१९८६ आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८६ आशिया चषक
तारीख ३० मार्च – ६ एप्रिल १९८६
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी
यजमान श्रीलंका श्रीलंका
विजेते श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (१ वेळा)
सहभाग
सामने
मालिकावीर श्रीलंका अर्जुन रणतुंगा
सर्वात जास्त धावा श्रीलंका अर्जुन रणतुंगा (१०५)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान अब्दुल कादिर (९)
१९८४ (आधी) (नंतर) १९८८

१९८६ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही २री स्पर्धा श्रीलंकेत मार्च-एप्रिल १९८६ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांनी सहभाग घेतला. श्रीलंकेसोबत चालु असलेल्या राजकीय तणावामुळे भारताने स्पर्धेतून माघार घेतली. १९८४ दक्षिण-पुर्व आशिया चषक जिंकल्याने बांगलादेश या स्पर्धेसाठी पात्र ठरला आणि आशिया चषकात पदार्पण केले.

स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत पहिलावहिला आशिया चषक जिंकला. श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगाला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सहभागी देश[संपादन]

देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण आशिया चषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका आयसीसी संपूर्ण सदस्य १९८४ उपविजेते
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १९८४ गट फेरी
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १९८४ दक्षिण-पुर्व आशिया चषक विजेते पदार्पण पदार्पण

मैदाने[संपादन]

श्रीलंका
कोलंबो मोराटुवा कँडी कोलंबो
पैकियासोती सरवणमुट्टू मैदान डि सॉयसा मैदान असगिरिया स्टेडियम सिंहलीज क्रिकेट मैदान
सामने: १ सामने: १ सामने: १ सामने: १

गुणफलक[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३.८२३
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३.७९६
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २.७९५

साखळी सामने[संपादन]

३० मार्च १९८६
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१९७ (४५ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
११६ (३३.५ षटके)
मोहसीन खान ३९ (४६)
रवि रत्नायके ३/३२ (९ षटके)
पाकिस्तान ८१ धावांनी विजयी
पी. सारा ओव्हल, कोलंबो
सामनावीर: मोहसीन खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.

३१ मार्च १९८६
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
९४ (३५.३ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
९८/३ (३२.१ षटके)
शहीदुर रहमान ३७ (६०)
वसिम अक्रम ४/१९ (९ षटके)
मुदस्सर नाझर ४७ (९७)
जहांगीर शाह २/२३ (९ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
डि सॉयसा मैदान, मोराटुवा
सामनावीर: वसिम अक्रम (पाकिस्तान)

२ एप्रिल १९८६
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१३१/८ (४५ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३२/३ (३१.३ षटके)
असंका गुरूसिन्हा ४४ (९१)
घोलम फरुक १/२२ (८.३ षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी
असगिरिया स्टेडियम, कँडी
सामनावीर: असंका गुरूसिन्हा (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
  • बांगलादेश आणि श्रीलंका या दोन देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


अंतिम सामना[संपादन]

६ एप्रिल १९८६
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१९१/९ (४५ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९५/५ (४२.२ षटके)
श्रीलंका ५ गडी राखून विजयी
सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
  • हा सामना १९८५-८६ श्रीलंका तिरंगी मालिकेतील गट फेरीचा सामना म्हणून देखील ग्राह्य धरला गेला.
  • श्रीलंकेने प्रथमच आशिया चषक जिंकला.
  • या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका १९८६ ऑस्ट्रेलेशिया चषकाच्या उपांत्य फेरीसाठी थेट पात्र ठरला. १९८६ ऑस्ट्रेलेशिया चषक स्पर्धा आशिया चषक संपल्यावर लगेच चार दिवसांनी (१० एप्रिल १९८६ रोजी) संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडली.