फोर सीझन्स हॉटेल (मुंबई)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फोर सीझन्स हॉटेल, मुंबई या पानावरून पुनर्निर्देशित)

फोर सीझन्स हॉटेल, मुंबई हे वरळी भागातील एक ऐशारामी हॉटेल आहे.[१] हे हॉटेल टोरोंटो येथील फोर सीझन्स लक्झरी हॉटेल्सची एक शाखा आहे.[२] या पंचतारांकित हॉटेलमध्ये २०२ सूट (एकाधिक खोल्यांची निवासस्थाने) आहेत[३] तसेच भारतातील सर्वात उंच आणि मोकळी हवा असणाऱ्या या फोर सीझन हॉटेलच्या गच्चीवर बारची व्यवस्था आहे.[४] फोर सीझन हॉटेलची भारतीय उपखंडातील ही पहिली मोठी गुंतवणूक आहे.

इतिहास[संपादन]

फोर सीझन्स हॉटेल, मुंबईचे ३७ मजल्याचे बांधकाम इ.स. २००८ मध्ये पूर्ण झाले.[५] या हॉटेलचे डिझाईन लोहान असोसिएट्सच्या जॉन अर्जरो या हाँग काँग मधील डिझाईनरने, तर आतील संरचना बिलकेम लिंक्स यांनी केली आहे.[६] फोर सीझन हॉटेलचे बांधकाम भारतीय संस्कृतीमधील बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून व त्या विचारात घेऊन केले होते. फोर सीझन हॉटेलचे बांधकाम १.५ वर्षात पूर्ण झाले त्यात प्रत्येक ८ दिवसांनी एक स्लॅब तयार होत होता. साधारणतः फोर सीझन हॉटेलची वास्तु एक वर्षाच्या आतच पूर्ण झाली. भारतातील सर्वात वेगाने तयार झालेल्या वास्तूंपैकी ही एक आहे. दिल्ली येथे राहाणारे श्री संजीव गर्ग, जी.एम. अहलुवालिया या कंत्राटदारांनी या वास्तूच्या कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या आहेत.

मुंबईच्या फोर सीझन हॉटेलमध्ये ही रेस्टॉरन्टे आहेत :-

  1. कॅफे प्राटो ॲन्ड बार
  2. पूल डेक[७]
  3. स्यान की

फिटनेस सेवा[संपादन]

व्यायामशाळा[संपादन]

हॉटेलमधील व्यायामशाळेत (जिममध्ये) अत्याधुनिक व्यायामाची साधने आहेत. यात कार्डियोव्हॅस्क्युलर तसेच इतर उपकरणांचा समावेश आहे. येथे योगासने शिकविण्यासाठी गुरू आहेत. स्पा

स्पा[संपादन]

या होटेलमध्ये ब्यूटीपार्लर तसेच मालिशकेंद्र आहे. येथे आपोहा मिजरा, ओजस, तुळा, मुक्त, थाई ब्लिस, कु.नए, सोल हार्मनी, हीलिंग हॉटस्टोन यांसारखे आयुर्वेदिक तसेच पाश्चात्य मालिशचे प्रकार उपलब्ध आहेत. याशिवाय येथे रोझानो फेररटी नावाचे केश कर्तनालय आहे.

हाऊस कीपिंग[संपादन]

हॉटेलच्या हाऊस कीपिंग विभागाशी संपर्क साधून व हॉटेल मधील वेळांचे नियोजन करून अतिथीने आपले सूट सदैव स्वच्छ व आल्हाददायक करवून घ्यावेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "शहरातील सर्वात आरामदायी बिछाना - खबरची" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "फोर सीझन्स हॉटेलचे मुंबईत आगमन" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "फोर सीझन्स हॉटेल सहा अधिक मालमत्ता खरेदी करणार आहेत" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "फोर सीझन्स हॉटेल, मुंबई मध्ये आश्चर्यचकित करणारे एर बार" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "फोर सीझन्स हॉटेल,मुंबई,इंडिया" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "फोर सीझन्स हॉटेल,मुंबई,बांधकाम आणि उद्योग" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "फोर सीझन्स हॉटेल वैशिष्ट्ये" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)