चिकबल्लपूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चिकबल्लपूर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

चिकबल्लपूर (ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ ಲೋಕ ಸಭೆ ಚುನಾವಣಾ ಕ್ಷೇತ್ರ) हा कर्नाटक राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९७७ साली अस्तित्वात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये बंगळूर ग्रामीण जिल्ह्यामधील ४, चिकबल्लपूर जिल्ह्यामधील ३ तर बंगळूर शहरी जिल्ह्यामधील १ असे एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ह्या मतदारसंघात आजवरच्या ११ निवडणुकांमध्ये १० वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८० एम.व्ही. कृष्णप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ एस.एन. प्रसन कुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ व्ही. कृष्ण राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ व्ही. कृष्ण राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ व्ही. कृष्ण राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ आर.एल. जलप्पा जनता दल
बारावी लोकसभा १९९८-९९ आर.एल. जलप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ आर.एल. जलप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ आर.एल. जलप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ एम. वीरप्पा मोईली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ एम. वीरप्पा मोईली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९- बी.एन. बचे गौडा भारतीय जनता पक्ष

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]