कासुकाबे (सैतामा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कासुकाबे, सैतामा या पानावरून पुनर्निर्देशित)
कासुकाबे
春日部市
शहर
कासुकाबे is located in जपान
कासुकाबे
कासुकाबे
कासुकाबेचे जपानमधील स्थान
देश जपान ध्वज जपान
प्रांत सैतामा
क्षेत्रफळ ६६ चौ. किमी (२५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १०८,३०८ (२०२१)
  - घनता ३,५०० /चौ. किमी (९,१०० /चौ. मैल)
city.kasukabe.lg.jp/ (जपानी)


कासुकाबे (जपानी: 春日部市, रोमन लिपी: Kasukabe) हे जपानमधील सैतामा प्रीफेक्चरमध्ये स्थित एक विशेष दर्ज्याचे शहर आहे. १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत, शहराची अंदाजे लोकसंख्या १०८,३०८ कुटुंबांमध्ये एकूण २३३,२७८ होती आणि लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर ३५०० व्यक्ती होती. शहराचे एकूण क्षेत्रफळ ६६.०० चौरस किलोमीटर (२५.४८ चौरस मैल) आहे. कासुकाबे हे किरी-तानसू (桐箪笥), पारंपारिक तानसू ड्रेसर्सच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, जे पाउलोनिया लाकडापासून बनवले जाते. पाउलोनिया झाड आर्थिक आणि सांस्कृतिक द्रुष्ट्या मूल्यवान आहे. ते शहराचे "अधिकृत शहर वृक्ष" म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.[१]

भूगोल[संपादन]

कासुकाबे हे सुदूर पूर्व सैतामा प्रांतात स्थित आहे. ते शिमोसा पठार आणि ओमिया पठार यांच्यामध्ये विभागलेले आहे. त्याच्या शेजारी नाकागावा सखल प्रदेश आणि एडोगावा नदी आहे.[२] शहराचा पूर्वेकडील भाग अजूनही ग्रामीण आहे, आणि त्यामधे सैतामा मधील भातशेतीचे क्षेत्र सर्वात जास्त आहे.[३]

आसपासच्या नगरपालिका[संपादन]

कासुकाबेच्या आजूबाजूला पुढील नगरपालिका आहेत:[२]

हवामान[संपादन]

कासुकाबेमधे दमट उपोष्णकटिबंधीय हवामान आहे ज्यामध्ये उबदार उन्हाळा आणि थंड हिवाळा असतो व  हलका ते नगण्य हिमवर्षाव असतो. कासुकाबे येथील सरासरी वार्षिक तापमान १४.५ अंश सेल्सियस आहे. सरासरी वार्षिक पाऊस १४०८ मिमी असून सप्टेंबर मध्ये  सर्वात जास्त पाऊस असतो. ऑगस्टमध्ये सरासरी तापमान २६.३ अंश सेल्सियस आणि जानेवारीमध्ये सर्वात कमी म्हणजे २.८ अंश सेल्सियस असते.[४]

लोकसंख्या[संपादन]

कासुकाबे सिटी हॉल

जपानी जनगणनेच्या आकडेवारीनुसार,[५] १९६० पासून कासुकाबेची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे.

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोकसंख्या फरक %
१९६० ५०,०८८
१९७० १,०३,८२८ +१०७.३%
१९८० १,८७,९१३ +८१.०%
१९९० २,२६,४४९ +२०.५%
२००० २,४०,९२४ +६.४%
२०१० २,३७,१७८ -१.६%

इतिहास[संपादन]

कासुकाबेचा परिसर प्राचीन मुसाशी प्रांताचा भाग होता. प्राचीन दफन ढिगाऱ्यांवरून असे दिसून येते कि तिथे किमान जोमोन काळापासून लोकवस्ती आहे. एडो कालखंडात निक्को—कैडो महामार्गावरील टपाल कार्यालय असल्यामुळे कासुकाबेची भरभराट झाली. कासुकाबे शहर महामार्गावर एडो (प्राचीन तोक्यो) व निक्को शहरांना जोडत होते.[६]

कासुकाबे हे शहर १ एप्रिल १९८९ रोजी आधुनिक नगरपालिका प्रणालीच्या स्थापनेसह मिनामिसैतामा जिल्ह्यात, सैतामामध्ये निर्माण करण्यात आले. १ एप्रिल १९४४ रोजी कासुकाबेने शेजारच्या उचिमाकी गावाचा ताबा घेतला. १ जुलै, १९५४ रोजी, टोयोहारू, ताकेसाटो, कोमात्सु आणि टोयोनो ही गावे जोडल्यानंतर कासुकाबेला शहराचा दर्जा देण्यात आला. १ ऑक्टोबर २००५ रोजी, जुने कासुकाबे शहर आणि शोवा शहर (किताकात्सुशिका जिल्ह्यातील) नवीन आणि विस्तारित कासुकाबे शहरात विलीन झाले. कासुकाबेला १ एप्रिल २००८ रोजी विशेष शहराचा दर्जा देण्यात आला, ज्यामुळे स्थानिक स्वायत्तता वाढली.[७]

इतर[संपादन]

मँगा, आणि ॲनिमे मालिका क्रेयॉन शिन-चॅन हे मालिकेमध्ये कासुकाबे येथे स्थित आहे.[८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2021-11-25. 2021-11-21 रोजी पाहिले.
  2. ^ a b "संग्रहित प्रत". Archived from the original on 2021-11-27. 2021-11-27 रोजी पाहिले.
  3. ^ https://japancrops.com/en/municipalities/saitama/kasukabe-shi/
  4. ^ Kasukabe climate data
  5. ^ Kasukabe population statistics
  6. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2007-12-12. 2021-11-27 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link).
  7. ^ https://chiicomi.com/information/1762748/
  8. ^ "Crayon Shin-chan Manga Creator Usui Missing Since Friday". Anime News Network. September 15, 2009. September 16, 2009 रोजी पाहिले.