समुद्र गरुड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
समुद्र गरुड
शास्त्रीय नाव
(Haliaeetus leucogaster)
कुळ गृध्राद्य
(Accipitridae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश व्हाइट बेलीड सी ईगल
(White-bellied Sea Eagle)
संस्कृत उत्क्रोश, श्वेतोदर समुद्र सुपर्ण


समुद्री गरुड, वकस, काकण घार, बुरुड, पाण कनेर, कनोर (इंग्रजी: Whitebellid sea eagle;) हा गृध्राद्य पक्षिकुळातील एक शिकारी पक्षी आहे.

समुद्री गरुड हा घारीपेक्षा आकाराने मोठा पक्षी आहे. याचा रंग वरून करडा असतो. डोके, मान व खालचा भाग पांढरा शुभ्र असतो तर शेपटीच्या टोकाचा भाग पांढरा शुभ्र असतो. उडताना पांढऱ्या पंखांखालची काळी किनार व पाचरीच्या आकाराची यांनी या पक्ष्याची ओळख पटते. हा पक्षी आकाशात उडताना पाठीवरच्या पंखांचा आकार इंग्रजी अक्षर V सारखा दिसतो. यामध्ये नर-मादी दिसायला सारखे असतात. हे समुद्रकिनाऱ्यावर एकटे किवा जोडीने आढळून येतात.

वितरण[संपादन]

मुंबईपासून दक्षिणेस पश्चिम किनारा आणि पूर्व किर्यावरीलबांगला देशात समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेश आणि किनाऱ्यापासून काही अंतरावर आढळतात .श्रीलंका ,लक्षद्विप,अंदमान आणि निकोबार बेट ,तसेच गुजरात मध्ये भटकताना दिसतात .दक्षिण भारतात नोव्हेंबर -मार्च तर उत्तरेकडे जानेवारी ते एप्रिल या काळात आढळतात .

निवास्थाने[संपादन]

हे पक्षी समुद्र किनारी राहतात.

संदर्भ व नोंदी[संपादन]