Jump to content

नादिया कोमानेची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नादिया एलेना कोमानेची (रोमेनियन उच्चार:ˈnadi.a koməˈnet͡ʃʲ, नादिया कोमानीच) (नोव्हेंबर १२, इ.स. १९६१ - ) रोमेनियन-अमेरिकन जिम्नॅस्ट आहे. कोमानेचीने १९७६ च्या मॉंत्रियाल ऑलिंपिकमध्ये तीन सुवर्णपदके जिंकताना ऑलिंपिक जिम्नॅस्टिक्सच्या इतिहासात सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवत जागतिक उच्चांक केला. याशिवाय तिने १९८० च्या मॉस्को ऑलिंपिकमध्ये दोन सुवर्णपदके मिळवली. कोमानेची जगप्रसिद्ध जिम्नॅस्टांपैकी एक आहे.[][][] इ.स. २०००मध्ये लॉरियस जागतिक क्रीडा अकादमीने तिचा समावेश विसाव्या शतकातील महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये केला.[]

बालपण

[संपादन]

नादिया कोमोनेचीचा जन्म जॉर्ज आणि स्टेफानिया-अलेक्झांड्रियाना कोमोनेची यांच्या घरात रोमेनियाच्या ओनेश्टी शहरात झाला.[][] स्टेफानिया-अलेक्झांड्रिया नादियाच्या वेळी गर्भवती असताना तिने एक रशियन चित्रपट पाहिला होता. त्यातील नायिकेचे नाव नादेझ्दा (आशा) असे होते. त्याने प्रभावित झालेल्या स्टेफानियाने आपल्या मुलीचे नाव नादेझ्दाचे लघुकरण करून नादिया असे ठेवले.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ The Columbia Electronic Encyclopedia, 6th ed. (2007). "Gymnastics". September 6, 2007 रोजी पाहिले.
  2. ^ British Olympic Association (2007). "British Olympic Association [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 2007-09-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 6, 2007 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ "Munchkin leads European charge of gymnastics" (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) CBC sports, June 3, 2008
  4. ^ "नादिया कोमानेची". CNN. July 7, 2008.
  5. ^ "Olympic Champion Nadia Comăneci[मृत दुवा] Young Athlete, August 1978
  6. ^ Letters to a Young Gymnast. Comăneci, Nadia. 2004, Basic Books. ISBN 0-465-01276-0 pg. 4
  7. ^ Letters to a Young Gymnast. Comăneci, Nadia. 2004, Basic Books. ISBN 0-465-01276-0 pg. 5