लक्ष्य मोहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सतार सरोद जुगलबंदी- लक्ष्य आणि आयुष मोहन गुप्ता

लक्ष्य मोहन गुप्ता हे एक सतारवादक आहेत. त्यांचे भाऊ, आयुष मोहन हे सरोद वादक आहेत. हे दोघे बंधू सरोद- सतार वादनाच्या जुगलबंदीचे कार्यक्रम सादर करतात.[१]

सुरुवातीचे आयुष्य[संपादन]

मोहन ह्यांच्या कुटुंबात संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नाही. ह्यांचे वडील व्यावसायिक सतारवादक नसले तरीही त्यांना सतारीची आवड होती आणि ते रिकाम्या वेळात वाजवत असत. त्यामधूनच दोघा भावांना सतारची आवड निर्माण झाली.[२]

शिक्षण[संपादन]

त्यांनी पं. रवी शंकर ह्यांचे जेष्ठ शिष्य, पं. बळवंत राय वर्मा ह्यांच्याकडे सतार वादनाचे शिक्षण घेतले. पं. बळवंत राय वर्मा ह्यांनीच आयुष मोहन ह्यांना पद्म भूषण शरण राणी ह्यांच्याकडे सरोद शिकण्याचा सल्ला दिला. सरोद आणि सतार ही दोन वाद्ये जुगलबंदीसाठी खूप छान वाटतात असेही त्यांनी सांगितले. त्यांनी मैहार घराण्याचे शिक्षण घेतले आहे.[३]

कार्यक्रम[संपादन]

त्यांनी भारतात आणि जगभरात अनेक ठिकाणी जुगलबंदीचे सादरीकरण केले आहे. त्यांचे भारतातील काही महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी काही आहेत, पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, मुंबईतील गुणीदास संगीत संमेलन, अहमदाबाद येथील सप्तक फेस्टीव्हल, दिल्लीतील विष्णू दिगंबर जयंती समारोह, नवी दिल्लीतील रवी शंकर सेंटरचा आरआयएमपीए फेस्टीव्हल, वाराणसीतील गंगा महोत्सव, दिल्ली क्लासिकल म्युझिक फेस्टिव्हल, ताज महोत्सव आणि असे अनेक.[४] ह्या व्यतिरीक्त भारताच्या बाहेरील सादरीकरणे आहेत लॉस अन्जेलेस येथील द ग्रामी म्युझियम, सन डियागो येथील डेव्हिड अंड डोर्थिया गारफील्ड थीएटर, बॉस्टन येथील लर्न क्वेस्ट म्युझिक कॉन्फरन्स, कोलंबस येथील द अबे थीएटर येथे.[५] ते आणि त्यांचे भाऊ हे लॉस अन्जेलेस येथील द ग्रामी म्युझियम मध्ये सदरीकरणासाठी आमंत्रित केलेले पहिले भारतीय आहेत.[६]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Biography". Lakshay Mohan & Aayush Mohan (इंग्रजी भाषेत). 2020-07-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Biography". Lakshay Mohan & Aayush Mohan (इंग्रजी भाषेत). 2020-07-11 रोजी पाहिले.
  3. ^ May 1, Srijani Ganguly/Mail Today; May 1, 2016UPDATED:; Ist, 2016 15:24. "The Mohan brothers are on a classical mission". India Today (इंग्रजी भाषेत). 2020-07-11 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  4. ^ "Lakshay Mohan & Aayush Mohan". Lakshay Mohan & Aayush Mohan (इंग्रजी भाषेत). 2020-07-11 रोजी पाहिले.
  5. ^ "Lakshay Mohan & Aayush Mohan". Lakshay Mohan & Aayush Mohan (इंग्रजी भाषेत). 2020-07-11 रोजी पाहिले.
  6. ^ "Lakshay Mohan & Aayush Mohan". Lakshay Mohan & Aayush Mohan (इंग्रजी भाषेत). 2020-07-11 रोजी पाहिले.