शिंतो मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शिंटो मंदिर या पानावरून पुनर्निर्देशित)
दोन महिला एका देवस्थानसमोर प्रार्थना करत आहेत

शिंटो मंदिर (神社 जिंजा, पुरातन: शिन्शा) याचा अर्थ: "देवांचे स्थान"[१]. या रचनेचा मुख्य उद्देश असतो की या घरात एक किंवा अधिक कामी (पवित्र शक्ती) वास करू शकतील. [२] या वास्तूमधील सर्वात महत्त्वाची इमारत पूजेसाठी नसून पवित्र वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली जाते. [३] मराठीमध्ये फक्त एकच शब्द "मंदीर" वापरला जात असला तरी, जपानी भाषेत, शिंटो मंदिर याचे बरेच वेगवेगळे अर्थ होतात उदा गोंगेन, -गि, जिंजा, जिंगि, मोरी, माययोजिन, -शा, ताईशा, उबुसुना, किंवा याशिरो.

रचनात्मकदृष्ट्या, शिन्टो मंदिरात होंडेन (मुख्य गाभाऱ्यासारखा भाग) उठून दिसतो [note १] आणि कामी (एक भाग) थोडासा लपलेला असतो. [२] परंतु काहीवेळेस शिंटो मंदिरात, होंडेन पूर्णपणे अनुपस्थित असू शकतो, उदाहरणार्थ जेव्हा शिंटो मंदिर एखाद्या पवित्र डोंगरावर बांधलेले असेल. जेव्हा जवळपास वेदीसारखी रचना (हेरॉरोगी) असते किंवा योरीशिरो जे आत्म्यांना आकर्षित करण्यास सक्षम असते तेव्हा देखील होंडेन बांधत नाहीत.[४] शिन्टो मंदिरात एक हेडेन (拝 अर्थ: "उपासनेची जागा") आणि इतरही जागा असू शकतात. तथापि, या मंदिराची सर्वात महत्त्वाची इमारत पवित्र वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी वापरली जाते. [३]

मंदिरांच्या लहान प्रतिकृती (होकोरा) अधूनमधून रस्त्यांच्या कडेला आढळतात. मोठ्या मंदिरांच्या आवारामध्ये त्यांच्याच लहान प्रतिकृती , शेषा (摂 社) किंवा माशा (末 社) आढळतात. [note २] सहज हातातून नेता येणाऱ्या आकाराची मंदिरे (मिकोशी) उत्सवांच्या (मात्सुरी) वेळी खांबावर ठेवून मिरवली जातात. या छोट्या मंदिरातही कामी (पवित्र शक्ती) वास करतात त्यामुळे ही देखील खरी मंदिरे मानली जातात.

सन ९२७ मध्ये, एन्जी-शिकी (延 式 式, शब्दशः अर्थ: "एन्जी कालावधीची कार्यपद्धती") मोठ्या प्रमाणात पसरवली गेली. या कार्यामध्ये त्यावेळी अस्तित्वात असलेल्या सर्व २,८६१ शिंटो मंदिरांची यादी होती आणि ३,१३१ अधिकृत-मान्यताप्राप्त आणि कामी वास करु शकणाऱ्या मंदिराचीही. [५] १९७२ मध्ये, सांस्कृतिक कार्य एजन्सीने गणना केली असता त्यांना एकूण मंदिरांची संख्या ७९,४६७ झाल्याची कळली. ती सर्व मंदिरे असोसिएशन ऑफ शिंटो श्राईन (神社 本 庁) शी संबंधित होती. [६] यासुकुनी मंदिरासारखी काही मंदिरे कोणत्याही बाह्य प्राधिकरणापासून पूर्णपणे स्वतंत्र आहेत. [७] जपानमधील शिंटो मंदिरांची संख्या अंदाजे १,००,००० इतकी आहे. [८] या आकड्यांमध्ये घरे आणि लहान गटांच्या मालकीची, बेबंद किंवा मोडतोड झालेली मंदिरे, रस्त्याच्या कडेला असणारी होकोरा इत्यादींच्या खाजगी मंदिरांचा समावेश असू शकतो किंवा नसू शकतो. शिंटो मंदिर दर्शविणारे युनिकोड वर्ण U+26E9 आहे.

जन्म आणि उत्क्रांती[संपादन]

अगोदरची उत्पत्ति[संपादन]

पूर्वजांची पूजा करता यावी यासाठी कामी (पवित्र शक्ती) आहेत. यायोई-काळातील ग्राम परिषदांनी पूर्वज आणि इतर कामी यांचा सल्ला घेता यावा म्हणून यूरिशिरो (依 り 代) नावाची साधने विकसित केली. योशिशिरो म्हणजे "विनंती करण्यासाठीचा किंवा जवळ जाण्यासाठीचा पर्याय" [९] याद्वारे ते कामीला भौतिक जगतात वास करण्याची आणि आकर्षित करण्याची कल्पना मांडली गेली, यामुळे कामीला मानवांसाठी सहज साध्य बनवले गेले. [९]

नोटस्[संपादन]

Footnotes[संपादन]

  1. ^ याला शिंडेन(神殿) असेही म्हणतात|}}
  2. ^ कारण शेषा आणि माशा एकेकाळी भिन्न अर्थाचे शब्द होते परंतु आता ते समानार्थी आहेत, म्हणून या मंदिरांना कधीकधी सेतसुमात्सुशा ( 摂 末 社) असेही म्हणतात, हे नाव जुन्या दोन नावांना एकत्र करून बनवले आहे


संदर्भ[संपादन]

  1. ^ Stuart D. B. Picken, 1994. p. xxiii
  2. ^ a b Iwanami Kōjien (広辞苑?) Japanese dictionary
  3. ^ a b Bernhard Scheid. "Religiöse Bauwerke in Japan" (German भाषेत). University of Vienna. 27 June 2010 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ Mori Mizue
  5. ^ " Engishiki" in Stuart D. B. Pecken, ed., Historical Dictionary of Shinto. Second edition. (Lanham, MD, USA: Scarecrow Press, Inc., 2011) p. 92.
  6. ^ Japanese Religion: A Survey by the Agency for Cultural Affairs. Abe Yoshiya and David Reid, translators. (Tokyo: Kodansha International Ltd., 1972) p. 239.
  7. ^ "The Yasukuni Shrine Problem in the East Asian Context: Religion and Politics in Modern Japan: Foundation" (PDF). Archived from the original (PDF) on 2016-03-04. 1 January 2014 रोजी पाहिले.
  8. ^ Breen, Teeuwen in Breen, Teeuwen (2000:1)
  9. ^ a b Tamura, page 21