उत्तरायण (पतंगोत्सव)
उतरायण हा भारत देशाच्या गुजरात आणि राजस्थान या राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे.[१] जानेवारी महिन्यात गुजरात मध्ये दरवर्षी पतांगांचा विशेष उत्सव साजरा केला जातो.[२] सुमारे महिनाभर आधी या उत्सवासाठी पतंग तयार करण्याचे काम सुरू केले जाते.[३] सूर्याच्या उत्तरायणाचे स्वागत हे या सणाचे वैशिष्ट्य मानले जाते.[२]
स्वरूप
[संपादन]या उत्सवातील विशेष खाद्यपदार्थ म्हणून तिळाची वडी, उंधियु म्हणजे तीळाचे वाटण घालून केलेली मिश्र भाजी, तसेच जिलबी हे खास आकर्षण मानले जाते.[४] यानिमित्ताने केली जाणारी खिचडी हे ही या सणाचे वैशिष्ट्य आहे.[५]
पतंगांचा व्यापार
[संपादन]सुरत आणि अहमदाबाद येथे पतंग तयार करण्याचे कारखाने आहेत. विविध व्यापारी वर्षानुवर्षे हे पतंग तयार करण्याचे काम स्थानिक पातळीवर करीत असतात. उत्तरायण काळात पतंगांची विक्रीची उलाढाल मोठ्या प्रमाणावर केली जाते.[६] घरोघरी सहकुटुंब पतंग उडविले जातात तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन पतंगोत्सव साजरा केला जातो.[७]
संदर्भ
[संपादन]- ^ "Uttarayan 2022: Food, kite flying and other traditions of Makar Sankranti". Newsd.in (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी पाहिले.
- ^ a b "Makar Sankranti 2021: Here's Why Gujarat's Uttarayan Festival Is Unique". NDTV.com. 2022-01-08 रोजी पाहिले.
- ^ "Kite sellers in Gujarat's Surat expect good sales ahead of Uttarayan festival". ANI News (इंग्रजी भाषेत). 2022-01-08 रोजी पाहिले.
- ^ Desai, Anjali H. (2007). India Guide Gujarat (इंग्रजी भाषेत). India Guide Publications. ISBN 978-0-9789517-0-2.
- ^ Taneja, Parina (2022-01-07). "Makar Sankranti 2022: Date, Shubh Muhurat, Important beliefs related to the festival of kites". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-08 रोजी पाहिले.
- ^ "Kite sellers in Gujarat's Surat expect good sales ahead of Uttarayan festival". ANI News (इंग्रजी भाषेत). 2022-01-08 रोजी पाहिले.
- ^ Desai, Nikita (2010-06-09). A Different Freedom: Kite Flying in Western India; Culture and Tradition (इंग्रजी भाषेत). Cambridge Scholars Publishing. ISBN 978-1-4438-2310-4.