ब्रॉड गेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेल्वे गेज
आकारमानानुसार
Graphic list of track gauges

किमान गेज
  15 Inch 381 mm. (15 Inch)

नॅरो गेज
  600 मिमी,
२ फूट
597 मिमी
600 मिमी
603 मिमी
610 मिमी
(1 फूट 11+12 इंच)
(1 फूट 11+58 इंच)
(1 फूट 11+34 इंच)
(2 फूट)
  750 मिमी,
बॉस्नियन गेज,
२ फूट ६ इंच,
800 मिमी
750 मिमी
760 मिमी
762 मिमी
800 मिमी
(2 फूट 5+12 इंच)
(2 फूट 5+1516 इंच)
(2 फूट 6 इंच)
(2 फूट 7+12 इंच)
  स्वीडिश ३ फुटी,
900 मिमी,
3 फूट
891 मिमी
900 मिमी
914 मिमी
(2 ft11+332 इंच)
(2 फूट 11+716)
(3 फूट)
  मीटर गेज 1,000 मिमी (3 फूट 3+38 इंच)
  ३ फूट ६ इंच 1,067 मिमी (3 फूट 6 इंच)
  ४ फूट ६ इंच 1,372 मिमी (4 फूट 6 इंच)

  प्रमाण गेज 1,435 मिमी (4 फूट 8+12 इंच)

ब्रॉड गेज
  रशियन गेज 1,520 मिमी
1,524 मिमी
(4 फूट 11+2732 इंच)
(5 फूट)
  आयरिश गेज 1,600 मिमी (5 फूट 3 इंच)
  आयबेरियन गेज 1,668 मिमी (5 फूट 5+2132 इंच)
  भारतीय ब्रॉड गेज 1,676 मिमी (5 फूट 6 इंच)
  अमेरिकन ६ फूट गेज 1,829 मिमी (6 फूट)
  ब्रुनेल गेज 2,140 मिमी (7 फूट 14 इंच)

ब्रॉड गेज हा लोहमार्गांवरील अनेक रेल्वे गेजपैकी सर्वात रूंद गेज आहे. ह्या गेजमध्ये लोहमार्गाच्या दोन रूळांमधील अंतर १६७६ मिमी किंवा ५ फूट ६ इंच इतके असते. ब्रॉड गेज प्रामुख्याने भारतीय उपखंडावरील भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेशश्रीलंका तसेच दक्षिण अमेरिका खंडातील आर्जेन्टिनाचिली ह्या देशांमध्ये वापरला जातो.

भारत देशात १८५० पूर्वी रेल्वे मालवाहतूक प्रमाण गेजमार्गे होत असे. परंतु ब्रिटिश राजवटीदरम्यान ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवे कंपनीची भारतामधील पहिली प्रवासी रेल्वे १८५३ साली मुंबईठाणे शहरांदरम्यान धावली. ह्या गाडीसाठी ब्रॉड गेजचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर भारतभर ब्रॉड गेजचे मार्ग बांधले जाऊ लागले. आजच्या घडीला भारतीय रेल्वे पूर्णपणे ब्रॉड गेजवर धावते. बहुतेक सर्व नॅरो गेजमीटर गेज लोहमार्ग ब्रॉड गेजमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. परंतु दिल्ली मेट्रोकोलकाता मेट्रोवरील काही मार्ग वगळता बहुतेक सर्व मेट्रो रेल्वेमार्ग मात्र प्रमाण गेज वापरतात.

ब्रॉड गेजचा जगभरातील वापर[संपादन]

देश रेल्वे लोहमार्गाची लांबी टीपा
आर्जेन्टीना सान मार्तिन रेल्वे चालू
आर्जेन्टीना सार्मियेन्तो रेल्वे चालू
आर्जेन्टीना मित्रे रेल्वे चालू
आर्जेन्टीना रोका रेल्वे चालू
बांग्लादेश बांगलादेश रेल्वे ६८२ किलोमीटर (४२४ मैल) चालू
चिली चिली राष्ट्रीय रेल्वे चालू
भारत भारतीय रेल्वे ६७,३६८ किलोमीटर (४१,८६१ मैल) चालू
भारत दिल्ली मेट्रो ६५ किलोमीटर (४० मैल) केवळ लाल, निळी व पिवळी मार्गिका; चालू
भारत कोलकाता मेट्रो २७.२२ किलोमीटर (१६.९१ मैल) केवळ मार्गिका १; चालू
इराण झाहिदान पासून पाकिस्तान सीमेपर्यंत चालू
नेपाळ नेपाळ रेल्वे ५९ किलोमीटर (३७ मैल) चालू
पाकिस्तान पाकिस्तान रेल्वे ७,७९१ किलोमीटर (४,८४१ मैल) चालू
श्रीलंका श्रीलंका रेल्वे १,५०८ किलोमीटर (९३७ मैल) चालू
अमेरिका सॅन फ्रान्सिस्को भागातील बे एरिया रॅपिड ट्रान्सिट १०९ मैल (१७५ किमी) चालू
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत