अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान सफाळे
शासन नोंदणी[संपादन]
"अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान, सफाळे" Antarang Sanskrutik Kala Darpan Pratishthan Saphale हि ना-नफा (Nonprofit) सेवाभावी संस्था असून त्याचा धर्मादाय आयुक्तालयाच्या कार्यालयात क्र. ई-९५२१/०१५, ठाणे नुसार नोंदणी झालेली आहे.
घोषवाक्य[संपादन]
"रंग नवे, छंद नवे!" हे अंतरंग प्रतिष्ठान चे घोषवाक्य असून; "साहीत्य, कला, संस्कृती व पर्यावरण जोपासानेतून सुदृढ समाजाचे निर्माण" हि टॅग लाईन ह्या संस्थेच्या सदस्यांमधील नवनवीन उपक्रमांचा उत्साह, कलेबद्दल आणि पर्यावरणाबद्दल असलेली आस्था ह्यातून प्रदर्शित होते.
ध्येय व उद्दिष्ट[संपादन]
प्रत्येक व्यक्ती हि कलाकार जरी बनू शकली नाही, परंतु त्या प्रत्येकाला कलेचा आस्वाद घेता आला; तरी एका कलासक्त रसिक समाजाची निर्मिती होईल! हाच समाज आनंदी व नोकोप व्यवस्था निर्माण करू शकतो! “अंतरंग प्रतिष्ठान” ह्या रसिक समाजाच्या निर्मितीचा पाया रचते आहे. उज्वल व सुदृढ भविष्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन असेच, मानवाकडून होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाचे नियंत्रण हि आजच्या काळाची प्राथमिक गरज आहे. “अंतरंग प्रतिष्ठान” पर्यावरण संगोपनाच्या कार्यासाठी सदैव प्रयत्नशील होती, आहे व राहील!
· स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून पालघर जिल्ह्यात भविष्यात कला संकुल उभारण्यासाठी प्रयत्न करणे.
· नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य, काव्य, चित्र, शिल्प, इत्यादी कलांची आवड निर्माण करण्यासाठी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविणे व प्रदर्शन आयोजित करणे.
· शैक्षणिक उन्नतीसाठी ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका वर्ग सुरु करणे.
· पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने वृक्षदिंडी, वृक्ष लागवड, वनीकरण करणे.
· कला, संस्कृती, इतिहासाच्या विकास व संवर्धनासाठी सहली, परिसंवाद, चर्चासत्र आयोजित करणे.
· लोकांमध्ये जल, वायू, भूमी प्रदूषण बाबत जागरूकता निर्माण करून, प्रदूषण रोखण्यासाठी विविध जनजागृतीचे कार्यक्रम राबविणे. पर्यावरण संवर्धनाचे कार्यक्रम व प्रकल्प राबविणे.
· राष्ट्रपुरुषांच्या जयंती, स्मृतिदिन, इत्यादी निमित्ताने परिसंवाद घडविणे.
· अंधश्रद्धा व चुकीच्या रूढी-परंपरा नष्ट करण्यासाठी परिसंवाद आयोजित करणे.
संस्थेच्या हितचिंतक सभासदांचे अधिकार व कर्तव्य[संपादन]
· वेळोवेळी विश्वस्त मंडळाकडून आयोजित हितचिंतक सभासदांच्या बैठकीत सहभागी होणे.
· संस्थेने आयोजित केलेल्या सशुल्क कार्यक्रम हे हितचिंतक सभासदांसाठी विनामूल्य असतात.
· संस्थेने आयोजित केलेल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी श्रमदान, समयदान करणे.
· संस्थेच्या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहणे.
· संस्थेच्या ध्येयपूर्तीसाठी आर्थिक मदत मिळविणे.
· आपल्या विषयाशी, आवडीशी संबंधित कार्यक्रमाची जबाबदारी घेणे.
असंख्य तरुण “अंतरंग प्रतिष्ठान” च्या समाज व पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात हिरीरीने भाग घेत आहेत. अश्या सुज्ञ नागरिकांच्या मदतीनेच अनेक लोकोपयोगी कार्य “अंतरंग” यशस्वीपणे पार पडू शकत आहे. ह्या विधायक चळवळीत आपणही सहभागी होऊन, आपल्या पुढच्या पिढीच्या उज्वल भविष्य निर्मितीत सहभागी व्हा!
आतापर्यंत लाभलेले दिग्गज, तज्ञ, कलाकार[संपादन]
अंतरंग हि पालघर जिल्यातील सफाळे येथील नॉन-प्रॉफिट संस्था साहीत्य, कला, संस्कृती व पर्यावरण जोपासानेतून सुदृढ समाजाचे निर्माण करणाचे कार्य २०१४ पासून करते आहे. आतापर्यंत साहित्य, संगीत, कला, शिल्प, अभिनय, संस्कृती, पर्यावरण, शैक्षणिक व सामाजिक इत्यादी सर्वच क्षेत्रात संस्थेचे कार्य अप्रतिम आहे. दर वर्षी दिवाळीच्या आधी होणारा "इंद्रधनू कला महोत्सव" हा या संस्थेचा महत्त्वाचा कार्यक्रम असून, वर्षातून ६ वेळा विविध विषयांतील तज्ञ, अभ्यासक, समाजसेवक, इतिहासकार, संगीतकार इत्यादी पैकी मान्यवरांना बोलावून त्यांच्यासोबत "मुक्तसंवाद" ह्या सदराखाली संवाद साधला जातो. ह्या व्यतिरिक्त वर्षभरात विविध उपक्रमांतर्गत संगीत मैफिल, कवी कट्टा, ढोलताशे संचालन, उन्हाळी शिबीर, व्याख्यान, माहितीपट, अभ्यास सहल, इत्यादी कार्यक्रम होत असतात. अंतरंग प्रतिष्ठान तर्फे सफाळे येथे विनामुल्य ग्रंथालय व अभ्यासिका सुद्धा सुरु केलेली आहे. आतापर्यंत विविध कार्यक्रमातून लाभलेले कलाकार/दिग्गज खालीलप्रमाणे आहेत.
कलाकार / तज्ञ / अभ्यासक | क्षेत्र |
कु. कल्याणी तीभे | कत्थक नृत्यांगना |
कु. जिज्ञासा दवणे | टेक्स्टाईल डिझायनर |
कु. दुर्गा परदेशी | मीनाकारी व धातुकाम कलाकार |
कु. प्राजक्ता शेंद्रे | शास्त्रीय गायन |
कु. श्रुती पटवर्धन | कत्थक नृत्यांगना |
कु. समृद्धा पुरेकर | चित्रकर्ती |
क्रिएटिव्ह डान्स अकादेमी | नृत्य समूह |
डॉ. नेताजी पाटील | लेखक |
डॉ. मिलिंद पराडकर | ज्येष्ठ इतिहास अभ्यासक |
वीरमाता अनुराधा विष्णू गोरे | समाजसेवक, लेखिका |
श्री. अक्षय मालवणकर | लावणी नृत्य |
श्री. अच्युत पालव | सुलेखनकार |
श्री. अजयसिंह भदोरिया | कुंभारकाम |
श्री. अप्पा परब | छ. शिवाजी महाराज इतिहास अभ्यासक |
श्री. अमित दीक्षित | अनिमेटर व चित्रकार |
श्री. आकाश घरत | गायक |
श्री. आदित्य ओक | संवादिनी (हार्मोनियम) वादक |
श्री. आशुतोष आपटे | चित्रकार, कवी, नाटककार |
श्री. उत्कर्ष धाबे | बासरीवादक |
श्री. उदय कावळे | चित्रकार, छायाचित्रकार |
श्री. उदय शिरूर | शिळ (शिटी) वादक |
श्री. उमेश पांचाळ | चित्रकार, रंगावलीकार |
श्री. किरण गोरवाला | चित्रकार |
श्री. किरण जगताप | नखचीत्रकार |
श्री. किशोर नादावडेकर | चित्रकार |
श्री. कुणाल तरे | बासरीवादक |
श्री. चंद्रकांत चित्ते | संवादिनी (हार्मोनियम) वादक |
श्री. चंद्रजीत यादव | शिल्पकार |
श्री. जतीन पाटील | कीबोर्ड प्लेयर |
श्री. जमील शेख | कवी |
श्री. दर्शन महाजन | चित्रकार, मोर्चांग वादक |
श्री. धनंजय आकरे | कवी |
श्री. धम्मानंद पाटील (नंदू) | कुंभारकाम |
श्री. नितीन केणी | कुंभारकाम, अधिव्याख्याता- सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट |
श्री. प्रदीप भुते | टेक्स्टाईल डिझायनर, अधिव्याख्याता- सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट |
श्री. प्रवीण परदेशी | तबलावादक |
श्री. प्रशांत कुलकर्णी | व्यंगचित्रकार |
श्री. प्रसन्न गोगीलावर | शिल्पकार |
श्री. भगवान भावसार | बासरीवादक |
श्री. कौशल इनामदार | संगीतकार, कवी, गायक, लेखक |
सौ. राजश्री गोरे | गायिका |
सौ. अस्मिता सुधीर पांडे | संचालक, मराठी अस्मिता कल्चर |
श्री. भूपेंद्र जगताप | शास्त्रीय गायक |
श्री. भूषण पाटील | साक्सोफोन वादक |
श्री. मधुकर वंजारी | शिल्पकार |
श्री. मानसिंग पाटील | पोलीस निरीक्षक, नक्षल व दहशतवाद विरोधी |
श्री. मानुराज राजपूत | बासरीवादक |
श्री. मिलिंद कुलकर्णी | संवादिनी (हार्मोनियम) वादक |
श्री. योगेश लोखंडे | शिल्पकार |
श्री. राहुल चंपानेकर | तबलावादक |
श्री. वासुदेव कामथ | चित्रकार |
श्री. विकास सबनीस | व्यंगचित्रकार |
श्री. विजय पुरव | कवी |
श्री. विजय बोंदर | चित्रकार, अधिव्याख्याता- सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट |
श्री. विजय सकपाळ | चित्रकार, अधिव्याख्याता- सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट |
श्री. विशाल सुतार | चित्रकार |
श्री. विश्वनाथ साबळे | चित्रकार, अधिष्ठाता-सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट |
श्री. वैभव राऊत | शिल्पकार, |
श्री. शशिकांत काकडे | चित्रकार, अधिव्याख्याता- सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट |
श्री. शेखर गांधी | तबलावादक |
श्री. शेखर पाटील | तबलावादक |
श्री. श्रीदत्त राऊत | इतिहास संशोधक |
श्री. संजय पाटील | लेखक, कवी |
श्री. संजय महाडिक | गिटार वादक |
श्री. संदीप राऊत | शिल्पकार |
श्री. संदीप सावंत | दिग्दर्शक, संवाद लेखक |
श्री. सत्यजित प्रभू | संवादिनी (हार्मोनियम) वादक |
श्री. सदाशिव जिव्या म्हसे | वारली चित्रकार |
श्री. सारंग वेचलेकर | सितारवादक |
श्री. स्वप्नील चाफेकर | कवी, गीतकार, गायक |
श्री. हृदयनाथ मेहेर | संगीतकार |
सौ. चित्रगंधा वनगा - सुतार | चित्रकर्ती |
सौ. नम्रता माळी-पाटील | पालघर साहित्य मंच |
सौ. नीरजा पटवर्धन | वेशभूषाकार, मांडणी संयोजक, लेखिका |
सौ. प्रीती किणी | कुंभारकाम |
सौ. माधुरी उमेश राऊत | मराठी भाषा अभ्यासक |
सौ. शारदा राऊत | जिल्हा पोलीस अधीक्षक |
सौ. शिल्पा परुळेकर | शब्दांगण |
अंतरंग तर्फे वर्षभरात सदर होणारे कार्यक्रम[संपादन]
- इंद्रधनू कला महोत्सव
- सांज-दिवाळी
- दिवाळी पहाट
- स्वररंग
- कवी कट्टा
- ज्येष्ठ कट्टा
- मुक्त संवाद
- उन्हाळी शिबीर :बालक व पालकांसाठी
- बाल चित्रकलास्पर्धा
- छायाचित्रण स्पर्धा
- दिनदर्शिका प्रकाशन
- वृक्ष दिंडी
- वृक्षारोपण
- ग्रंथालय
- अभ्यासिका
- आर्ट & क्राफ्ट वर्कशॉप
- अभ्यास सहल
मदत / देणगी[संपादन]
“अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान, सफाळे” हि ‘महाराष्ट्र शासन’ नोंदणीकृत संस्था आहे. (नोंदणी क्र. ई-९५२१/०१५, ठाणे) लोकांनी दिलेल्या देणगीतूनच अनेक यशस्वी उपक्रम राबविण्यात येत आहेत. ह्या समाजकार्यासाठी व पर्यावरण संगोपनासाठी “अंतरंग” ला आपल्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.
BANK DETAILS:
A/c Name: ANTARANG SANSKRUTIK KALA DARPAN PRATISHTHAN
Bank: BANK OF BARODA
A/c No.: 490201 0000 4474
IFSC No.: BARB0SAPHAL
(Income Tax PAN No. AAFTA0118C)
संपर्क[संपादन]
Website: http://www.antarang.org
e-mail: [http://antarangpratishthan@gmail.com]
Mob. 9096949798 / 8446587002