सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विदर्भाबाहेर असलेला महाराष्ट्रातील हा एकमेव व्याघ्रप्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात वसलेला आहे. सातारा जिल्ह्यात असलेले कोयना अभयारण्य व शेजारच्या सांगली , कोल्हापूर जिल्ह्यात विस्तारलेलं चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून हा व्याघ्र प्रकल्प निर्माण झाला आहे. मेळघाट, ताडोबा-अंधारी व पेंच व्याघ्र प्रकल्पानंतर घोषित झालेला हा चौथा व्याघ्र प्रकल्प आहे.[१]
भौगोलिक क्षेत्रफळ
[संपादन]कोयना आणि चांदोली अभायरण्याचे संरक्षित क्षेत्र मिळून २००७ मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. हा व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्र ११६५.५७ किमी२ असून याचे बफर क्षेत्र ६००.१२ किमी२ आणि अतिसंवदेनशील अधिवास क्षेत्र ५६५.४५ किमी२ आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्राच्या सीमा एकूण चार आहेत.[२]
उत्तर सीमा
[संपादन]उत्तर सीमे मध्ये दाभे तुर्क, झाडाणी, सालोशी, दोडाणी, रेनोशी, रुळे, गावडोशी, आवळण, वालना, अहिर, दरा (इनाम), बामणोली, फळणी, कास, भांबवली, धावली, नावळी, वेणखोल गावांची शीव, या गावांचा समावेश आहे.
पूर्व सीमा
[संपादन]पूर्व सीमे मध्ये नित्रळ, निगुडवाडी, दिघवळे, टेकवली, खडगाव, ठोसेघर, बोपोली, सावघर, निवकणे, दिवशी खुर्द खिवशी, बोंद्री घेरादातेगड येराड, शिरळ, मारुल, वांझोळे, गोपटवाडी, गोवारे, काडोली चाफेर, रिसवड, पांचगणी गुरेघर, काहीर, पळशी, तामीण, उदावळे, रुळे, उमरकांचन, निगडा, घोटील, मेढा, निवी, काळगाव गावांची शीव या गावांचा समावेश आहे.
दक्षिण सीमा
[संपादन]दक्षिण सीमे मध्ये आरळे, सोनवडे, शितुर गावांची शीव व उदगिरी, गोळवणे, परळे निनाई, वाकोली, चांदोली, केले, तळवडे, आंबा गावांतील वनेत्तर क्षेत्र इत्यादी गावांचा समावेश आहे.[३]
पश्चिम सीमा
[संपादन]पश्चिम सीमे मध्ये रत्नागिरी जिल्हा हद्द, बामणोली, मारळ, निगुडवाडी, कुंडी गावांची शीव, कुंडी स.नं. ५९, ५२,५१,६७, ६८, रत्नागिरी जिल्हा हद्द, रातावी स.नं. २० (भाग), रत्नागिरी जिल्हा हद्द, निवे स.नं. ४४, ४२, ३९, ४१, ४०, ३९, ३८, ७२, ७१, कुंभाउ स.नं. १८८, १९७,१०३ इत्यादी भागाचा समावेश आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- | महाराष्ट्र टाईम्स मधील लेख[permanent dead link]
- | लोकसत्ता पेपरमधील लेख[मृत दुवा]
- | गर्जा महाराष्ट्र या मराठी संकेतस्थळावरून साभार Archived 2009-10-05 at the Wayback Machine.
संदर्भ
[संपादन]- ^ "चांदोली व्याघ्र प्रकल्प आकार घेतोय". Maharashtratimes.com (Marathi भाषेत). 18 April 2010. 24 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्राचा तपशील" (PDF). ntca.gov.in (Marathi भाषेत). 24 October 2022. 24 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 24 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "भटकंती : भुरळ घालणारा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प". esakal.com (Marathi भाषेत). 25 September 2020. 24 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)