युनायटेड किंग्डमची संसद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रिटिश संसदेची मुद्रा
थेम्स नदीकाठावरील वेस्टमिन्स्टर राजवाडा येथे संसदेचे कामकाज चालते.

युनायटेड किंग्डमची संसद अथवा ब्रिटिश संसद (Parliament of the United Kingdom) ही युनायटेड किंग्डम ह्या देशाचे सर्वोच्च विधिमंडळ आहे. संविधानाने ब्रिटिश संसदेला सर्व कायदेशीर अधिकार दिले असून ब्रिटनचा राजा अथवा राणी (सध्या एलिझाबेथ दुसरी) संसदप्रमुख आहे.

ब्रिटिश संसदेची वरिष्ठ (हाउस ऑफ लॉर्ड्स) व कनिष्ठ (हाउस ऑफ कॉमन्स) ही दोन सभागृहे आहेत व संसदेचे कामकाज लंडनच्या सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरमधील वेस्टमिन्स्टर राजवाडा ह्या ऐतिहासिक वास्तूमध्ये चालते.

ब्रिटिश संसदेचे एकूण १,४९५ सदस्य आहेत ज्यांपैकी ८४५ सदस्य हाउस ऑफ लॉर्ड्स गृहामधील तर ६५० सदस्य हाउस ऑफ कॉमन्स गृहामधील आहेत. हाउस ऑफ कॉमन्सचे सदस्य लोकशाही मार्गाने निवडून येतात. सदस्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असून त्यांना सांसदीय निवडणुकांमध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे.

भारतासह जगातील अनेक संसदांची रचना ब्रिटिश संसदेवरून घेण्यात आली आहे.

बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 51°29′57.5″N 00°07′29.1″W / 51.499306°N 0.124750°W / 51.499306; -0.124750