इंग्लिश खाडी
Appearance
इंग्लिश खाडी (इंग्लिश: English Channel, फ्रेंच: ला मांचे) हा इंग्लंड व फ्रान्स ह्या देशांना वेगळा करणारा अटलांटिक महासागराचा एक भाग आहे. इंग्लिश खाडी उत्तरी समुद्राला अटलांटिक महासागरासोबत जोडते. इंग्लिश खाडीची लांबी ५६० किमी तर रुंदी २४० किमी ते ३४ किमी एवढी आहे. ह्या खाडीचा सर्वात अरुंद भाग (३४ किमी) डोव्हरची सामुद्रधुनी ह्या नावाने ओळखला जातो.
इंग्लिश खाडीतील पाणी उथळ व शांत आहे व सर्वसाधारणपणे बिनाधोक्याचे मानले जाते. ह्या कारणास्तव आजवर ही खाडी पोहुन पार करण्याचे अनेक यशस्वी प्रयत्न झाले आहेत.