कालिका देवी (उज्जैन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कालिका देवीचे हे मंदिर अतिप्राचीन असून ते कालिका घाटात आहे. देवीच्या अनेक रूपांपैकी कालिका मातेचे हे रूप अत्यंत प्रभावी आहे. कवी कालिदास कालिका देवीचे उपासक होते. कालिदासांनी या मंदिरात पूजा-अर्चना करण्याची सुरुवात केल्यापासून त्यांची प्रतिभा बहरली असे मानले जाते. त्यांनी रचलेले शामला दंडक हे कालिका स्तुतिपर स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. महाकवी कालिदासांच्या मुखातून सर्व प्रथम हेच स्तोत्र प्रकट झाले होते. या प्राचीन मंदिराचा इतिहास कुणालाच माहीत नाही, परंतु या मंदिराची स्थापना महाभारत काळात झाली असून मूर्ती सत्य युगातील असल्याचे मानले जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार सम्राट हर्षवर्धन यांनी केल्याचा उल्लेख आढळतो. संस्थानी राजवटीत ग्वाल्हेरच्या महाराजांनी मंदिराचे पुनर्निर्माण केले.

कालिकादेवी गडाचा शक्तिपीठात समावेश नाही. परंतु उज्जैनमध्ये हरसिद्धि शक्तिपीठ असल्यामुळे या मंदिराचे महत्त्व वाढले आहे.