Jump to content

भगवद्गीता जशी आहे तशी (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
'भगवद् गीता जशी आहे तशी' पुस्तकाचे मुखपृष्ठ

भगवद्गीता जशी आहे तशी हे मूळ इंग्लिश पुस्तक भगवत गीता ॲज इट इज याचे मराठी भाषेतील अनुवादित पुस्तक आहे. गीतेवरील ही मूळ टीका इस्कॉनचे संस्थापक श्री प्रभुपादस्वामींनी लिहिली आहे. इस्कॉनसंस्थेने या गीतेचे प्रकाशन केले आहे.

या पुस्तकामध्ये, गीतेतील प्रत्येक श्लोक, श्लोकातील शब्दांचे अर्थ, अन्वय, श्लोकाचा अनुवाद व त्या श्लोकाचा सारांश इत्यादी माहिती दिली आहे. त्यानंतर लेखकाचा परिचय दिला आहे. नंतर ग्रंथसूची दिलेली आहे, त्यात ’भगवद्‌गीता जशी आहे तशी’तील सर्व तात्पर्यांसाठी प्रमाणभूत वैदिक ग्रंथांचे नाव दिले आहे. त्या नंतर विशेष शब्दांचे अर्थ सांगणारी शब्दावली दिली आहे. शेवटी एकूण ७०० श्लोकांपैकी, प्रत्येक श्लोकाच्या पहिल्या शब्दाची अकारविल्हे सूची दिली आहे.