Jump to content

ऐतराज (चित्रपट‌)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऐतराज
दिग्दर्शन अब्बास मस्तान
निर्मिती सुभाष घई
पटकथा
  • बांगला नवाब शिराझुद्दीन मोल्ला
  • श्याम गोयल
प्रमुख कलाकार
  • प्रियंका चोप्रा
  • अक्षय कुमार
  • करीना कपूर
संकलन हुसेन ए. बर्मावाला
छाया रवी यादव
संगीत हिमेश रेशमिया
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "१"
वितरक मुक्ता आर्टस
अवधी १५९ मिनिटे []
निर्मिती खर्च कोटी (US$१.३ दशलक्ष) []
एकूण उत्पन्न २७.८ कोटी (US$६.२ दशलक्ष) []



ऐतराज (मराठी: आक्षेप) हा २००४ मधील अब्बास-मस्तान दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील रोमॅंटिक थ्रिलर चित्रपट आहे. सुभाष घई निर्मित या चित्रपटात प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत आहेत आणि अमरीश पुरी, परेश रावल आणि अन्नू कपूर हे दुय्यम भूमिकेत आहेत. चित्रपटाची पटकथा श्याम गोयल आणि शिराझ अहमद यांनी लिहिली आहे. हिमेश रेशमिया यांनी संगीत दिले. ही चित्रपट १२ नोव्हेंबर २००४ रोजी प्रदर्शितझाला. या चित्रपटामध्ये एका माणसावर त्याच्या कार्यालयातील वरिष्ठ स्त्रीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप त्याच वरिष्ठ स्त्रीकडून लावला जातो. नकारात्मक भूमिकेसाठी प्रियंका चोप्राला लोकांची दाद मिळाली. बॉक्स ऑफिसवर ६ कोटींच्या बजेटच्या तुलनेत २७.८ कोटींची कमाई करून ऐतराजने व्यावसायिक बाजी मारली. लैंगिक छळाचा विषय समतोलरीत्या मांडल्यामुळे या चित्रपटाची नोंद घेतली गेली.

प्रियंका चोप्राला ऐतराजसाठी ५० व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये दोन पुरस्कार मिळाले: सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि एक नकारात्मक भूमिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी.[] प्रियंका चोप्राने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बंगाल फिल्म पत्रकार संघाचा पुरस्कार आणि एक नकारात्मक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्क्रीन पुरस्कारही जिंकला. २००५ च्या आयफा अवॉर्ड्समध्ये या चित्रपटाला दहा नामांकने मिळाली होती, त्यातील तीन जिंकली.

कथानक

[संपादन]

राज मल्होत्रा व्हॉईस मोबाईल्स या मोबाइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे प्रॉडक्ट इंजिनियर आहेत. एकदा कनिष्ठ वकील प्रिया मुलाखतीसाठी राज यांच्या घरी जाते. खरतर तिला बॅरिस्टर राम चौथराणी, जे राज मल्होत्रा याचे शेजारी आणि मित्र असतात, कडे जायचे असते. त्यानंतर ते प्रेमात पडतात, लग्न करतात आणि त्यांना मुल होणार असते. तसेच राजला व्हॉईस मोबाईल्स कंपनीमध्ये सीईओपदी बढतीची मिळणार असते. या दरम्यान कंपनीचा चेरमन रॉय हा त्याच्या नवीन आणि वयाने छोट्या पत्नीसह (सोनिया) तेथे पोहोचतात. या जोडप्यामधील काही चर्चेनंतर सोनियाला कंपनीचे अध्यक्षपद मिळते. राज याचा मित्र राकेश नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि राजला संचालक मंडळावर स्थान देण्यात येते. एका पार्टीत राज आणि प्रिया सोनियाबद्दल आणि तिच्या आकर्षक बांध्याबद्दल आणि रॉयच्या आणि तिच्या वयातील फरकाबद्दल बोलतात. बोलता बोलता राज विनोद करतात की त्यांच्या संचालक मंडळावर स्थानासाठी त्यांचे चुंबकीय व्यक्तिमत्त्व जबाबदार होते. यावरून राज सोनियाला पूर्वी पासून ओळखत असावा असा संकेत इतरांना मिळतो.

यानंतर एक फ्लॅशबॅक चालु होतो आणि त्यात सोनियाबरोबर राजचे पूर्वीचे संबंध दिसतात. साधारण पाच वर्षांपूर्वी राज आणि सोनिया (मॉडेल असते) एकमेकांना केपटाऊनमधील समुद्रकिनाऱ्यावर भेटलेले दाखवले आहेत. ते प्रेमात पडतात आणि एकत्र येतात. सोनिया राजमुळे गर्भवती होते, यामुळे राज आनंदी होतो, परंतु सोनियाने राजच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारते. तिचे म्हणणे असते की मुल संपत्ती, प्रसिद्धी, शक्ती आणि स्थितीच्या मार्गाने आडवे येतात म्हणूनच ती गर्भपात करते. परिणामी, त्यांचे संबंध संपतात.

राजच्या बढतीनंतर, राकेश राजला कंपनीच्या नवीन मोबाइल हॅंडसेटमधील दोषांबद्दल सांगतो. ज्यामुळे फोन एकाच वेळी दोन लोकांबरोबर कनेक्ट होत असतो - एक ज्याला फोन करायचा असतो आणि दुसरा फोनच्या संपर्क यादीतील दुसरा कुठेल्याही व्यक्तीला. राजला उत्पादन थांबविण्यासाठी सोनियाच्या परवानगीची आवश्यकता असते. या विषयावर चर्चेसाठी ती त्याला घरी आमंत्रित करते. चर्चेदरम्यान सोनिया राजबरोबर लैंगिकरित्या चिथावणीखोर भाष्य करते, पर्ंतु राज त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यानंतर ती आक्रमकपणे राजचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करते. राज जरी वारंवार तिच्या प्रयत्नांना नाकारत असतो तरी सोनिया त्याला अजून भुलवण्याचा प्रयत्न करत राहते. तो निघताच सोनियाने तिला बेदम मारहाण केल्याबद्दल शिक्षा देण्याची धमकी दिली. दुसऱ्याच दिवशी त्याला समजते की सोनियाने तिच्या नवऱ्याला राजने लैंगिक छळ केल्याचे सांगितले आहे. त्याने पूर्वी सोनियाला आकर्षक असल्याचे बोललेले असते, त्यामुळे त्याच्या निर्दोषपणाचा दावा मानला जात नाही आणि कंपनीने त्याला राजीनामा देण्यासाठी दबाव आणते.

राज यांनी चौथराणीला आपला खटला घेण्यास सांगितो. चौथराणी त्याला राजीनामा देऊ नको आणि कामावर जाऊ नको असा सल्ला देतो. राज यांच्याविरूद्ध पुष्कळ पुरावे देऊन हे प्रकरण न्यायालयात जाते. परदेशातून राज यांचे बँक मॅनेजर टेप घेऊन येत असतात, त्यात सोनियांच्या घरी राजची चकमकी नोंदली गेलेली असते. टेप खरी असल्याचे सिद्ध होते. परंतु जेव्हा सोनियाने पाठवलेल्या भाडोत्री गुंडांच्या कारने चौथराणीला धडक देतात आणि यात त्या टेपचा नाश होतो. सोनियाच्या घरातून प्रियाने त्यांच्या बँकेच्या मॅनेजरला का बोलावले असा प्रश्न राजला विचारला असता त्याने उत्तर दिले की त्याने राकेशला फोन केला होता परंतु कंपनीच्या हॅंडसेटमधील दोषामुळे तो फोन बँक मॅनेजरलाही गेला होता. चौथराणीच्या दुखापतीनंतर प्रिया खटला चालू ठेवते आणि सोनियाचे केपटाऊनमधील राजचे पूर्वीचे संबंध उघड करते. त्यानंतर ती राज आणि सोनिया यांच्यात काय घडले हे दर्शविणारी, राकेशची कोर्टात व्हॉईस मेल वाजवते. हे उघड होते की सोनियाने रॉयशी पैशाची, ताकदीची आणि स्थितीसाठी लग्न केलेले असते पण तिला लैंगिक संबंधात समाधान मिळत नव्हते आणि तिने राजबरोबरचे संबंध पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. प्रिया केस जिंकते. तिकडे रॉय सोनियाला सोडतो. अपराधी आणि अपमानित सोनियाने इमारतीतून उडी मारून आत्महत्या करते. शेवटच्या सीनमध्ये राज आणि प्रिया आपल्या मुलाबरोबर चालताना दाखविले आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Aitraaz (2004)". British Board of Film Classification. 31 December 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 December 2016 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Aitraaz". Box Office India. 22 December 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 January 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "Birthday blast: Priyanka Chopra's Top 30 moments in showbiz". Hindustan Times. 17 जुलै 2012. 29 November 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 December 2012 रोजी पाहिले.