जात पंचायत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जात पंचायत ही कुप्रथा संपूर्ण देशभर अस्तित्वात आहे. महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारा पासून व्यक्तींचे संरक्षण अधिनियम - २०१६ या पद्धतीचे कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. जात पंचायत बोलाविणारा ठराविक रक्कम पंच कमिटी समोर ठेवून आपले गाऱ्हाणे मांडतो . प्रतिवादी पक्षालाआपली बाजू मांडता येते. प्रतिवादी जर महिला असेल तर तिला बाजू मांडू दिली जात नाही.जातीबाहेर काढले तर "आठ फोड अन् बाहेर फेका " म्हणजे त्याच्या नावाने आठ रुपये सर्व कुळात त्याचे वाटप केले जाते. आणि त्याला जाती बाहेर काढायचे जाहीर केले जाते. या कायद्यांतर्गत सामाजिक बहिष्काराचे आदेश देणाऱ्या जात पंचायतीच्या सदस्यांना सात वर्षा पर्यंतचा तुरुंगवास किवा ५ लाख पर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.[१] सन २०२१ पर्यंत जात पंचायत ही कुप्रथा संपूर्ण देशभर अस्तित्वात अस्तित्वात आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर संपूर्ण देशभरात जातपंचायत विरोधी कायदा करावा अशी मागणी २०२१ मध्ये करण्यात आली.[२]

जातपंचायती बाहेर वाळीत टाकणे (सामाजिक बहिष्कार)

मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला जात पंचायतीद्वारे वाळीत टाकणे किंवा सामाजिक दृष्टया बहिष्कृत करण्याच्या निर्णयाविरुद्ध कायदा करण्याची गरज नोंदविली आहे. याबाबतचा न्याय निवाडा करताना उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती धर्माधिकारी आणि न्यायमुर्ती पटेल यांच्या खडपीठाने नमुद केले आहे की, राज्य घटनेच्या कलम १४ आणि २१ नूसार प्रत्येक नागरिकास समानतेचा अधिकार आहे. जातपंचायतीच्या नावाखाली काही लोक या अधिकाराचे हनन करीत आहेत.

1.     गृहविभाग, सामाजिक न्याय विभाग आणि इतर विभागानी जातपंचायती समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

2.     पोलिसांनी याबाबत अधिक संवेदनशिल राहीले पाहीजे. बाधीत व्यक्तींचे संरक्षण करून गुन्हे दाखल केले पाहिजेत.

3.     सदर गुन्हा हा दखलपात्र आहे.

4.     जात पंचायती विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १२० (ब) पूर्वनियोजीत कटकारस्थान, कलम ५०३, आणि कलम ३४ एकच उद्देशाने गुन्हा करणे, कलम ३८९ दहशत निर्माण करणे भिती दाखवणे या कलमांखाली गुन्हे दाखल करता येतात.[३]

महाराष्ट्र राज्य सरकारने ३ जुलै २०१७ रोजी सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा मंजूर केला. १९ मे २०२१ पर्यंत एकूण शंभर गुन्ह्यांची नोंद जातपंचायतींविरोधात झाली होती.[४] सामाजिक बहिष्काराचे सर्वाधिक गुन्हे कोकणात घडतात असे समोर आले आहे.[५]

जातपंचायतींनी केलेल्या अत्याचार आणि जुलूमांच्या नोंदी[संपादन]

  • महिलेला जात पंचायतींच्या पंचाची थुंकी चाटण्याची शिक्षा करणे.[६]
  • मानवी विष्टा खाण्याची जबरदस्ती करणे, महिलेस जात पंचायतीमध्ये नग्न करणे, व्यक्तीच्या डोक्यावर मानवी विष्टा व लघवी असलेले मडके ठेवण्यात येणे आणि ते फोडणे, हातावर लालबुंद झालेली कुऱ्हाड ठेवण्याची तयारी करणे, महिलेला चारित्र्याच्या संशयावरून उकळत्या तेलात हात घालून नाणे बाहेर काढण्याची शिक्षा करणे. [७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "सामाजिक बहिष्कार आता महाराष्ट्रात कायदेशीर गुन्हा".
  2. ^ "महाराष्ट्राच्या धर्तीवर जात पंचायत विरोधी देशव्यापी कायदा व्हावा; राज्यसभेत मागणी | Sakal". www.esakal.com. 2021-12-25 रोजी पाहिले.
  3. ^ "जातीतून बहिष्कृत करणाऱ्या 17 पंचांविरुद्ध गुन्हा | eSakal". www.esakal.com. 2020-03-08 रोजी पाहिले.
  4. ^ "जात पंचायतींविरोधात शंभर गुन्हे दाखल". Maharashtra Times. 2021-12-25 रोजी पाहिले.
  5. ^ "सामाजिक बहिष्काराचे सर्वाधिक गुन्हे कोकणात". Maharashtra Times. 2021-12-25 रोजी पाहिले.
  6. ^ "संतापजनक प्रकार! जात पंचायतने महिलेला दिली पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा.. | Sakal". www.esakal.com. 2021-12-25 रोजी पाहिले.
  7. ^ Team, My Mahanagar. "जात पंचायतींच्या अमानुष शिक्षा". My Mahanagar. 2021-12-25 रोजी पाहिले.