थॉमस वॉटरफील्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मृत्यू: ऑक्टोबर ५, २००१

थॉमस वॉटरफील्ड हे जन्माने ब्रिटिश व पुढे भारतीय नागरिकत्व स्वीकारलेले माजी ब्रिटिश सनदी अधिकारी व अनुवादक साहित्यिक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना निवृत्त करण्यात आले. तरीही त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारून भारतात - महाराष्ट्रातच राहण्याचे ठरवले. भारतावर, महाराष्ट्रावर, इथल्या संस्कृतीवर, माणसांवर त्यांचे प्रेम होते.

रवींद्रनाथ टागोर, लालचंद हिराचंद यांची आत्मचरित्रे तसेच साने गुरुजींचे श्‍यामची आई या पुस्तकांचे त्यांनी इंग्रजीत भाषांतर केले आहे.