोजो (2015) [१४]
 • मोह मोह के धागे (कव्हर) (२०१५) [३१]

संगीत व्हिडिओ

[संपादन]
 • आवाज - स्पीक अप अगेंस्ट सेक्शुअल व्हायोलंस (2012) [३२]
 • नजानू (२०१३) [३३]
 • आकाझोक सुबो खोजो (2015)[१४]
 • एन्नोडू नी इरुंधाल (कव्हर) (२०१५) [३४]
 • या देवी [३५][३६]
 • दोहाई - एक फ्यूजन [३७]
 • जा उड जा रे - अंतारा यांनी लिहिलेले आणि संगीतबद्ध केले गीत.[२३]

पुरस्कार आणि नामांकन

[संपादन]
वर्ष पुरस्कार श्रेणी काम परिणाम
2009 झी सा रे ग मा पा (लिल चॅम्प्स) सर्वोत्कृष्ट गायक रिअॅलिटी टीव्ही शो टॉप 3 मुली
2013 संगीत स्टार वॉर्स (सिंगापूर) सर्वोत्कृष्ट गायक रॉक (इंग्रजी) विजेती
2015 दिल्ली आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव- 2015 सर्वोत्तम संगीत फ्यूजन विजेती
2015 मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव-2015 सर्वोत्कृष्ट संगीत - ज्युरी फ्यूजन विजेती

संदर्भ

[संपादन]
 1. ^ Antara Nandy – the teen sensation of Assam, OKNorthEast.com
 2. ^ Antara Nandy gives a dazzling performance Archived 15 July 2015 at the Wayback Machine., Zee TV
 3. ^ Antara Nandy- and sang the little bird!, Friedeye.com
 4. ^ Song of the soul, The Telegraph (Calcutta)
 5. ^ "Archived copy". 18 November 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 November 2015 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link), " Miniboxoffice.com"
 6. ^ [१] Archived 2015-11-20 at the Wayback Machine., "Thestatesman.com"
 7. ^ Antara Nandy, Meetkalakar.com
 8. ^ Eso Matoh Lakkhi Devi, YouTube
 9. ^ It's time for folk music with Antara Nandy and Dipannita Acharya, Daily News and Analysis
 10. ^ Calcutta champs, The Telegraph (Calcutta)
 11. ^ Antara Nandy – SA Re Ga Ma Pa Little Champs contestant, Assam.org
 12. ^ [२] Archived 2021-10-15 at the Wayback Machine.,Timesmusic.com
 13. ^ Assamese musician wins Bronze, Assamtimes.org
 14. ^ a b c Aakaxok Subo Khojo ,youtube.com
 15. ^ Aakaxok Subo Khojo – the second from Chaitunes series, Musicmalt.com
 16. ^ Ya Devi , YouTube
 17. ^ [३], Interview
 18. ^ "Archived copy". 18 November 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 November 2015 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link), "Miniboxoffice.com"
 19. ^ [४], Dohai
 20. ^ "Archived copy". 10 August 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 August 2015 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link), Live Shows
 21. ^ "Sisters Antara and Ankita's Version of Pinga Has Over a Million Views". NDTV.com.
 22. ^ Staff, Magical Assam (29 May 2016). "Antara and Ankita's Version of Pinga Goes Viral on Internet". magicalassam.com. 2022-08-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-11 रोजी पाहिले.
 23. ^ a b ANTARA NANDY (25 August 2017). "Ja Ud Ja Re – Official Music Video – Antara Nandy" – YouTube द्वारे.
 24. ^ Nixati Joto Ronge ,youtube.com
 25. ^ Ei Jibon Nohoi Xuna Bondhu ,youtube.com
 26. ^ Eso Matoh Lakkhi Devi ,youtube.com
 27. ^ Tumi Aaahibaa Buli ,youtube.com
 28. ^ Aawaz – speak up against sexual violence ,youtube.com
 29. ^ Police Babu ,youtube.com
 30. ^ Najanu ,youtube.com
 31. ^ Moh Moh Ke Dhaage ,youtube.com
 32. ^ Aawaz – speak up against sexual violence ,youtube.com
 33. ^ Najanu ,youtube.com
 34. ^ Ennodu Nee Irundhaal (Cover) ,youtube.com
 35. ^ Ya Devi – Celebrating Womanhood , YouTube
 36. ^ Interview ,
 37. ^ Dohai – A Fusion ) ,youtube.com

बाह्य दुवे

[संपादन]