अँग्री इंडियन गॉडेसेस
2015 film by Pan Nalin | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
पटकथा |
| ||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
अँग्री इंडियन गॉडेसेस हा २०१५ चा भारतीय हिंदी भाषेतील नाट्य चित्रपट आहे जो पॅन नलिन दिग्दर्शित आहे आणि जंगल बुक एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली गौरव धिंग्रा आणि पॅन नलिन निर्मित आहे. यात आदिल हुसेन, संध्या मृदुल, तनिष्ठा चटर्जी, सारा-जेन डायस, अनुष्का मनचंदा, अमृत माघेरा, राजश्री देशपांडे, आणि पावलीन गुजराल यांच्या भूमिका आहेत. २०१५ च्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या विशेष सादरीकरण विभागात हा प्रदर्शित झाला, जिथे चित्रपटाने पीपल्स चॉइस अवॉर्डसाठी दुसरे स्थान पटकावले.[१][२][३]
कथानक
[संपादन]फ्रीडा ही एक फॅशन फोटोग्राफर आहे जी तिच्या लग्नाची घोषणा करण्यासाठी तिच्या कुटुंबातील काही मित्रांना घरी आमंत्रित करते. या गटात बॉलीवूड गायिका माधुरिता किंवा मॅड,पामेला जसवाल किंवा पॅमी, व्यावसायिक महिला सुरंजना किंवा सु आणि एक महत्त्वाकांक्षी अभिनेत्री जोआना किंवा जो यांचा समावेश आहे. नर्गिस नंतर सामील होते. या घोषणेमुळे प्रतिक्रियांची एक साखळी सुरू होते, ज्यामुळे सर्व मुलींमधील लपलेली गुपिते बाहेर येतात. फ्रीडा स्पष्ट करते की तिचे वडील लग्नात तिच्यासोबत येणार नाहीत. मॅडचा प्रियकर, जो तिला शोधत येतो, तो स्पष्ट करतो की मॅड नैराश्यात आहे आणि आत्महत्या करण्याच्या विचारात आहे. घोषणेनंतर, मुली गोव्यात येतात आणि अशाप्रकारे एक अचानक बॅचलरेट पार्टी सुरू होते.
रात्रीच्या कार्यक्रमासाठी सर्व तयार आहे. फक्त एकच मुद्दा आहे: फ्रीडा कुणाशी लग्न करनार त्याचे नाव सांगणार नाही. प्रवासादरम्यान, महिलांना त्रास दिला जातो आणि त्या धाडसी प्रतिक्रिया देतात. त्यांना त्रास देणारे संतापले आहेत आणि त्या हादरल्या आहेत. जसजशी सुट्टी पुढे सरकते तसतसे आपल्याला महिलांच्या स्वप्नांशी, इच्छांशी, भीतीशी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांचे एकमेकांशी असलेले अतूट बंधन कळते.
नंतर, सर्वांना कळते की फ्रीडा नर्गिसशी लग्न करणार आहे, जे ६ सप्टेंबर २०१८ पर्यंत भारतीय दंड संहिता कलम ३७७ अंतर्गत बेकायदेशीर होते. लग्नाच्या आधल्या रात्री सगळे समुद्रकिनाऱ्यावर पिकनिक करण्याचा निर्णय घेतो. पिकनिकमध्ये, जोचे इतर सदस्यांसोबत भांडण होते आणि जो बाहेर पडते. पार्टी रात्री उशिरापर्यंत चालू राहते. जेव्हा ते घरी जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा ते जोला शोधतात. ती समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत आढळते व तिच्यावर बलात्कार झाल्याचे दिसून येते. पोलिस लवकरच पोहोचतात आणि प्रभारी पोलिस अधिकारी त्यांची प्राथमिक चौकशी करतो जी महिलांना लाजवेल अशा पद्धतीने होते. ह्यामुळे महिलांना वाईट वागणूक देणाऱ्या पुरुषप्रधान समाजावर त्यांचा विश्वास नसल्याचे दिसून येते. ते निराश आणि उद्विग्न होऊन घरी परततात.
पार्टीतून बाहेर पडताना सुची मुलगी माया जोच्या मागे गेली आणि त्यानंतर तिचे फोटो काढले असतात. फोटोंवरून असे दिसून येते की ज्या सहा जणांनी आधी तिच्या मैत्रिणींना त्रास दिला होता त्यांनीच जोवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली. सु बंदूक घेऊन समुद्रकिनाऱ्यावर परत जाते. बाकीचे तिचा पाठलाग करतात. नर्गिस तिला थांबवण्यापूर्वी सु ४ बलात्कार्यांना गोळ्या घालते, मॅड बंदूक घेतो आणि इतर दोघांना मारतो. जोच्या अंत्यसंस्कारात, सर्व भावनिक भाषणे देतात. नर्गिसचे भाषण एका महिलेच्या मूल्याचे सारांश देते आणि आशा करते की महिलांच्या पुढील आयुष्यात त्या स्वतःच्या कथा लिहू शकतील. पोलिस अधिकारी समारंभात व्यत्यय आणतो, महिलांकडून अपराधाची कबुली मागतो. या कथेचा शेवट खुला आहे, चर्चमधील संपूर्ण मंडळी महिलांसोबत एकजुटीने उभी आहे.
कलाकार
[संपादन]- सारा-जेन डायस - फ्रीडा डी सिल्वा, फॅशन फोटोग्राफर आणि वधू
- तनिष्ठा चॅटर्जी - नर्गिस नसरीन, एक क्रांतिकारी जी सुच्या विरोधी आहे.
- अनुष्का मनचंदा - मधुरिता उर्फ "मॅड", एक बॉलीवूड गायिका आणि फ्रीडाची मैत्रीण.
- संध्या मृदुल - सुरंजना उर्फ "सु", एक व्यावसायिक महिला आणि सहा वर्षांच्या मायाची आई
- अमृत माघेरा - जोआना मेंडिस उर्फ "जो", एक महत्वाकांक्षी अभिनेत्री आणि फ्रीडाची चुलत बहीण
- राजश्री देशपांडे - लक्ष्मी, फ्रीडाची घरकामवाली बाई
- पावलीन गुजराल - पामेला जयस्वाल उर्फ "पॅमी"
- अर्जुन माथूर - झैन, मधुरिताचा प्रियकर
- आदिल हुसेन - गोवा पोलिस अधीक्षक
- विक्रम कोचर - एजंट
पुनरावलोकन
[संपादन]रिव्ह्यू अॅग्रीगेटर वेबसाइट रॉटन टोमॅटोजवर, १८ समीक्षकांच्या आधारे चित्रपटाला ६१% मान्यता रेटिंग मिळाली आहे, ज्याचे सरासरी रेटिंग ५.९/१० आहे.[४]
द हिंदूच्या नम्रता जोशी यांनी लिहिले की, "पवलीन गुजराल ही एक साक्षात्कार आहे आणि सारा-जेन डायस प्रशंसनीय संयम दाखवतात".[५]
द टाईम्स ऑफ इंडियाचे मोहर बसू म्हणाले, "कथेला कधीही ठोस पटकथेचा आधार मिळत नाही. चित्रपटाचा वेग ही एक समस्या आहे आणि जरी दुसऱ्या भागात गोष्टी सुधारल्या तरी, तो एका गोंधळात संपतो".[६]
हिंदुस्तान टाईम्सच्या श्वेता कौशल यांचे मत वेगळे होते, त्यांनी म्हटले की, "अखेर, जोपर्यंत मजा टिकते तोपर्यंत अँग्री इंडियन गॉडेसेस हा एक चांगला चित्रपट आहे परंतु 'राग' सुरू होताच तो वेगाने खाली कोसळतो".[७]
संदर्भ
[संपादन]- ^ Punter, Jennie (18 August 2015). "Sandra Bullock's 'Our Brand Is Crisis,' Robert Redford's 'Truth' to Premiere at Toronto". Variety.
- ^ "Toronto International Film Festival Announces 2015 Award Winners" (PDF) (Press release). TIFF. 20 September 2015. 1 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 18 October 2021 रोजी पाहिले.
- ^ "'Angry Indian Goddesses' will release in late November". DNA India. 7 November 2015. 18 October 2021 रोजी पाहिले.
- ^ "Angry Indian Goddesses (2015)". Rotten Tomatoes. Fandango Media. 18 October 2021 रोजी पाहिले.
- ^ Joshi, Namrata (6 December 2015). "Girls' night out". The Hindu. 18 October 2021 रोजी पाहिले.
- ^ Basu, Mohar (15 December 2015). "Angry Indian Goddesses". The Times of India. 18 October 2021 रोजी पाहिले.
- ^ Kaushal, Sweta (5 December 2015). "Angry Indian Goddesses review: Nothing angry about this film". Entertainment. Hindustan Times. New Delhi. 18 October 2021 रोजी पाहिले.