पद्मा तळवलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पद्मा तळवलकर
आयुष्य
जन्म २८ फेब्रुवारी १९४९
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
जोडीदार पं.सुरेश तळवलकर
अपत्ये सत्यजित तळवलकर सावनी तळवलकर
संगीत साधना
गायन प्रकार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत
घराणे जयपूर-अत्रौली
संगीत कारकीर्द
पेशा गायकी
गौरव
पुरस्कार संगीत अकादमीचा मुख्य पुरस्कार

पद्मा तळवलकर (माहेरच्या पद्मा सहस्रबुद्धे) या जयपूर-अत्रौली घराण्याच्या लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका आहेत.

पद्मा तळवलकर यांचे आजोबा काणेबुवा हे कीर्तनकार होते. त्यामुळे घरात गाणे होते. गाणे शिकण्यासाठी पद्मा तळवलकरांना घरातून आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. पुढे शिष्यवृत्ती मिळवून मुंबईला गाणे शिकायला गेल्यावर त्यांचा संगीताचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला. अनुभवासाठी वयाच्या तेराव्या वर्षापासून त्या छोटेखानी मैफली करू लागल्या.

पद्मा तळवलकरांचे संगीतातले गुरू[संपादन]

पद्माताई जेव्हा मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडे गाणे शिकायला गेल्या तेव्हा त्यांनी ‘नाट्यपदे सोडणार असशील, तर शिकवेन’ असे बजावले. पद्मा तळवलकरांनी तत्क्षणी नाट्यपदे गाणे सोडले आणि मोगूबाईंचे शिष्यत्व पत्करले.

गंगाधर पिंपळखरे, किशोरी अमोणकर, निवृत्तीबुवा सरनाईक, गजानन जोशी हे पद्माताईंचे अन्य गुरू.

पुरस्कार[संपादन]

  • संगीत नाटक अकादमी मुख्य पुरस्कार (२०१७)