उर्दू विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उर्दू विकिपीडिया
उर्दू विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
स्क्रीनशॉट
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा उर्दू
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://ur.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण २७ जानेवारी, इ.स. २००४
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

उर्दू विकिपीडिया ( उर्दू: اردو ویکیپیڈیا ), जानेवारी २००४ मध्ये सुरू झालेली, विकिपीडियाची उर्दू भाषेतील आवृत्ती आहे.[१][२] १ एप्रिल २०२१ रोजी यात १,६२,६०४ लेख, १,२७,८२१ नोंदणीकृत वापरकर्ते आणि १०,९६६ संचिका होत्या आणि ही लेखसंख्येप्रमाणे ५०वी सर्वात मोठी आणि लेखखोलीच्या दृष्टीने २१वी विकिपीडियाची आवृत्ती होती.[३] जानेवारी २०२० मध्ये या आवृत्तीत १.०४ कोटी पृष्ठ दृश्ये होते.[४]

इतिहास[संपादन]

मे २००१ मध्ये विकिपीडिया बहुभाषिक होण्यास सुरुवात झाली. प्रथम, उर्दू विकिपीडियाला उर्दू स्क्रिप्ट फॉन्टसह तांत्रिक अडचणी आल्या, परंतु आता ही बाब बहुधा मिटविली गेली आहे; काही न सोडवविलेले भाग शिल्लक आहेत. उजवीकडून डावीकडे लिहिली जाणारी फारसी-अरबी लिपी मध्ये उर्दू भाषा लिहिली जाते. परिणामी, वापरकर्त्यांना कधीकधी त्यानुसार त्यांची ऑपरेटिंग सिस्टम आणि वेब ब्राउझर समग्राकृत करण्याची आवश्यकता असते.

विकिपीडिया आंतरपृष्ठ आणि प्रकल्प माहिती पृष्ठांचे उर्दू भाषांतर अद्याप प्रगतीवर आहे. संपादन कसे करावे याविषयीचे काही पृष्ठे भाषांतरित केले गेले आहेत.

महत्त्वाच्या टप्प्यांचे कालक्रम[संपादन]

तारीख महत्त्वाचा टप्पा [५]
१९ जून २००६ १,०००
१३ ऑगस्ट २००६ २,०००
१५ मार्च २००७ ५,०००
२९ मार्च २००९ १०,०००
२८ ऑक्टोबर २०१२ २०,०००
२०१४ ४०,०००
२४ एप्रिल २०१४ ५०,०००
१२ ऑगस्ट २०१५ ७५,०००
२९ डिसेंबर २०१५ १०,००,००० [६]
डिसेंबर २०१७ १,२५,००
२३ नोव्हेंबर २०१९ १,५०,०००

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "کراچی میں وکی پیڈیا صارفین کا تاریخی اجلاس" (उर्दू भाषेत). Karachi: Karachi Updates. October 19, 2009. Archived from the original on April 30, 2014. 2009-10-23 रोजी पाहिले.
  2. ^ "Wikipedians meetup in Pakistan" (उर्दू भाषेत). Karachi: News Urdu. October 19, 2009. Archived from the original on October 23, 2009. 2009-10-23 रोजी पाहिले.
  3. ^ "List of Wikipedias - Meta". Meta.wikimedia.org. 14 October 2017 रोजी पाहिले.
  4. ^ Total page views - ur.wikipedia.org, Wikimedia Statistics, December 31th 2020
  5. ^ m:Wikimedia News
  6. ^ Wikipedia:Milestone statistics

बाह्य दुवे[संपादन]