अंकिता हर्षवर्धन पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अंकिता हर्षवर्धन पाटील (जन्म: २६ डिसेंबर १९९१) या एक भारतीय राजकारणी, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या, एस.बी. पाटील शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षा, ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या कायदेशीर उपसमितीच्या सहअध्यक्ष व इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन लि.च्या संचालिका आहेत.

अंकिता पाटील या जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्या आहेत.[१] त्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन शहाजीराव पाटील यांच्या कन्या आहेत.

राजकीय कारकीर्द[संपादन]

कु. अंकिता पाटील या परिषद पोटनिवडणुकीत बहुमताने विजय झाला आहे. कु. अंकिता पाटील महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी बावडा लाखेवाडी येथून जिल्हा परिषद निवडणुकीत 17 हजार 274 मतांनी विजयी झाल्या आहेत.

ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन[संपादन]

कु. अंकिता हर्षवर्धन पाटील ह्या ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या (इस्मा) कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा आहेत. ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन (इस्मा) साखर उत्पादकांच्या फायद्यासाठी आणि हितासाठी सामान्यतः: भारत सरकार आणि स्थानिक राज्य सरकारकडे साखर उत्पादनाशी संबंधित समस्यांवर मार्ग काढण्सासाठी पाठपुरावा करण्याचे काम करते.

वैयक्तिक माहिती[संपादन]

कु. अंकिता पाटील ह्या महाराष्ट्र राज्याचे  माजी मंत्री हर्षवर्धन शहाजीराव पाटील यांच्या कन्या आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Times Now Marathi. "हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत विजय". www.timesnowmarathi.com. 2020-03-19 रोजी पाहिले.