चर्चा:कुसुमावती देशपांडे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुसुमावती यान्च्या नावामागे "बंडखोर" असे विशेषण लाविले आहे . याला आधार कोणता? Ulhas Deshpande ०७:१९, ११ मे २००७ (UTC)

मूळ लेखात ’बंडखोर’ शब्द दिसत नाही. -इति सदस्य:J
नमस्कार,@J: कृ. लेखाचा हा इतिहास पहावा, सदस्य:Ulhas Deshpande यांनी स्वत:च २० मे २००७ ला त्यांना अपेक्षीत बदल करून घेतला.या गोष्टीला ६ वर्षे ५ महिने झाले आहेत .
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:२८, २७ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

मूळ लेख असा: --

कुसुमावती देशपांडे
जन्म नाव कुसुमावती आत्माराम देशपांडे
जन्म नोव्हेंबर १०, १९०४
मृत्यू नोव्हेंबर १७, १९६१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
वडील रामकृष्ण रावजी जयवंत
पती अनिल

कुसुमावती देशपांडे (नोव्हेंबर १०, १९०४ - नोव्हेंबर १७, १९६१) (माहेरचे नाव कुसुम जयवंत) या मराठीतील लेखिका व समालोचक होत्या.

कुसुमावतींचा जन्म विदर्भात झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रावबहादुर रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. प्राथमिक शिक्षण अमरावतीला व पुढचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. शिष्यवृत्तीसह त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या परीक्षेत त्यांना सुवर्णपदक मिळाले, आणि मध्य प्रांत-विदर्भ सरकारची (सी.पी. ॲन्ड बेरार सरकारची) विशेष शिष्यवृत्ती मिळवून त्या इंग्लंडला गेल्या. पुढे इंग्रजी साहित्यातली लंडन विद्यापीठाची पदवी मिळवून कुसुमावती १९२९ला भारतात परतल्या. त्याच वर्षी त्यांचा आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ कवी अनिल यांच्याशी विवाह झाला.

नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये केवळ मुलगे शिकत असल्याने त्यांना इंग्रजीच्या प्राध्यापकाची नोकरी स्त्री म्हणून नाकारली गेली. शेवटी गव्हर्नरपर्यंत जाऊन, भांडून कुसुमावतींनी ती नोकरी मिळविली. त्यानंतर त्यांनी काही काळ नागपूर आकाशवाणी केंद्रात(१९५६) आणि नंतर दिल्लीच्या केंद्रात त्यांनी कार्यक्रम संचालक म्हणून काम केले.

ग्वाल्हेरला भरलेल्या त्रेचाळीसाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कुसुमावतींना वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी मिळाला. या पदासाठी पहिली स्त्री सन्मानित झाली या विषयी त्या वेळी लोकांच्या मनात एक अपूर्वाईची आणि आनंदाची भावना होती. ती सतत कानावर पडत राहिली, तेव्हा कुसुमावती काहीशा खेदाने म्हणाल्या होत्या, "मध्ययुगीन स्त्रीदाक्षिण्याचे का हे दिवस आहेत?'

वाङ्‌मयसेवा[संपादन]

सुरुवातीला ‘प्रतिभा’ पाक्षिकात कुसुमावती देशपांडे यांचे ललित लेख व कथा प्रकाशित झाल्या. पुढील आयुष्यात त्‍यांनी मराठी लघुकथेला नवीन रूप आणि चैतन्य बहाल केले. मराठी वाङ्‌मयसमीक्षेच्या क्षेत्रात यांनी केलेले लेखन फार मोलाचे आहे.

"पासंग" या १९५४ साली प्रकाशित झालेल्या संग्रहात त्यांच्या लेखांचे संकलन आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • कुसुमनिल (पत्रसंग्रह)
  • दीपकळी(कथासंग्रह)
  • दीपदान(कथासंग्रह)
  • दीपमाळ(कथासंग्रह)
  • चंद्रास्त (ललित लेखसंग्रह)
  • पासंग(लेखसंग्रह)
  • मध्यरात्र (ललित लेखसंग्रह)
  • मध्यान्ह (ललित लेखसंग्रह)
  • मराठी कादंबरी पहिले शतक (समीक्षाग्रंथ)
  • मोळी(कथासंग्रह)
  • रमाबाई रानडे यांच्या आठवणींचा इंग्रजी अनुवाद

काव्यसंग्रह[संपादन]

  • कुसुमावती (कवितासंग्रह, संपादन कवयित्री डॉ. अनुराधा पोतदार)

गौरव[संपादन]

{{DEFAULTSORT:देशपांडे,कुसुमावती}} [[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]] [[वर्ग:मराठी लेखिका]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]