विष्णु नारायण भातखंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विष्णू नारायण भातखंडे या पानावरून पुनर्निर्देशित)
विष्णू नारायण भातखंडे

विष्णु नारायण भातखंडे
आयुष्य
जन्म ऑगस्ट १०, १८६०
जन्म स्थान मुंबई
मृत्यू सप्टेंबर १९, १९३६
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
वांशिकत्व हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
संगीत साधना
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

विष्णू नारायण भातखंडे (ऑगस्ट १०, १८६० - सप्टेंबर १९, १९३६) हे हिंदुस्तानी संगीताचे संशोधक, संगीतकार, गायक होते. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या वर्गीकरणाची थाट पद्धत विकसित केली.

बालपण व शिक्षण[संपादन]

विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म ऑगस्ट १०, १८६० रोजी जन्माष्टमीच्या दिवशी मुंबई येथील वाळकेश्वर भागात झाला. लहानपणापासूनच त्यांचे संगीतकलेवर विशेष प्रेम होते. वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षी ते उत्तम बासरी वाजवायचे. मराठी शाळेतील व हायस्कूलचे शिक्षण झाल्यानंतर भातखंडे एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी.ए. झाले. याच काळात त्यांनी गोपालगिरी यांच्याकडून सतारीचे धडे आत्मसात केले.[१]

जीवन व कार्य[संपादन]

इ.स. १८८५ साली ते कायद्याचे पदवीधर झाले व इ.स. १८८७ सालापासून वकिली करू लागले. पुढे काही काळ कराचीच्या न्यायालयात त्यांनी वकिली केली. भातखंडे यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांत वल्लभदास दामुलकर नावाच्या सतारवादकांकडून सतार शिकायला आरंभ केला. पुढे पं. रावजीबुवा बेलबागकर नावाच्या ध्रुपदगायकाकडून ते गायकी शिकू लागले. गायकी व हिंदुस्तानी संगीताच्या इतर पैलूंबाबत त्यांना प. बेलबागकर, उस्ताद हुसेन खाँ, उस्ताद विलायत हुसेन खाँ यांचेही मार्गदर्शन लाभले. पत्नी व मुलीच्या निधनानंतर भातखंडे यांनी वकिली सोडून पूर्णपणे संगीताभ्यासाला वाहून घेतले. १९०६ मधे मनरंग वंशाच्या महंमद अली ह्यांच्याशी त्यांचा परीचय झाला. त्यांच्या ३०० वर ख्याल गायनाच्या ध्वनीमुद्रीकांचा त्यांनी अभ्यासुन त्या आत्मसात केल्या. त्यांनी भरताच्या नाट्यशास्त्राचा आणि संगीत रत्नाकर या प्राचीन भारतीय संगीतविषयक ग्रंथांचा अभ्यास चालवला होताच; पण आता त्यांनी हिंदुस्तानी संगीतातील विस्कळीत वैविध्याला पद्धतशीर सैद्धांतिक चौकटीत बसवण्याकरता प्रयत्न केले. त्यातूनच त्यांनी राग, रागिण्या आणि पुत्ररागांमध्ये वर्गीकरण करण्याच्या जुन्या पद्धतीऐवजी 'थाट पद्धत' नावाची नवी वर्गीकरण पद्धत हिंदुस्तानी संगीतामध्ये आणली.[१] उत्तर भारतीय संगीतात दहा थाटांची पद्धत ही पं भातखंडे ह्यांच फार मोठं कार्य आहे. त्याचबरोबर सरळ व‌ सोपी संगीत नोटेशन पद्धती ची देणगी ही त्यांनी संगीत क्षेत्रास दिली. माँरीस काँलेज आँफ म्युझीक ची ही स्थापना पं भातखंडे नी केली.


निधन[संपादन]

उतारवयात भातखंडे पक्षाघात व मांडीच्या अस्थिभंगामुळे अंथरुणास खिळून होते. १९ सप्टेंबर १९३६ रोजी, गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांचे निधन झाले.

भातखंडे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • हिंदुस्थानी संगीत पद्धती भाग १ ते ५ (एकूण १९५८ पाने)
  • लक्ष्य संगीत
  • अभिनव रागमंजीरी
  • क्रमीक पुस्तक मालीका
  • Historical Survey of Indian Music
  • Comparative Study - The system of 15th, 16th and 17th Century

स्मरणार्थ[संपादन]

  • अल्मोडाचे भातखंडे संगीत महाविद्यालय
  • जबलपूरचे भातखंडे संगीत महाविद्यालय
  • डेहराडूनचे भातखण्डे हिंदुस्तानी संगीत महाविद्यालय
  • लखनौचे भातखण्डे संगीत संस्थान विश्वविद्यालय
  • विलासपूरचे भातखंडे संगीत महाविद्यालय
  • त्यांच्या स्मरणार्थ भारतीय पोस्टाने भातखंडे यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट काढले होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b रातंजनकर, श्री.ना. "संगीताचार्य पं. विष्णू नारायण भातखंडे" (PDF). महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ. Archived from the original (PDF) on 2016-04-11. १९ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.