कला, वक्तृत्व, कौशल्य, नृत्य, नाट्य व अभिनय यांसाठी पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यादी[संपादन]

  • नर्गिस दत्त महिला पतसंस्थेतर्फे नर्गिस दत्त पुरस्कार : अभिनेत्री केतकी माटेगावकर व अभिनेता ओम भूतकर यांना.
  • उत्कर्ष कलामंचचे बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते दिले गेलेले रणरागिणी पुरस्कार : भरतनाट्यम नर्तिका आणि गोखले कन्स्ट्रक्शनच्या संचालक पूनम गोखले, अभिनेत्री देविका दप्तरदार, अभिनेत्री व दिगदर्शिका प्रतिमा दाते, गरजूंना वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉ. अनिता पाटील आणि पोलीस अधिकारी मनीषा झेंडे यांना.
  • गानवर्धन संस्थेतर्फे ’अप्पासाहेब जळगावकर स्मृती स्वर-लय-रत्‍न’ पुरस्कार : पेटीवादक सुधीर नायक यांना
  • साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने दिला गेलेला साई पुरस्कार : नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांना.
  • नांदी संस्थेतर्फे कृष्णदेव मुळगुंद यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा कला समर्पण पुरस्कार : कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस आणि रंगकर्मी योगेश सोमण यांना.
  • रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टचा ’रोटरी युवा गुणवत्ता’ पुरस्कार : जलतरणपटू आणि ’यलो’ चित्रपटातील अभिनेत्री गौरी गाडगीळ यांना.
  • ब्रह्मानंद कला मंडळाचा ब्रह्मनाद कलागौरव पुरस्कार : नर्तक पं. डॉ. नंदकुमार कपोते यांना.
  • पुण्याच्या श्री महर्षी व्यास प्रतिष्ठानचा
    • राम डवरी कलागौरव पुरस्कार : शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान-केतकर यांना
    • महर्षी व्यास पुरस्कार : पोटोदा गावाच्या आदर्श ग्रामपंचायतीला.
  • कीर्तन जुगलबंदी परिवारातर्फे इचलकरंजी येथील ज्येष्ठ तबलावादक बाबुराव गुरव यांना जगतगुरू पुरस्कार, पुण्यातील हार्मोनिअमवादक बापू सुतार यांना पं. श्रीनिवास जोगळेकर पुरस्कार (१५ मार्च २०१४)
  • आनंद परिवारातर्फे अभिनेते कै.आनंद अभ्यंकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा पहिला आनंदरंग पुरस्कार : पडद्यामागे काम करणाऱ्यादिनेश गोसावी यांना.
  • द आर्ट ॲन्ड म्युझिक फाउंडेशनचा ’पुणे पंडित पुरस्कार’ : अमिताभ बच्चन यांना.
  • शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ’राम कदम कलागौरव’ पुरस्कार सुरेश वाडकर यांना
  • आकुर्डी येथील विजया महिलाविकास केंद्रातर्फे विशेष पुरस्कार : सिनेजगतातील मेकअप आर्टिस्ट पंढरीदादा जुकर यांना.
  • पुणे जिल्हा परिषदेतर्फे कला शिक्षक पुरस्कार : सागर बंडलकर यांना.
  • वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचा उदयोन्मुख कलाकार पुरस्कार : युवा गायक लतेश पिंपळखरे यांना.
  • नवी सांगवी (पुणे) येथील कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने कलाश्री पुरस्कार : व्हायोलीनवादक अतुलकुमार उपाध्ये यांना.
  • सांगवी (पुणे) येथील कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने कलाश्री पुरस्कार : उस्ताद सईदउद्दीन डागर यांना[१]
  • क्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारे क्रीडामहर्षी हरिभाऊ साने पुरस्कार : २००८मध्ये खो-खो पटू डॉ. मधुसूदन झंवर यांना व पार्श्‍वगायक रवींद्र साठ्ये यांना, २००९मध्ये विठ्ठल काटे व शिल्पकार डी.एस. खटावकर यांना आणि २०१० साली आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू दीपिका जोसेफ व लिटल चॅम्प आर्या आंबेकर यांना.[२]
  • पुण्यातील आपटे प्रशालेतर्फे माजी विद्यार्थ्याला देण्यात येणारा पु.ग. वैद्य पुरस्कार : अभिनेते अशोक शिंदे यांना.
  • पुणे महापालिकेमार्फत दिला जाणारा रोहिणी भाटे पुरस्कार : कथक नृत्यांगना प्रभा मराठे यांना.
  • पुणे महापालिकेमार्फत सहकलाकारांना दिला जाणारा रोहिणी भाटे सन्मान :
    • सहकलाकार बासरी वादक सुनील अवचट यांना
    • नवोदित नृत्य कलाकार अमृता गोगटे यांना
    • व्हायोलीन वादक राजलक्ष्मी पिचूमणी यांना
    • प्रकाशयोजनाकार बाळ मोघे यांना
    • ज्येष्ठ नृत्य कलाकार मैथिली राघवन यांना
  • सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठानचे
    • सुखकर्ता पुरस्कार : सचिन जांभेकर (हार्मोनियमवादन); अनंत ढगे (मूर्तिकार); प्रवीण तरडे (नाट्यदिग्दर्शक); डॉ. मोहन दरेकर (शास्त्रीय गायन) आणि रेश्मा पारितेकर (लावणी कलावंत) यांना.
    • सुखकर्ता कलाउपासक पुरस्कार : निवृत्त कॅप्टन नीलेश गायकवाड; ॲडव्होकेट दीपक गिरमे; हनुमंत तोडकर; अमित देवकुळे; शरयू मोडक; मधुकर रेवाणीकर; रेशमा ललवाणी आणि गोकुळ शिंदे यांना.
  • रावसाहेब गुरव आर्ट फाउंडेशनचा कलानिधी पुरस्कार :
  • मोहंमद रफी आर्ट्‌स फाउंडेशनचा मोहंमद रफी पुरस्कार : सुलोचना चव्हाण यांना.
  • स्वरानंद प्रतिष्ठानचा
    • अजित सोमण पुरस्कार : श्रीधर फडके.
    • केशवराव भोळे पुरस्कार : संगीतकार अविनाश चंद्रचूड आणि विश्वजित जोशी यांना(२०१२); आशिष मुजुमदार (२०१३)
    • माणिक वर्मा पुरस्कार : गायिका मंजिरी कर्वे आलेगावकर यांना(२०१२); हेमंत पेंडसे (२०१३).
    • उषा अत्रे-वाघ पुरस्कार : गायिका सुनेत्रा भागवत यांना(२०१२); वैशाली सामंत (२०१३)
    • विजया गदगकर पुरस्कार : व्हायोलीन वादक महेश खानोलकर यांना(२०१२); डॉ. नरेंद्र चिपळूणकर (२०१३)
  • अर्जुन पुरस्कार : पहा सरकारी पुरस्कार
  • आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार : फैय्याज
  • भारतीय भटके आणि विमुक्त संशोधनसंस्थेचा राजर्षी छत्रपती शाहू कलागौरव पुरस्कार : डॉ. श्रीराम लागू
  • आपुलकी सांस्कृतिक संस्थेचा कलागौरव पुरस्कार : आश्विनी कदम, मंजिरी आलेगावकर, मदन ओक, मेघना जोशी, शशी केरकर व सुरंजन खंडाळकर यांना
  • खेलरत्‍न पुरस्कार : पहा शासकीय पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : ताऱ्यांचे बेट, देऊळ, बालगंधर्व, शाळा (२०११)
  • कलामहर्षी बाबूराव पेंटर सन्मान : सई परांजपे यांना
  • आनंदराव पेंटर सन्मान : पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील फिल्म संकलक पी.के. नायर यांना
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार : सचिन पिळगावकर; उमा भेंडे (२०१२)
  • ध्यानचंद पुरस्कार : पहा सरकारी पुरस्कार
  • लता मंगेशकर पुरस्कार : संगीत दिग्दर्शक आनंदजी
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ‘मानाचा’ मुजरा पुरस्कार : विविध कलावंत, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ वगैरे (२०१२)
  • लळित रंगभूमीतर्फे लळित साहित्य पुरस्कार
  • अखिल भारतीय नाट्यविद्या मंदिर(सांगली)चा विष्णूदास भावे पुरस्कार : अमोल पालेकर (२०१२)
  • वैभव पुरस्कार : रमेश देव वगैरे १२जण
  • शंकरभय्या पुरस्कार : सुरेश तळवलकर (तबला-पखवाज वादनविद्येसाठी)
  • गिमा(ग्लोबल इंडियन म्युझिक अवॉर्ड) :
  • राज्यस्तरीय योगासन स्पर्धा पुरस्कार : सलोनी जाधव (२०१२ची सर्वोत्कृष्ट योगपटू)
  • राज्यस्तरीय योगासन सांघिक पुरस्कार : पुणे जिल्हा योग संस्था (२०१२)
  • अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कलारत्‍न पुरस्कार : मंगला बनसोडे (तमाशा कलावंत)
  • बोरीवली नाट्य परिषदेचा स्वररंगराज पुरस्कार (२००९) : फैय्याज
  • अखिल नाट्य विद्यामंदिर समिती(सांगली)आणि अखिल महाराष्ट्र राज्य नाट्य परिषद यांच्यातर्फे विष्णूदास भावे गौरव पदक(२०१०) : फैय्याज
  • ‘चंद्रलेखा’चा ज्येष्ठ रंगकर्मींसाठी असलेला शारदाबाई वाघ पुरस्कार (२०१०) : फैय्याज
  • अजित सोमण यांच्या जयंती निमित्त देण्यात येणारा स्वरशब्दप्रभू पुरस्कार : श्रीधर फडके (२०१२)
  • फिल्मफेअर मासिकातर्फे भारतीय चित्रपटांना आणि त्यांतील चित्रपटकर्मींना दिले जाणारे फिल्मफेअर पुरस्कार
  • पेबल बीच कॉंकर्सचा पेबल बीच ल्यूसिअस बीबे पुरस्कार : उदयपूरच्या महाराज अरविंदसिंह मेवाड यांच्या रॉल्स रॉयसला (२०१२)
  • कै. सुनील तारे पुरस्कार : पिंजरा फेम संस्कृती बालगुडे हिला.
  • विनोदी कलाकार वसंत शिंदे पुरस्कार : विजय पटवर्धन
  • संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दलचा पुरस्कार : शैला दातार
  • नाट्य सेवा पुरस्कार : प्रकाश पारखी
  • राम नगरकर स्मृती पुरस्कार : दशरथ वाघुले
  • पुणे महापालिकेचा रोहिणी भाटे पुरस्कार : कथ्थक गुरू शरदिनी गोळे यांना
  • पंडित सातवळेकर पुरस्कार : चित्रकार संजय शेलार
  • वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनचा वसंतराव देशपांडे युवा कलाकार पुरस्कार : तबलावादक सावनी तळवलकर
  • शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे पारंपरिक चर्मवादन पुरस्कार : दिलीप गरुड (संबळ), दत्तात्रेय माझिरे (ताशा), अर्जुन केंचे (हलगी), केदार मोरे (ढोलकी), जयंत नगरकर (चौघडा), डॉ. राजेंद्र दुरकर (मृदंग).
  • कार्टूनिस्ट्‌स राइट्‌स नेटवर्क इंटरनॅशनलचे ‘करेज इन एडिटोरियल कार्टूनिंग’ पुरस्कार : असीम त्रिवेदी (वय २५, कानपूर, भारत); अली फरजत (वय ६०, सीरिया)
  • आयसीसीचा हॉल ऑफ फेम पुरस्कार : ब्रायन लारा
  • शंकरराव जाधव प्रतिष्ठानचा तालमणी पुरस्कार : तबलावादक अविनाश पाटील
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी-चिंचवड)चा आशा भोसले पुरस्कार : संतूर वादक शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर (२०१३)
  • दया पवार पुरस्कार :
  • मराठी इंटरनॅशनल फिल्म ॲन्ड थिएटर अवॉर्ड्‌स
    • गर्व महाराष्ट्राचा पुरस्कार : आशा भोसले
    • नाटक विभाग -
      • सहायक अभिनेत्री : सीमा देशमुख (नाटक अलिबाबा आणि चाळिशीतले चोर)
      • सहायक अभिनेता : विद्याधर जोशी (नाटक अलिबाबा आणि चाळिशीतले चोर)
      • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कादंबरी कदम (टॉम ॲन्ड जेरी)
      • सर्वोत्कृष्ट अभिनेता : आनंद इंगळे (लग्नबंबाळ)
      • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : निखिल रत्‍नपारखी (टॉम ॲन्ड जेरी)
      • उत्कृष्ट नाटक : (टॉम ॲन्ड जेरी - अश्वमी थिएटर)
    • चित्रपट विभाग -
  • हृदयेश आर्ट्‌सचा हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार : आशा भोसले
  • पुणे नवरात्र महोत्सवाचे लक्ष्मीमाता कला-संस्कृती पुरस्कार : संगीतकार अजय-अतुल, नाट्य‍अभिनेते चेतन दळवी, नृत्यांगना रेश्मा मुसळे, पत्रकार मधुकर भावे व पुणे नाट्यपरिषदेचे अध्यक्ष

डॉ. सतीश देसाई यांना

  • सातारा येथील भटके विमुक्त विकास व संशोधनसंस्थेचा राजर्षी शाहू कला गौरव पुरस्कार : डॉ. श्रीराम लागू
  • वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशनचा वसंतराव देशपांडे युवा कलाकार पुरस्कार : तबलावादक सावनी तळवलकर
  • देवल स्मारक मंदिराचा नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान पुरस्कार(२०१२) : मधुवंती दांडेकर
  • ऑस्ट्रेलियाच्या सरकारचा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्कार : सचिन तेंडुलकर
  • पुलोत्सवात पु.ल. सन्मान पुरस्कार : परेश रावल
  • अनंतरंग आर्ट फाउंडेशनतर्फे विश्वजित भिडे स्मृतिप्रीत्यर्थ कलागौरव पुरस्कार : अभिनेते चारुदत्त आफळे आणि तबला वादक संजय करंदीकर
  • रावसाहेब गुरव आर्ट फाउंडेशनचे पुरस्कार :
    • कलानिधी पुरस्कार : शारदाप्रसाद अहिर, वैशाली ओक, राम खटरमल, कै. डॉ. दिवाकर डेंगळे(मृत्युपश्चात), प्रा. दिनकर थोपटे, डॉ. सुभाष पवार, डॉ. श्रीकांत प्रधान, डॉ. दत्तात्रय बनकर, डॉ. नितीन हडप यांना
    • कलानिधी जीवनगौरव (पहिला) पुरस्कार : प्रा. सुधाकर चव्हाण यांना
  • शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे दिला जाणारा राम कदम कलागौरव पुरस्कार : संगीतकार अशोक पत्की; गायक सुरेश वाडकर यांना
  • रत्‍नागिरीच्या आर्ट सर्कल, आशय सांस्कृतिकतर्फे पुलोत्सव सन्मान पुरस्कार : विजया मेहता यांना
  • एशिया पॅसिफिक ब्रॅंडर्स फाउंडेशन(मलेशिया)तर्फे ब्रॅंडलॉरेट लिजंडरी अवॉर्ड : शाहरुख खान
  • महंमद रफी आर्ट्‌स फाउंडेशनचा चौथा महंमद रफी पुरस्कार : कल्याणजी आनंदजी यांना
  • वेदकालीन शास्त्रे, पुराणे आणि त्याकाळच्या संस्कृतीचे अभ्यासक प्रभाकर सरदेशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत क्षेत्रातल्या उदयोन्मुख कलाकाराला देण्यात येणारा पुरस्कार : सतार वादिका निधी चित्कारिया हिला
  • पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला मंडळ यांच्या तर्फे शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार : लावणी नृत्यांगना संजीवनी मुळे नगरकर यांना
  • पुणे महानगरपालिकेचा अमर शेख पुरस्कार : गफूर शेख
  • संगीतोन्मेष संस्थेचा गीत-नृत्य-वाद्य पुरस्कार : निंबराज महाराज जाधव यांना
  • भरत मित्रमंडळ पुणे यांचा शिवशक्ती पुरस्कार : गायक सोनू निगम यांना
  • नादब्रह्म परिवार(चिंचवड) यांचा पं. रतिलाल भावसार पुरस्कार युवा गायक रमाकांत गायकवाड यांना
  • मधुरिता सारंग स्कूल ऑफ कथक(पुणे) या संस्थेचे मधुरिता स्मृती सन्मान पुरस्‍कार : अहमदबादच्या सतारवादक मंजू मेहता, आणि कथक नृत्यांगना शमा भाटे यांना.
  • नांदेड येथील प्रजावाणी आणि समर्थ संस्थेतर्फे स्वरभास्कर पुरस्कार : गायक नाथराव नेरळकर यांना
  • पुण्याच्या संत विचार प्रबोधिनीचा
    • गुरुवर्य कला पुरस्कार : हेमंतराजे मावळे यांना
    • गुरुवर्य सेवा पुरस्कार ज्योती दळवी यांना
  • आम्ही एकपात्री या संस्थेचा एकपात्री कला सन्मान : ’व्हय मी सावित्रीबाई फुले’ हा एकपात्री प्रयोग करणाऱ्या सुषमा देशपांडे यांना
  • गानवर्धनचा अप्पासाहेब जळगावकर संवादिनीवादन पुरस्कार : दिल्लीतील संगीत नाटक अकादमीच्या कथक केंद्राचे माजी संचालक जयराम पोतदार यांना
  • नृत्य कला मंदिर, चिंचवड या संस्थेचे:
    • नृत्यगुरू पुरस्कार : बंटी धारीवाल यांना
    • नृत्यभूषण पुरस्कार : पुण्यकर उपाध्याय याला
    • नृत्यश्री युवा पुरस्कार : श्रुती कुलकर्णीला
  • स्वामी विवेकानंद सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ’राम डवरी स्मृती कला गौरव’ पुरस्कार : राजदत्त
  • दत्तात्रेय येन्नेवार स्मृती पुरस्कार : बाल शाहीर प्रथमेश हांडे व प्रणव कापसे यांना
  • राजू गांधी प्रतिष्ठानचा विठ्ठल उमप पुरस्कार : बालशाहीर ओंकार चव्हाण, प्रतीक ढमे व रोहित दडवले यांना.
  • पुणे भारत गायन समाज या संस्थेतर्फे माणिक वर्मा पुरस्कार : सुनीता खाडिलकर यांना
  • संस्कृती प्रतिष्ठानचा कला पुरस्कार (२०१३) : डॉ. सलील कुलकर्णी यांना
  • संगीत कला केंद्राचा आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार (दोन लाख रुपये रोख अधिक बरेच काही) : लावणी गायिका यमुनाबाई वाईकर यांना
  • आशय सांस्कृतिकचे कृतज्ञता पुरस्कार : डॉ अभय बंग आणि राणी बंग यांना.
  • आशय सांस्कृतिकचा पु.ल. स्मृती पुरस्कार : अभिनेते परेश रावल यांना.
  • आशय सांस्कृतिकचे पुलोत्सव पुरस्कार : गुरू ठाकूर, आनंद भाटे व सुबोध भावे यांना.
  • मंगल थिएटर्स आणि मातृगौरव न्यास यांच्या तर्फे आईचा आशीर्वाद पुरस्कार : आकाशवाणी मान्यताप्राप्त कीर्तनकार-तबलावादक निवेदिता मेहेंदळे यांना
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचा
  • पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार : गायक नाट्यअभिनेत्री वंदना घांगुर्डे यांना
  • विश्वकर्मा प्रतिष्ठानचा निळू फुले स्मृती कलागौरव पुरस्कार : कुमार आहेर, सुदेश कांबळे, शांताई गडपायले, सुधाकर गव्हाळे आणि अभिषेक शिंदे यांना
  • महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार : उल्हास पवार, सदानंद मोरे यांना
  • राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार : मदर तेरेसा, बिस्मिल्लाखॉं, महंमद युनूस, तिस्ता सेटलवाड, स्वामी अग्निवेश, हर्ष मंदर, सुनील दत्त, दिलीपकुमार, मौलाना वहीउद्दीन खान, के.आर नारायणन आणि २०१३साली, उस्ताद अमजाद अली खान यांना.
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी शाखेचे पुरस्कार :
    • आचार्य अत्रे पुरस्कार : निवेदनाचे काम करणारे सुधीर गाडगीळ यांना
    • जयवंत दळवी पुरस्कार : प्रशांत दळवी यांना
    • बालगंधर्व पुरस्कार : आनंद भाटे यांना
    • विशेष पुरस्कार : केदार अभ्यंकर, नीलम कदम, सुहास गवते, सागर चव्हाण, इक्बाल दरबार, अविनाश देशमुख, मैथिली पाटील, सुहास मुळे, केतन लुंकड, प्राजक्ता वाणी, यांना
  • घोरपडकर परिवारातर्फे देण्यात येणारा मृदंगाचार्य शंकरभय्या पुरस्कार : ह.भ.प. मृदंगाचार्य ज्ञानोबा महाराज लटपटे यांना
  • पुणे भारत गायन समाजातर्फे वसुंधरा पंडित पुरस्कार : व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांना
  • सरस्वती लायब्ररी आणि साहित्यवेध प्रतिष्ठान यांच्या तर्फे भारतभूषण पुरस्कार : व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांना
  • ॲग्रिकल्चरल टूरिझमच्या वतीने देण्यात येणारा कृषी पर्यटन गौरव पुरस्कार : रोहिणी गवाणकर (वसई),आनंदराव थोपट (मोराची चिंचोली), बाबाराव पिसोरे (दौला वडगाव-बीड जिल्हा),मनोज हाडवळे (राजुरी-पुणे जिल्हा)
  • अभिनेते किरण भोगले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ’किरण पुरस्कार’ : शाहीर दादा पासलकर यांना
  • नृत्यदिग्दर्शक कै. कृष्णदेव मुळगुंद याच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यातील नांदी संस्थेतर्फे दिला जाणारा कलासमर्पण पुरस्कार (३रे वर्ष) : रंगभूषाकार प्रभाकर भावे यांना आणि नृत्यकलावंत सुचेता भिडे-चापेकर यांना.
  • ’अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर’च्या वतीने दिला जाणारा विष्णूदास भावे पुरस्कार : नाटककार महेश एलकुंचवार यांना
  • वसंतदादा सेवा संस्थेचा ’राजीव गांधी कलागौरव पुरस्कार’ : स्मिता तळवलकर यांना.
  • प्रभा अत्रे यांनी सुरू केलेला इंदिरा अत्रे पुरस्कार : कलाशिक्षक मिलिंद सबनीस यांना
  • अभिनेते किरण भोगले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी रंगभूमी आणि दीप्ती भोगले यांच्या वतीने दिला जाणारा ’किरण पुरस्कार’ : रंगकर्मी शाहीर पासलकर यांना.
  • पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार : महापालिकेचे माजी महापौर आर.एस. कुमार यांना
  • शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचा ’शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार’ : निशांत शेख यांना
  • स्व-रूपवर्धिनीचा स्वामी विवेकानंद मातृभूमी गौरव पुरस्कार : निनाद बेडेकर यांना

संदर्भ[संपादन]

  1. ^ म. टा. प्रतिनिधी, पिंपरी (२ फेब्रुवारी २०१२). "'कलाश्री' पुरस्काराने डागर यांचा गौरव". महाराष्ट्र टाइम्स. पुणे. ३० जानेवारी २०१४ रोजी पाहिले.
  2. ^ "दीपिका जोसेफ, आर्या आंबेकरला हरिभाऊ साने पुरस्कार". सकाळ. पुणे. २८ जुलै २०१०. Archived from the original on 2011-07-10. ३० जानेवारी २०१४ रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा[संपादन]