रेडिओजॉकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेडिओजॉकी[संपादन]

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे आकाशवाणीचे ब्रीदवाक्य आहे. आकाशवाणीवरून उद्घोषणा, बातम्या, भाषणे, मुलाखती, चर्चा, संवाद, नभोनाट्य, संगीतविषयक कार्यक्रम, श्रुतिका, रूपक, समालोचन असे विविध प्रकारचे कार्यक्रम विविध वयोगटांसाठी प्रक्षेपित केले जातात. आकाशावाणीमध्ये महत्त्वाचा असतो तो निवेदक. आकाशावाणीचे अद्ययावतताहे महत्त्वाचे वैशिष्ट्य आत्मसात करत निवेदाचा नवीन बाज, नव्या संकल्पनेत रेडिओजॉकीच्या रूपात आपल्यासमोर आला आहे. १९२०-३० च्या दशकात सुरू झालेला रेडिओ (आकाशवाणी)चा प्रवास १९८० च्या दशकात स्थिरावला. २३ जुलै, १९७७ रोजी चेन्नई येथे एफ. एम. प्रसारण सुरू झाले. १९९३ पर्यंत ‘रेडिओ सिटी बेंगलोर’ (बेंगळूर) हे भारतातील पहिले खाजगी एफ. एम. रेडिओ स्टेशन ठरले. ‘द टाईम्स ग्रुपने’ ‘रेडिओ मिर्ची’ स्टेशन ४ ऑक्टोबर, २००१ रोजी इंदौर येथे सुरू केले. महाराष्ट्रात खाजगी एफ. एम. केंद्र २००२ मध्ये सुरू झाले. आता ‘रेदिओ मिर्ची’, ‘रेडीओ सिटी’, ‘रेड एफ. एम.’, ‘एफ. एम. गोल्ड इत्यादी वाहिन्यांवर २४ तास मनोरंजनाचे कार्यक्रम, त्यातही तरुणांना आकर्षित करणारी गाणी सतत ऐकवली जातात. नवनवीन ‘बॉलीवूड हिट’ ह्यांचा मसाला असतो. सकाळपासून ते रात्रीपर्यंत तीच-तीच गाणी कितीतरी वेळा ऐकवली जातात. बदल असतो तो मध्ये-मध्ये सूत्रसंचालन करणाऱ्या निवेदकेचा म्हणजेच रेडिओजॉकीचा . आकाशवाणीवरील कार्यक्रमाचे ओघवत्या व प्रभावी शैलीत निवेदन करणाऱ्या रेडिओ व्यक्तित्वाला ‘रेडिओजॉकी (आरजे) असे म्हणतात. अगोदरच रेकॉर्ड केलेल्या संगीताची ओळख करून देणाऱ्या रेडिओ व्यक्तित्वाना ‘डिस्क जॉकी’ म्हणून ओळखले जाते. रेडिओजॉकीला मराठीत ‘उद्घोषक’ असे म्हणतात.रेदिओजोकीचे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे.

रेडिओजॉकीच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू[संपादन]

  • व्यक्तिमत्त्व प्रसन्न व हरहुन्नरी हवे.
  • त्याच्याकडे कल्पकता, योजकता, सहजता आणि गुणग्राहता इत्यादी गुण असावेत.
  • तो सर्जनशील असावा. त्याच्याकडे उत्तम निरीक्षण कौशल्य असावे.
  • त्याच्याकडे प्रसंगावधान आणि हजरजबाबीपणा असावा.
  • त्याची वृत्ती आनंदी हवी आणि त्याला बोलण्याची, गप्पा मारण्याची आवड असावी.
  • त्याच्याकडे उत्कृष्ट संवादकौशल्य हवे.
  • त्याला विनोदाची उत्तम जाण असावी.[१]

रेडिओजॉकीसाठी आवश्यक अभ्यास आणि भाषिक कौशल्ये[संपादन]

  • व्यासंगी हवा. त्याचे वाचन चौफेर हवे. त्याला भाषा, साहित्य, सांस्कृतिक घडामोडी यांची चांगली जण हवी.
  • चित्रपटवृष्टी, संगीतक्षेत्र आणि नाट्यक्षेत्रासंबंधीचे उत्तम ज्ञान हव.
  • सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि भौगोलिक इत्यादिबाबतचे चांगले सामान्यज्ञान हवे.
  • रेडिओजॉकीने समाजमाध्यमावरील नवीन प्रवाह, त्यामधील अद्ययावतता यांबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.
  • कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आरजेला उत्तम संहितालेखन करता यायला हवे.
  • मातृभाषेबरोबरच हिंदी, इंग्रजी आणि विविध स्थानिक बोलींचे ज्ञान असावे.
  • नेहमीच्या बोलन्यात बऱ्याचदा संख्यात्मक माहिती द्यावी लागते. त्यामुळे त्याने आवश्यक सांख्यिकीय माहिती अद्ययावतठेवावी.[२]

रेडिओजॉकीच्या आवाजाची आणि निवेदनाची वैशिष्ट्ये[संपादन]

  • आवाज सुस्पष्ट आणि उत्तम असावा.
  • भाषा श्रोत्यांचे मन प्रसन्न करणारी,ताण दूर करणारी असावी.
  • आवाजाची पातळी योग्य असावी .
  • बोलणे संवादी, गतिमान, सहजस्फूर्त असावे.
  • निवडलेली गाणी, किस्से सांगताना त्यात सुसंगती आणण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच अधूनमधून लोकांना आवश्यक असणाऱ्या माहितीची पेरणीही केली जावी.
  • प्रसंग आणि परिस्थितीनुसार निवेदनात आणि आवाजात आवश्यक ते बदल करण्याची क्षमता हवी.[३]

रेडिओजॉकी नोकरी संधी/क्षेत्रे[संपादन]

  • ए.एम.एफ.एम चेनेल
  • ऑल इंडिया रेडीओ
  • जाहिरात एजेन्सी
  • विशेष कार्यक्रम
  • विशिष्ट प्रसंग

संदर्भ[संपादन]

  1. ^ Sudhir. "कैसे बने एक सफल रेडियो जॉकी". https://hindi.careerindia.com (हिंदी भाषेत). 2019-12-17 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  2. ^ "रेडियो जॉकी कैसे बने | कोर्स | जॉब | सैलरी जाने सब कुछ यहॉं". Kaiseinhindi.com (हिंदी भाषेत). 2019-12-17 रोजी पाहिले.
  3. ^ WD. "रेडियो जॉकी- आवाज से बनाएं कारकीर्द". hindi.webdunia.com (हिंदी भाषेत). 2019-12-17 रोजी पाहिले.