अँड्रु मेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अँड्रू विल्यम मेलन (२४ मार्च, इ.स. १८५५:पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - २६ ऑगस्ट, इ.स. १९३७:साउथहॅम्प्टन, न्यू यॉर्क, अमेरिका) हा अमेरिकेचा उद्योगपती आणि दानशूर होता. हा अमेरिकेचा युनायटेड किंग्डममधील राजदूत तसेच अमेरिकेचा अर्थसचिवही होता.

मेलनचे कुटुंब धनाढ्य होते. १८७२मध्ये अँड्रूचे वडील थॉमस मेलन यांनी अँड्रूला लाकूड आणि कोळशाचा व्यवसाय उघडून दिला. अँड्रूने थोड्याच वेळात त्यातून नफा मिळवून दाखवला. १८८०मध्ये हा थॉमस मेलनच्या टी. मेलन अँड सन्स या वित्तसंस्थेत रुजू झाला व दोनच वर्षात ही बँक त्याने स्वतःच्या नावावर करून घेतली. १८८९मध्ये याने युनियन ट्रस्ट कंपनी आणि युनियन सेव्हिंग्ज बँक ऑफ पिट्सबर्ग या संस्थांची स्थापना केली. यानंतर त्याने खनिज तेल, पोलाद, नौकाबांधणी आणि बांधकामाचे व्यवसायही सुरू केले.

वॉरेन जी. हार्डिंगने मेलनला १९२१मध्ये अर्थसचिवपदावर नेमला. मेलन या पदावर जवळजवळ बारा वर्षे होता.