तानसेन
पं. तानसेन ऊर्फ रामतनु ऊर्फ तन्नामित्र, त्रिलोचन, तनसुख (जन्म - इ.स. १५३२, बेहट, ग्वाल्हेर - मृत्यु - २६ एप्रिल १५८५) हे अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध नवरत्नांपैकी एक रत्न होते. पं. तानसेन हे संगीतशास्त्रात निपुण होते. त्यांना 'मियां तानसेन' असे सुद्धा म्हणत.
पं. तानसेन ह्यांच्या वडिलांचे नाव मकरंद पांडे होते. त्यांच्याकडेच पं. तानसेन ह्यांचे प्रारंभिक शिक्षण घेतले. सुफी संत गौस मोहंमद ह्यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यानंतर त्यांनी
वृदांवन येथील गुरू स्वामी हरीदास्यांचेहशिष्यत्व स्वीकारलेते. त्यांच्याकडुन .पं तानसेन ह्यांनी २०० च्या पेक्षा अधिक धृपदे आत्मसात केली. त्यांच्याकडपं. तातानसनह्यांनी े सुमारे १० वर्षे संगीताचे शिक्षण घेतले.
तानसेन ह्यांचा आवाज अतिशय गोड पण मर्दानी व पल्लेदार होता. मीयां मल्हार, मीयां का सारंग व मीयां की तोंडी ह्यासारखे नवीन राग तानसेन ह्यांनी शोधुन काढले.
रबाब नावाचे वाद्य त्यांनी तयार करून विकसीत केले. संगीतसार व रामाला हे दोन ग्रंथ पं. तानसेन ह्यांनी लिहीले.
पं. तानसेन हे एक उत्तम गायक होता. त्यामुळे रेवा संस्थान नरेश राजा रामचंद्र यांनी तानसेन यांना राजगायक म्हणुन नेमले होते. व नंतर अकबर बादशहाने खुप सारे सोने देउन पं. तानसेन ह्यांची मागणी केली ज्याला रामचंद्र नाही म्हणु शकले नाहीत. अकबराला न दुखवण्यासाठी त्यांनी भेट म्हणून पं.तानसेन ह्यांना देउन टाकले.
पं. तानसेन हे अकबर बादशहा याच्या दरबारातील नवरत्नापैकी एक होते. त्यांच्या पत्नीचे नाव हुसेनी होतो. त्यांना चार मुले व एक मुलगी होती. सुरतसेन, शरदसेन, तरंगसेन व विलास खान आणि मुलगी सरस्वती असे होते.
तानसेन यांनी निर्माण केलेले शास्त्रीय संगीतातले राग
[संपादन]काव्यरचना
[संपादन]- संगीतसार
- रागमाला
- श्रीगणेश स्तोत्र