सदस्य चर्चा:माहीतगार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ ) [संपादन]

चांदणे शिंपित जा ...!
मराठी विकिपीडिया गौरव समितीची
मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.

"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.


जानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख
२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख
जानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख
पाने सांख्यिकी
लेख ३४,५४४
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

१,०९,५३४
चढवलेल्या संचिका ३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,६८,६९३
प्रतिपान संपादने ८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २२,०८४
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्वीकृती अधिकारी
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी


कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
  • टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
  • १५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई

त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अ‍ॅप' निर्माण करण्यात आल्या.

  • * ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
  • * १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
  • * १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
  • * २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

२०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
  • १० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
  • १० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
  • १७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
  • १८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
  • २० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
  • २५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
  • मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता

मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.

मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.

परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.


  • नवीन नियुक्ती
माहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.

माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.

'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

वाचकांच्या प्रतिक्रिया

  • राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
  • नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
  • Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
  • मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
  • नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !



मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ ) [संपादन]

२०१२ नववर्ष अभिष्टचिंतन ...!
सर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ...! मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.

नववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.

विकिपत्रिका मराठी विकिपीडिया
२०११ मधील गुगल वरील मराठी विकिपीडियाबाबतचा लोकांनी घेतलेल्या शोधाचा लेखाजोखा (ट्रेंड)
पाने सांख्यिकी
लेख ३४,७९७
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

९६,२४०
चढवलेल्या संचिका ३,१६८
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,३२,७५०
प्रतिपान संपादने ९.६९
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २१,१५१
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्विकृती अधिकारी


प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम
  • विकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्‍या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण
    CMDA IT expo. १५ ते १८ डिसेंबर २०११, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉल.

व सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.

  • "CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.
  • शनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.

२०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
  • ७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे
  • १५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे
  • १५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई
  • २९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई
विकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा
मराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.

या समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

मराठी विकिपीडिया विकिसंमेलन भारत २०११ जाहीरनामा

  • महाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक शाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.
  • संस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.
  • मराठी विकिपिडीयावर "विकी स्रोत" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.
  • मराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.
  • मराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकीपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !


,

पुनश्च स्वागत[संपादन]

   स्वागत माहीतगार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन माहीतगार, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,११९ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपणास विकिपीडियावर लिहून पहाताना अद्याप धाकधूक वाटते ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

नमस्कार, वर्ग पान काढा मध्ये भटकतांना काही लेख चुकून काढले गेले असे वाटले. उदा. अंतानास मर्किस असे लेख वाचविता येतील का? त्यातील delete request काढू का? Gypsypkd १०:५४, २० ऑगस्ट २००९ (UTC)

तुम्ही MAHITGAR असा नाहीतर माहीतगार, मदत करण्यास नेहमीच तत्पर असता, तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी ही छोटी भेट. Gypsypkd ११:५८, २० ऑगस्ट २००९ (UTC)

साचा दुरूस्ती[संपादन]

तुम्ही काम करीत असलेल्या साच्यांमध्ये एकात-एक असे ३-४ पातळ्यापर्यंत क्लिष्ट साचे आहेत. जोपर्यंत हे सगळे साचे भाषांतरित होउन मराठी विकिपीडियावर आपण घालत नाही तोपर्यंत हे मुख्य साचे पूर्णतः काम करणार नाहीत. तरी सगळ्यात खालच्या पातळीवरील साचे एक-एक करीत भाषांतरित करणे हा एक उपाय आहे, किंवा त्यासारखेच साचे आपले आपण येथे तयार करणे हा दुसरा.... दोन्ही वेळखाऊ व अवघड आहेत.

अभय नातू १६:४५, २० ऑगस्ट २००९ (UTC)

धन्यवाद[संपादन]

साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात मला आमंत्रित करण्याबद्दल धन्यवाद. मी माझ्यापरीने नक्कीच मदत करेन. साचा:विपीमेटाफलक भाषांतरित करणे एक मोठे काम आहे. मात्र ते एकदा झाले की चर्चापानांवर एकसुत्रीपणा येईल. Weekend ला मी त्याच्या भाषांतरात मदत करेन. क्षितिज पाडळकर ०३:५०, २१ ऑगस्ट २००९ (UTC)

नक्कीच[संपादन]

मलाही यात सहभागी होण्यास आनंद आहे. Gypsypkd ०७:१८, २१ ऑगस्ट २००९ (UTC)

प्रश्नावली[संपादन]

मी प्रश्नावली बघितली.त्यावर काम चालुआहे.

bhatkya १७:१८, २२ ऑगस्ट २००९ (UTC)

साचा : विपीमेटामथळाफलक[संपादन]

नमस्कार माहीतगार,
मी साचा चर्चा : विपीमेटामथळाफलक येथे करावयाच्या कामांची कच्ची यादी केली आहे. मी त्यानुसार हे साचे मराठीत रुपांतरित करणार आहे.
सुरुवातीला सर्व साचे जसेच्या तसे उतरवून नंतर त्याच्या भाषांतराचे बघुया.
आपले याबाबत काय मत आहे.
क्षितिज पाडळकर २०:४५, २२ ऑगस्ट २००९ (UTC)

रशियन शब्द[संपादन]

नमस्कार, रशियन भाषेत "ह" चा उच्चार नाही. त्याऐवजी बहुतेक ठिकाणी "ग" आणि काही ठिकाणी "ख" चा उच्चार आहे. जसे गिमालय, गिटलर वगैरे. तसेच "ड", "ट" सारख्या कठीण उच्चारांऐवजी "द" आणि "त" आहेत. विशेष करून आडनावांमध्ये "-व्ह" असे मराठीत लिहिलेले दिसते पण रशियन भाषेतच तसे आडनाव नाही. पुंलिंगी -ओव किंवा -येव (स्त्री -ओवना किंवा -येवना) असे आहेत. मराठी विकित त्याप्रमाणे लिहावे / बदल करावे का ? Gypsypkd ०९:३७, २५ ऑगस्ट २००९ (UTC)

विकिपीडिया:चर्चापान साचे लेखाचे भाषांतर[संपादन]

विकिपीडिया:चर्चापान साचे लेखाचे जमेल तेवढे भाषांतर केले आहे.तपासण्यासाठी मुळ इंगजी लेखन तसेच ठेवले आहे.कृपया नंतर ते काढुन टाकावे. V.narsikar १३:५४, २६ ऑगस्ट २००९ (UTC)


साचा:विप्रवने लेखचर्चा पान तात्पूरता साचा[संपादन]

यामध्ये भाषांतर हवे आहे काय? मी सध्या यात २-३ दुरुस्त्या केल्या आहेत.इतर गोष्टींना धक्का न लावता करील.

V.narsikar १६:१३, २६ ऑगस्ट २००९ (UTC)

धन्यवाद[संपादन]

चित्र:LajaluFul1.png



भाषांतर[संपादन]

या साच्यांचे मशिन ट्रांसलेशन करुन दिल्यास भाषांतराचे काम सोपे होइल

V.narsikar १५:००, २७ ऑगस्ट २००९ (UTC)

ते भाषांतर ठिक आहे. पुष्कळ काम हलके होते.थोड्क्यात निभवते.बघा कसे जमते ते.नाहीतर करतोच मग. माझा मेल बघा.शुभेच्छेसह

V.narsikar १६:१०, २७ ऑगस्ट २००९ (UTC)

सहाय्य:साचांमधील पृथकक उपयोगिता[संपादन]

done. सोपे आहे. go ahead.

V.narsikar १६:२४, २७ ऑगस्ट २००९ (UTC)

होय.बघतो. कृपयातीळ बघा. आपल्या खरोखर व वस्तुनिष्ठ प्रतिक्रियेची आवश्यकता आहे.त्यातील दोष सांगा.मला सुधारणेस वाव मिळेल. धन्यवाद.

V.narsikar ०६:४८, २८ ऑगस्ट २००९ (UTC)

नमस्कार, मी बेरिलियम नावाचा नवीन लेख लिहिला असून त्यात "वर्ग" आणि "इतर भाषेतील नावे" टाकलेली आहेत, पण ही माहिती दिसत नाही, तसेच संपादकीय संस्कार (राहून गेले असल्यास) मदत हवी आहे. Gypsypkd ०७:११, २८ ऑगस्ट २००९ (UTC) वरील हीच समस्या जास्वंद लेखातही होती, मी त्यातील बदल केल्यावर वर्ग नाव आणि इतर भाषेतील नावे दोन्ही दिसू लागले आहेत. गॅलरी शब्दाला लागून "/" नसल्यामुळेच असे घडले असावे. मदतीसाठी धन्यवाद. Gypsypkd १२:५५, २८ ऑगस्ट २००९ (UTC)

काम केले आहे. कृपयातीळ बघा.त्यात चित्र कां येत नाही?

धन्यवाद[संपादन]

माझा तुम्हाला बराच त्रास आहे. V.narsikar १४:५८, २८ ऑगस्ट २००९ (UTC)

हे भाषांतर सोबत करूयात ?[संपादन]

सर्वांना माहिती चौकटीत काय होते आहे हे समजणे कदाचित साचा:Infobox/doc आणि साचा:माहितीचौकट/doc पानाच्या भाषांतरामुळे सोपे जाईल ?

मी माझ्यातर्फे जमेल तेवढा हातभार नक्की लावेन. अभिजीत साठे १६:५५, २८ ऑगस्ट २००९ (UTC)

तुम्ही अविश्रांत व अथक मेहनत घेउन ज्या धुळपाट्या बनविल्या, त्यास तोड नाही. "सर्व सहभागी सदस्यांना अत्युच्च दर्जाचे 'संगणकआज्ञावली'चे तांत्रिक ज्ञान नसते".याची दखल घेउन आपण माझ्या सारख्या सदस्यांना न्यायच दिला आहे.ज्यांना Contribution तर करायचे आहे,पण त्यांना या प्रकारच्या ज्ञानाअभावी मर्यादा पडतात.आपण गौरवास व सत्कारास पात्र आहात. पुन्हा एकदा धन्यवाद देतो.या धन्यवादात formality चा कोरडेपणा नाही.मी व्यक्त केलेले विचार हे अशा सदस्यांचा 'प्रतिनीधी' म्हणुन आहेत असे समजावे.


V.narsikar ०४:०२, ३१ ऑगस्ट २००९ (UTC)

वनस्पती लेख्[संपादन]

आतासाचा:वनचौकट२ वगैरेचे काम पूर्ण झाले आहे.भाषांतरासाठी त्रास होणार नाही.आता वनस्पती लेखांकडे वळु काय?

V.narsikar १२:४३, ३१ ऑगस्ट २००९ (UTC)

संचिकेंचे वर्गीकरण[संपादन]

मी नुकतीच केलेली काही संचिकांची वर्गीकरणे कृपया बघता काय? ठिक असतील तर पुढे जातो. V.narsikar ०७:१०, ३ सप्टेंबर २००९ (UTC)

कृपया साचा:बदल बघा.त्यात दुरुस्ती करावी ही विनंती.

V.narsikar ०३:५६, ४ सप्टेंबर २००९ (UTC)

धन्यवाद[संपादन]

--Deepnarsay १४:४५, ४ सप्टेंबर २००९ (UTC)

खारीचा वाटा[संपादन]

तुम्ही करीत असलेल्या एवढ्या मोठ्या कामात हा माझा खारीचा वाटा होता,तो ही अपूर्ण.

V.narsikar १४:३३, ८ सप्टेंबर २००९ (UTC)

काही नवे साचे[संपादन]

नमस्कार

मी आता एक साचा माझ्या लेखात टाकला, व मला तो लेख वर्ग:इंग्रजी-मराठी भाषांतर हवे या वर्गात दिसतो आहे. मी कुठल्या जागी शोधु?

लेखः केयरटेकर (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)

--प्रशांत शिरसाठ १३:१३, ९ सप्टेंबर २००९ (UTC)

उपवर्ग[संपादन]

नमस्कार, वर्ग : छत्तीसगढमधील जिल्हे येथे पुर अंती नावे पूर अंती करण्याचा प्रयत्न केला, जमले नाही. इतर (त्या खालील बदल) स्थानांतर करून जमले. असे बदल कसे करावेत? Gypsypkd ०७:५८, १० सप्टेंबर २००९ (UTC)

अवश्य. --Deepnarsay १८:०८, ११ सप्टेंबर २००९ (UTC)

भाषाशास्त्र कोणता लेख घेतला महाराज ! डोक्याचा पार खुर्दा झाला व fuse बरेच वेळ उडाला. बापरे बाप ! आपली तर भाषाच खुंटली.

V.narsikar ०८:४०, १२ सप्टेंबर २००९ (UTC)

आपल्या संवादाने मलापण हुरुप आला आहे.थोडा वेळ व मेहनत लागेल पण करु.समविचारी लोकं भेटले की आनंद होतो. वरील प्रतिक्रिया फक्त कंटाळा आल्यामुळे होती. आगे बढो.हम साथ है. V.narsikar १४:००, १२ सप्टेंबर २००९ (UTC)

मदतीसाठी आवाहन - वर्ग:विज्ञान[संपादन]

वर्ग:फलज्योतिषी हा वर्ग वर्ग:विज्ञान मध्ये धरला होता. Talk page वर नोंदाविल्या प्रमाणे हे अनुचित आहे. हा बदल मुखपृष्ठा वर दिसून येण्या साठी काय करावे लागेल?

धन्यवाद,

SPat talk १२:२३, १३ सप्टेंबर २००९ (UTC)

English Wikipediaप्रमाणे वर्ग:ज्योतिषी चे वर्गिकरण वर्ग:संस्कृती, वर्ग:अंधश्रद्धा इत्यादि बरोबर करता येइल. मला मुखपृष्ट सम्पदानाची परवानगी नसल्याने, मी ते बदलू शकत नाही.
सहाय्य करता धन्यवाद,
SPat talk ०२:३४, १४ सप्टेंबर २००९ (UTC)
वेळ देण्याकरता धन्यवाद! खरे तर शब्द विश्लेषण हा माझा विषय नाही, तरीही तुमची argument समाधानकारक वाटते. मी "pseudo-science" करीता मराठी शब्द शोधत होतो, कारण तो येथे suit होतो. सहाजिकपणे अशा लेखांमधे NPOV ची काळजी घेणे आवश्यक आहे (तुम्ही म्हणल्या प्रमाणे "अंधश्रद्धा" हे विशेषण सापेक्ष आहे). नविन वर्गिकरण समाधानकारक आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद,
SPat talk १३:०२, १४ सप्टेंबर २००९ (UTC)

कृपया अहिल्याबाई होळकर हा लेख बघावा. default sortkey बद्दल माहिती देउ शकत असाल तर द्यावी. तो अद्याप १००% पूर्ण झाला नाही.थोडे भाषांतर बाकी आहे.त्यातील लाल दुवे काढण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे. तसेच [[वर्ग:]]मधिल लाल असलेले वर्ग नीट करण्यास आपली मदत हवी आहे.

V.narsikar १५:५४, १४ सप्टेंबर २००९ (UTC)

फायरफॉक्स[संपादन]

माहीतगार, मला आपला संदेश नीट कळाला नाही. माझ्या फायरफॉक्समध्ये देखील टायटल बारमध्ये चौकोन दिसतात. पण माझ्या डेस्कटॉपवर [[१]] हे सॉफ्टवेअर आहे, तेव्हा तेथे मला टायटल बारमध्ये मराठी शब्द व्यवस्थित दिसतात. आपण बराहा install करुन पहा. तसेच फायरफॉक्सवरील आपण केलेले भाषांतर मी पाहिले, मी वेळ मिळेल तेव्हा त्यामध्ये हातभार लावेन. अभिजीत साठे ०९:३६, १५ सप्टेंबर २००९ (UTC)

मोक्षगुंडम विश्वेश्वरैया या लेखातील माहितीचौकट निट करण्यास मदत हवी आहे.मी बराच प्रयत्न केला परंतु जमले नाही.तुम्हास याबद्दल थोडा त्रास देत आहे.

V.narsikar ०७:१०, १६ सप्टेंबर २००९ (UTC)

आपल्या पाशी एव्हाना जमा झालेले धन्यवाद ठेवायला जागाच उरली नसेल.तरीपण धन्यवाद देतोच.

V.narsikar १०:१७, १६ सप्टेंबर २००९ (UTC)

विक्शनरी[संपादन]

माझी काही सेवा लागल्यास जरुर सांगा. V.narsikar १२:३९, १६ सप्टेंबर २००९ (UTC)

Call for participation/mr From Strategic Planning मी याचे भाषांतरे सुरु केले आहे. नरसिकर भाषांतर करावयाची १,२,३ व ४ ही पाने edit साठी उघडत नाही. नरसिकर

स्टॅटेजी प्लॅनिंग पान १ कृपया तपासुन final करावे.

V.narsikar विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/1‎ पान क्र.२ वर आपला कुशल हात फिरवावा.

V.narsikar


विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/1‎ पान क्र.२ वर मी केलेले भाषांतर व आपण केलेले भाषांतर यापैकी योग्य ते ठेवावे. ते दोन ठिकाणी (वर व खाली) repeat झालेले आहे. अल्पमती १०:५८, १८ सप्टेंबर २००९ (UTC)


विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/1‎ पान क्र.४ वर थोडे भाषांतर टाकले आहे.ते कृपया तपासावे व बाकी भाषांतर पण टाकावे.मी आज व उद्या तेवढा वेळ देउ शकत नाही. busy आहे. अल्पमती ०५:११, १९ सप्टेंबर २००९ (UTC)

स्थानांतरण[संपादन]

नमस्कार, दोन किंवा अधिक नावांच्या पानांचे स्थानांतरण मला जमलेले नाही. उदा : अलेक्सांद्र सोल्झेनित्झिन हे अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन येथे स्थानांतर करून पाहिले. अस्तीत्वात असलेल्या नावाच्या लेखात स्थानांतरण कसे करावे?
en:List of U.S. state birds, सारखे मराठीत मानचिन्हे असलेल्या पक्ष्यांवर लेख लिहायचा आहे, त्यातील गॅलरी किंवा टेबल याबद्दल संभ्रम आहे, मला फक्त गॅलरीचा वापर करता येतो, टेबल, त्यात विविध रंग भरण्यासाठीच्या कमांड्स मला माहीत नाहीत, कृपया मदत करा. Gypsypkd ११:००, १९ सप्टेंबर २००९ (UTC)


'A' , 'B' ,'C' तपासले.काहीच चुका नाहीत. बाकी मग तपासुन सांगतो.

अल्पमती १०:२०, २२ सप्टेंबर २००९ (UTC)

'H' पर्यंत पूर्ण झाले. अल्पमती १४:१३, २२ सप्टेंबर २००९ (UTC)


विकिपीडिया वर कोठेही दिलेला एक स्वल्पविराम,एक पूर्णविराम या सारखे अल्प योगदान हे वैश्विक पातळीवर मराठीचे चिन्ह म्हणुन उमटते हा माझा प्रामाणिक समज आहे.त्यामुळे कोणत्याही कामामुळे कोठेतरी काहीनाकाही योगदान हे होतेच. तुमच्या कामात खारीचा वाटा,एव्ह्ढेच.मला विकिपीडियाची ओळख पुर्वी झाली नाही याचा मात्र कधी-कधी खेद वाटतो.

अल्पमती ०५:५८, २३ सप्टेंबर २००९ (UTC)

साचा:धडकसंख्या

नमस्कार, छंद नावाचा मूळ लेख छंद (व्याकरण) येथे हलविला आहे. छंद (हॉबी) याच्याशी गल्लत होवू नये म्हणून घेतलेली काळजी.
छंद (हॉबी, नाद) यासाठीचा वर्ग काय असावा ? या वर्गात स्टॅम्प, नाणी यांच्यापासून अनेक छंदांबद्दल लिहिता येईल. या विषयाबद्दल मराठीत फार माहिती मिळत नाही. पोस्टाची तिकिटे गोळा करणे असे मराठीत लिहावे का ? फिलॅटली या शब्दाचा अर्थ इतका साधा सरळ नाही. याबाबत तुमची मदत हवी. माझ्याकडे काही प्राथमिक माहिती आहे. Gypsypkd ०९:०४, ३ नोव्हेंबर २००९ (UTC)

मला वाटते छंद हे पान नि:संदिदग्धीकरण पान बनवावयास लागेल कारण छंद शब्दाचे इतर पण महत्वपूर्ण अर्थ होतात असे दिसते.
  1. (R) छंद, वृत्त - लयबद्ध अक्षररचना "पंडित कवींनी विविध छंदांत रचना केली आहे."
  2. (R) छंद - काचेच्या बांगडीवर रंगीबेरंगी लाखेची नक्षी केलेली बांगडी "कासारणीने सुंदर छंद आणले होते."
  3. (R) छंद - नक्षीदार, चांदीच्या जाड सुताचे पैंजण "सोनाराकडे छंद करायला टाकले आहेत."
  4. (R) छंद - वेदांचे एक अंग, ह्यात वेदांच्या उच्चारातील लयीसंबंधी विवेचन असते "छंद हे वेदांचे चरण मानले जातात."
मला वाटते छंद (व्याकरण) एवजी छंद (पद्य) असे केलेतर कसे असेल आणि त्याचा वर्गिकरण छंद (व्याकरण) किंवा छंद (पद्य) आणि मुख्य वर्ग वर्ग:मराठी व्याकरण


philately word phil or philo, meaning an attraction or affinity for something, and ateleia, meaning "exempt from duties and taxes" to form "philatelie" या ग्रिक शब्दांच्या सयोगाने बनलेल्या ग्रिक शब्दांचा हि अर्थ व्यूत्पत्ती पोस्टाच्या तिकिटे गोळा करणे या अर्थाच्या जवळपास सुद्धा पोहोचत नाही तरी पण तो परंपरेने वापरात आहे.एकच किंवा कमी शब्द इतक्यात तरी सूचण्याची शक्यता दिसत नाही.
फिलॅटली शब्द तसाच ठेवून 'पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह असा लेख टेवून छंद हा त्याचा विभाग ठेवावा वर्गीकरण पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह त्याला दोन वर्गीकरणात टाकावे एक वर्ग:संग्रह (मुख्य वर्ग:संस्कृती) आणि दुसरे वर्ग:छंद (आवड) (मुख्य वर्ग:मनोरंजन) असणे श्रेयस्कर असेल असे वाटते.

माहितगार १३:२४, ३ नोव्हेंबर २००९ (UTC)

स्वागत साचा[संपादन]

माहीतगार,

साचा चांगलाच आहे. काही छोटे बदल केले आहेत ते नजरेखालून घालावेत व योग्य वाटल्यास ठेवावे.

अभय नातू १५:३९, ३ नोव्हेंबर २००९ (UTC)

नमस्कार[संपादन]


मत हवे[संपादन]

नमस्कार माहीतगार, क्रुपया साचा चर्चा:Navbox येथील माझा संदेश बघावे, व आपले मत कळवावे. --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०४:४७, २ डिसेंबर २०१० (UTC)

साचे सुसूत्रीकरण प्रकल्प invitation[संपादन]

hmmm..... नमस्कार मध्यंतरी बराच काळ मी काही अडचणींमुळे मराठी विकी वर येऊ शकलेलो नाहीये.... आज बऱ्याच काळांनी log in केले तर तुमचा संदेश वाचला... मला साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात सहभागी व्हायल आवडेलच.. अनिरुद्ध परांजपे ०६:०३, २२ जानेवारी २०११ (UTC)

.

विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!
नमस्कार, माहीतगार

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा[संपादन]

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:०५, ११ जून २०१२ (IST)[reply]

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत[संपादन]

नमस्कार माहीतगार,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.