कनकदुर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कनकदुर्ग
नाव कनकदुर्ग
उंची
प्रकार स्थलदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
जवळचे गाव दापोली,हर्णे
डोंगररांग
सध्याची अवस्था बरी
स्थापना {{{स्थापना}}}


कनकदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड .

कसे जाल?[संपादन]

हर्णे बंदर दापोली तालुक्यामधे असून तो रत्‍नागिरी जिल्ह्यामधे आहे. कोकणामधील महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. दापोलीपासून सोळा कि.मी. अंतरावर हर्णे आहे. हर्णेच्या सागरातील सुवर्णदुर्ग किल्ल्याबरोबर किनाऱ्यावरील या तिन्ही किल्ल्यांनाही भेट देता येते.

पाहण्यासारखे[संपादन]

हर्णेच्या किनाऱ्यावर दक्षिणेकडे टेकडीवजा एक भूशिर घुसलेले आहे. या लहानश्या टेकडीवजा भूशिरावर कनकदुर्गचा किल्ला उभा आहे. कनकदुर्गाच्या पूर्व बाजूला मच्छिमारांच्या अनेक होड्या दिसतात. या होड्यांमध्ये जाण्यासाठी कनकदुर्गाला लागूनच धक्का बांधलेला आहे. या धक्क्यावर जाण्यासाठी पुलासारखा रस्ता आहे. या रस्त्याने चालत गेल्यावर कनकदुर्गावर जाण्यासाठी केलेल्या पायऱ्यांचा मार्ग दिसतो. या पायऱ्यांच्या बाजूलाच भक्कम बांधणीचा बुरुज आहे. काळ्या पाषाणातील हा बुरूज म्हणजे कनकदुर्ग. पायऱ्यांच्या मार्गाने पाचच मिनिटांमधे कनकदुर्गावर पोहोचता येते. गडाच्या माथ्यावरच्या इमारती आता नष्ट झाल्या असून त्या भागात दीपगृह उभे असलेले दिसते. कनकदुर्गावरून मुरुड दाभोळ तसेच गोपाळगडापर्यंतचा सागरकिनारा दिसतो. पश्चिमेकडे अथांग सागराची अधुनमधून चमचमणारी किनार आणि सागराची गाज दिसते. उत्तरेकडे फत्तेदुर्गाची टेकडी मच्छिमारांच्या वस्तीने पूर्णपणे घेरलेली दिसते. कनकदुर्गावरील गडपणाचे अवशेष काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत. कनकदुर्गाकडून परत फिरल्यावर डावीकडील टेकडी म्हणजे फत्तेदुर्ग आहे. मच्छिमारांच्या वस्तीने व्यापलेल्या फत्तेदुर्गावरचे अवशेष केव्हाच लुप्त झालेले आहेत.

संदर्भ[संपादन]

बाहय दुवे[संपादन]