चोपडा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चोपडा विधानसभा मतदारसंघ - १० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, चोपडा मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुका आणि यावल तालुक्यातील किनगांव, साकळी ह्या महसूल मंडळे यांचा समावेश होतो. चोपडा हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

शिवसेना पक्षाच्या लताबाई सोनवणे ह्या चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ लताबाई चंद्रकांत सोनवणे शिवसेना
२०१४ चंद्रकांत बळीराम सोनवणे शिवसेना
२००९ जगदीशचंद्र रमेश वळवी (जगदीशभाऊ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९:चोपडा
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना लताबाई सोनवणे ७८,१३७ ३९.१८%
राष्ट्रवादी जगदीशचंद्र वळवी ५७,६०८ २८.८९%
अपक्ष प्रभाकरप्पा गोटू सोनवणे ३२,४५९ १६.२८%
अपक्ष डॉ. बारेला चंद्रकांत जामसिंग १७,०८५ ८.५७%
बसपा ADV. याकुब साहेबू तडवी ५,३६९ २.६९%
बहुमत २०,५२९ १०.२९%
मतदान १,९९,४१८ ६४.६५%
एकूण नोंदणीकृत मतदार ३,०८,४४१

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

हे देखील पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".