अँजिओप्लास्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ॲंजिओप्लास्टी या शस्त्रक्रियेची रीत
ॲंजिओप्लास्टीच्या शस्त्रक्रियेचेवेळी वापरायची नळी

हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये जर कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले, तर हृदयविकाराचा झटका येतो. तो अडथळा दूर करण्यासाठी ॲंजिओप्लास्टी केली जाते.याची पुर्व तपासणी ॲंजिओग्राफी द्वारे केली जाते

पद्धत[संपादन]

  • स्थानिक बधिरीकरण केल्यानंतर एक छोटी प्लास्टिकची नळी सुईबरोबर मांडीतून सोडली जाते.
  • त्यानंतर एक लांब आकाराची ट्यूब घेऊन पायाच्या रक्तवाहिनीमार्फत एक्‍स-रेच्या मदतीने ती नळी मानेच्या रक्तवाहिनीपर्यंत नेली जाते. या वेळी रुग्ण पूर्णतः शुद्धीत असतो आणि डॉक्‍टर काय करत आहेत, हे पाहू शकतो.
  • नंतर एक छोटी वायर या करोनरी आर्टरीमध्ये प्लास्टिकचा फुगा असलेल्या छोट्या नळीतून सोडली जाते.
  • नंतर हा फुगा फुगवला जातो व त्यामुळे कोलेस्टेरॉल आणि चरबीही कमी केली जाते. कारण हा फुगा फुगल्याने कोलेस्टेरॉल आणि चरबी बाजूला सारली जाऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.
  • यानंतर एक स्वतःहून प्रसरण पावणारी जाळी (स्टेंट) आतमध्ये सोडली जाते. ही जाळी(स्टेंट) नंतर रक्तवाहिनी प्रसरण पावलेल्या अवस्थेत ठेवून देतो.