अम्मान (अरबी: عمّان) ही मध्य पूर्वेतीलजॉर्डनची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आणि देशाचे आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र आहे. [१] देशाच्या पश्चिम भागात वसलेले अम्मान शहर जॉर्डनचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र मानले जाते. २०१४ साली ४० लाख लोकसंख्या असलेले अम्मान अरब जगतातील सर्वात उदारमतवादी व पश्चिमात्य विचाराधारा असलेल्या शहरांपैकी एक मानले जाते. अम्मान हे लेव्हेंट प्रदेशातील सर्वात मोठे शहर आहे आणि अरब जगातील पाचवे क्रमांकाचे शहर आहे. [२] हे सर्वात आधुनिक अरब शहरांमध्ये आणि प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. [३][४]