योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कार्य करण्याची रूपरेखा म्हणजे योजना होय. योजना ही सामान्यत: उद्देश साध्य करण्यासाठी वापरली जाणारी आकृती तपशील किंवा वेळेनुसार करावयाची कामे आणि त्यासाठी लागणारी संसाधने यांची यादी असते. योजना संरचित असल्यास त्याचा उपयोग जास्त असू शकतो. औपचारिकरित्या बनवलेली योजना बहुविध लोक वापरतात. मोठे प्रकल्प , मुत्सद्देगिरी , कारकीर्द , आर्थिक विकास , लष्करी मोहिम, लढाई , खेळ , किंवा इतर व्यवसायाच्या व्यवहारात योजना वापरून यश मिळवले जाते असे दिसून येते. नियोजित योजन नसल्यास कार्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात आणि वेळ आणि पैसा यांचा अपव्यवय होतो. यासाठी नियोजन आवश्यक असते. भविष्यकाळातील कार्याचे स्वरूप व पद्धती ठरविणे म्हणजे नियोजन होय.[१]

इतिहास[संपादन]

ऐतिहासिक काळापासून योजनाबद्ध कार्य झालेले दिसून येते. उअदा. भारतात पृथू नामक राजाने योजनाबद्ध रितीने जमिनीचा विकास केला. त्यासाठी त्याने शेती आणि नगर रचना आणि रस्ते बांधणी शास्त्र विकसित करून घेतले होते. अशी नोंद स्मृतींमध्ये आढळते. या राजाच्या नावावरून आपल्या ग्रहाला पृथ्वी हे नाव दिले गेले आहे.

नियोजन[संपादन]

नियोजन हे व्यवस्थापनाचे कार्य आहे ज्यामध्ये ध्येय निश्चित करणे आणि ते साध्य करण्यासाठी करावयाच्या विविध क्रियाकलापांचा समावेश केला जातो. या अंतर्गत ठरवले जाते काय करायचे? ते कधी करायचे? ते कधी करायचे आहे? आणि ते कोणाकडून करायचे आहे? या सर्व प्रश्नांबाबत निर्णय घेणे याला नियोजन म्हणतात, ज्याला आपण इंग्रजीत Planning म्हणतो.

नियोजक[संपादन]

कार्यपद्धती[संपादन]

टॉप-डाऊन प्लॅनिंग सारख्या संकल्पनेत ( डाउन -अप प्लॅनिंगच्या विरुद्ध म्हणून) टॉप-डाऊन मॉडेलच्या मागे असलेल्या सिस्टमशी समानता दिसून येते .

योजनांची उदाहरणे[संपादन]

  • आर्किटेक्चरल योजना
  • व्यवसाय योजना
  • फ्रेगप्लान
  • उड्डाण योजना
  • आरोग्य योजना
  • विपणन योजना
  • सैनिकी योजना
  • प्रकल्प योजना
  • साइट योजना
  • पंचवार्षिक योजना
  • प्रधानमंत्री जन धन योजना
  1. ^ "vikaspedia Domains". mr.vikaspedia.in. 2021-05-08 रोजी पाहिले.