ऊर्मिला बळवंत आपटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उर्मिला आपटे या पानावरून पुनर्निर्देशित)
उर्मिला बळवंत आपटे
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण मुंबई विद्यापीठ
पेशा गणिताचे व्याख्याते - संस्थेचे नेते
संचालकमंडळाचे सभासद भारतीय स्त्री शक्ती संघटनेचे संस्थापक
धर्म हिंदू
पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार
संकेतस्थळ
उर्मिला आपटे

उर्मिला बळवंत आपटे ह्या एक भारतीय महिला असून त्यांनी इ.स. १९८८ मध्ये 'भारतीय स्त्री शक्ती (बीएसएस) संस्थेची' स्थापना केली, ज्याद्वारे त्यांनी महिला सशक्तीकरणाचे कार्य केले. या कार्यासाठी उर्मिला आपटे यांना इ.स. २०१८ मध्ये भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[१][२]

वैयक्तिक आयुष्य[संपादन]

आपटे यांनी मुंबई विद्यापीठातून गणितामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असून त्या एक गणितज्ञ आहेत. १९६९ मध्ये त्यांनी मुंबईच्या विविध महाविद्यालयांमध्ये गणित शिकवण्यास सुरुवात केली.[२]

आपटे यांनी इ.स. १९८८ मध्ये 'भारतीय स्त्री शक्ती (बीएसएस)' संस्थेची स्थापना केली. बीएसएस ही महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणारी एक संस्था आहे.[३] ही संस्था महिलांचे शिक्षण आणि कौशल्य विकास, मानसिक आणि शारीरिक आरोग्य, स्वाभिमान, आर्थिक स्वातंत्र्य तसेच लिंग समानता या पंचसूत्रीवर मोहीम, सर्वेक्षण, संशोधन, कार्यशाळा, प्रशिक्षणांच्या माध्यमातून सपुदेशनाचे कार्य करते. याद्वारे देश आणि कुटुंबासाठी महिलांनी दिलेले भरीव योगदान ओळखण्याचे आणि ते समाजापुढे मांडण्याचे व समाजप्रबोधन करण्याचे काम होते.[४]

आपटे यांनी १९९५ पर्यंत भारतीय स्त्री शक्तीच्या अध्यक्षा म्हणून काम केले. त्याच वर्षी त्या या संस्थेच्या अखिल भारतीय संघटन सचिव बनल्या आणि या पदावर त्या २०२४ पर्यंत कार्यरत होत्या. या काळात त्यांनी या संघटनेच्या कार्यात स्वारस्य असणाऱ्या आणि संस्थेसाठी योगदान देणाऱ्या लोकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भारतभर प्रवास करत भेटीगाठी केल्या. या संघटनेच्या भारतातील दहा राज्यांमध्ये किमान एकतरी शाखा असून भारतात एकूण ३३ शाखा आहेत. इ.स. २०१४ पासून आपटे बीएसएसच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेवर आसनस्थ आहेत.[२]

इ.स. १९८८ ते २०१८ पर्यंत भारतीय स्त्री शक्ती संस्थेस तीस वर्षे झाली. यासाठीचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी दोन दिवसांच्या बैठकीत भारतभरातून १,००० प्रतिनिधीनी उपस्थिती लावली.[५]

भूषवलेली पदे आणि कार्य[६][संपादन]

  1. ११९६९ ते १९७७ पर्यंत मुंबईतील महाविद्यालयांमध्ये गणिताचे व्याख्याते.
  2. 'भारतीय स्त्री शक्ती' (बीएसएस)चे संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष. (१९८९ - १९९५)
  3. 'भारतीय स्त्री शक्ती'च्या अखिल भारतीय संघटन सचिव. (१९९५ ते २०१४ पर्यंत)
  4. २०१४ पासून 'भारतीय स्त्री शक्ती'च्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्य.
  5. १९९२ ते २०१६ या कालावधीत पीपल्स एज्युकेशन सोसायटी, दादर, मुंबईच्या सचिव आणि विश्वस्त.
  6. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, दादर, मुंबईच्या अध्यक्ष आणि विश्वस्त २०१६ पासून आजपर्यंत.
  7. भारतीय स्त्री शक्तीची स्थापना करण्यासाठी भारतभर प्रवास केला; बीएसएसच्या सध्या १० राज्यांमध्ये एकूण ३३ शाखा आहेत.
  8. अभाविपच्या माजी कार्यकर्त्या.

शासकीय पदे आणि कार्य[६][संपादन]

  1. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य, १९९६ ते १९९८ पर्यंत
  2. महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी समुपदेशन केंद्रांच्या प्रकल्पाच्या देखरेख समितीच्या पोलीस ठाण्यात सदस्य, (टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या सहकार्याने) महाराष्ट्र सरकार.
  3. माजी सदस्य, जिल्हा पर्यवेक्षी मंडळ, मुंबई, जन्मपूर्व निदान तंत्र (गैरव्यवहार नियमन आणि प्रतिबंध) अधिनियम - १९९४ अंतर्गत
  4. सदस्य, 'महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण वित्त निगम लिमिटेड, मुंबई'च्या महिला तक्रार निवारण समिती.

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

आपटे यांना इ.स. २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१] हा पुरस्कार राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात देण्यात आला. यात त्यांना त्यांना पुरस्कार आणि १,००,००० रुपयांचे बक्षीस मिळाले. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. त्या वर्षी ३९ व्यक्ती किंवा संस्थांचा सन्मान करण्यात आला.[७][८]

Urmila Balavant Apte getting the Nari Shakti Puraskar from President Kovind

पुरस्कारांची यादी[६][संपादन]

  1. नारी शक्ती पुरस्कार - २०१७, महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार.
  2. स्त्री शक्ती पुरस्कार -२०१०, बृहन् मुंबई महानगर पालिका, मुंबई
  3. ओजसवानी अलंकरण - २००८ भोपाळ (मध्य प्रदेश)

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Nari Shakti Puraskar - Gallery". narishaktipuraskar.wcd.gov.in. 2021-09-17 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "Smt. Urmila Apte – Bharatiya Stree Shakti" (इंग्रजी भाषेत). 2021-09-17 रोजी पाहिले.
  3. ^ "Urmila Balwant Apte - Nari Shakti Awardee 2017 - YouTube". www.youtube.com. 2021-01-08 रोजी पाहिले.
  4. ^ "Meet Ms. Urmila Balawant Apte, #NariShakti Puraskar 2017 awardee". Indian government press site. 7 January 2021 रोजी पाहिले.
  5. ^ Jan 13. "Bharatiya Stree Shakti discusses various issues | Nagpur News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-09-17 रोजी पाहिले.
  6. ^ a b c "Smt. Urmila Apte".
  7. ^ "International Women's Day: President Kovind honours 39 achievers with 'Nari Shakti Puraskar'". The New Indian Express. 2021-01-08 रोजी पाहिले.
  8. ^ "सिंधुताईंसह उर्मिला आपटेंचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव होणार". marathi.abplive.com. 2021-01-08 रोजी पाहिले.