सचिन लोकापुरे
सचिन लोकापुरे | |
जन्म | ऑक्टोबर ११, इ.स. १९८६ सोलापूर |
निवासस्थान | सांगली,महाराष्ट्र राज्य |
नागरिकत्व | भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | औषधनिर्माण शास्त्र |
कार्यसंस्था | श्री अप्पासाहेब बिरनाळे फार्मसी महाविद्यालय, सांगली, संस्थापक,सॅगलो रीसर्च इंडस्ट्री, सांगली. |
ख्याती | बॅक्टेरिया मूव्हमेंट डिटेक्शन डिव्हाइस, डिजिटल मिक्रोस्कोपी अँड अडॅप्टर |
वडील | गंगाधर |
आई | राजेश्री |
स्वाक्षरी |
[[चित्र:|150px]]
|
सचिन गंगाधर लोकापुरे (इंग्रजी: Sachin G Lokapure ;) (११ ऑक्टोबर, १९८६:सोलापूर, महाराष्ट्र - ) हे एक भारतीय औषधनिर्माण शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून बीफार्म व राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, बंगळुरु मधून एम.फार्मा पदवी घेतली. त्यानंतर लोकापुरे यांनी श्री अप्पासाहेब बिरनाळे फार्मसी महाविद्यालयात अध्यापन आणि संशोधनाचे पायाभूत काम केले. तसेच त्यांनी सॅगलो रीसर्च इंडस्ट्रीची स्थापना केली.
संशोधन[संपादन]
बॅक्टेरियाच्या हालचाली शोधण्याचे साधन, मायक्रोबियल इलेक्ट्रोलायझिस बॅटरी आणि डिजिटल मिक्रोस्कोपी अँड अडॅप्टर शोधणारा भारतीय शोधकर्ता आहे. २०१३ मध्ये त्यांच्या शोधासाठी त्यांना पेटंट मिळाला होता.त्यानंतर त्यांनी बॅक्टेरिया मूव्हमेंट डिटेक्शन डिव्हाइस[१], लवचिक मायक्रोबायल इंधन सेल आणि डिजिटल होलोग्राफिक मायक्रो-इमेजिंग डिव्हाइसचे १००हून अधिक भारतीय युटिलिटी आणि डिझाईन पेटंट्स प्राप्त केले. त्याच्या शोधाव्यतिरिक्त, ते संश्लेषण आणि फार्मास्युटिकल ड्रग्सच्या पॉलिमॉर्फिक फॉर्मसाठी नवीन शैली विकसित केले आहे.त्यांनी एकूण ४० शोधनिबंध लिहिले. [२]असून वेगवेगळली १०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत.[३][४]
वाटचाल[संपादन]
भारतात वैद्यकीय क्षेत्रात अनेक रोगांचे सूक्ष्म निदान करण्यासाठी आज पॅथॉलॉजी लॅब गरजेची बनली आहे. हे सूक्ष्म निदान मायक्रोस्कोपीच्या उपकरणाद्वारे केले जाते. मात्र, भारतात असणारे मायक्रोस्कॉपी उपकरणे ही काही प्रमाणात परदेशातून म्हणजेच जपान आणि चीनमधून मागवली जातात. आयात केलेले हे उपकरणे महागडीसुद्धा आहेत. तर याद्वारे अहवाल बनवण्याच्या काही तांत्रिक त्रुटी देखील आहेत. यामुळे सांगलीच्या मिरजेतील सचिन गंगाधर लोकापुरे यांनी संशोधन करत स्वतः भारतीय बनावटीचे मायक्रोस्कॉपीची डिजिटल उपकरणे तयार केली आहेत. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी लोकापुरे यांनी संशोधनाला सुरुवात केली आणि पहिले पेटंट दखल केले होते.[५] आज 32 व्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रातील सूक्ष्म रोगनिदानात उपयोगात येणारी डिजिटल यंत्रे विकसित केली आहेत. इतकेच नव्हे तर सचिन यांनी याची नोंद सुद्धा भारतीय पेटंट कार्यालयाकडे केली आहेत. त्यामुळे त्यांच्या नावे तब्बल ७५ पेटंटची नोंद झाली आहे. मायक्रोस्कोपीमध्ये सुलभता आणण्याच्या दृष्टीने आणि भारतीय मायक्रोस्कोपीचे उपकरण निर्माण करण्याच्या उद्देशाने आधुनिक डिजिटल उपकरणे बनवली आहेत. त्यांच्या संशोधनातून भारतीय वैद्यकीय क्षेत्राला एक नवी दिशा मिळाली आहे. शिवाय आपल्या सर्वात जास्त पेंटट मिळवण्याचा बहुमानही मिळाला आहे.सचिन लोकापुरे यांनी आतापर्यंत तब्बल १७ उत्पादनांची निर्मिती करून या सर्वांची नोंद भारतीय पेटंट कार्यालयाकडे केली आहे. संशोधन हाच त्यांचा छंद आहे. दुसरा कुठलाच व्यवसाय असा आनंद देऊ शकत नाही, असे ते मानतात. न थकता काम हे त्यांचे वैशिष्टय़. ते कधीही सुटी घेत नाहीत.
इंडिया बुक ऑफ रेकॉड मधील नोंद[संपादन]
नुकतेच यांना त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांचा पेटंट्सची इंडिया बुक ऑफ रेकॉड ने नोंद घेतली आहे.[६][७]
एकाधिकार (पेटंट्स)[संपादन]
- बॅक्टेरियाच्या हालचाली शोधण्याचे मशीनसाठी भारतीय एकाधिकार (पेटंट) २९४२७४ ( ११ फेब्रुवारी, इ.स. २००९ला मागणी केली व १४ मार्च, इ.स. २०१८ रोजी भारतीय एकाधिकार (पेटंट) मिळाला.)[५]
- कॉम्पॅक्ट एल-आकाराचे डिजिटल मायक्रोस्कोपसाठी भारतीय एकाधिकार (पेटंट) २८९२९४ (२८ जानेवारी, इ.स. २००८ला मागणी केली व ०७ नोव्हेंबर, इ.स. २०१७ रोजी भारतीय एकाधिकार (पेटंट) मिळाला.)[८]
ऑरगॅनिक रेअकॅशन साठी डिफरेंशियल कंडेन्सर[संपादन]
- नुकतेच यांनी फार्मास्युटिकल ऑरगॅनिक रेअकॅशन साठी डिफरेंशियल कंडेन्सर विकसित केले. या कंडेनसर साठी भारत सरकारने डिझाईन पेटंट दिले आहे. फार्मास्युटिकल ऑरगॅनिक रेअकॅशन डिफरेंशियल कंडेन्सरचे फायदे 1. एका वेळी तुम्ही एका या काँडेन्सॉर मधुन वेगवेगळे ऑरगॅनिक रेअकॅशन करू शकता. 2. तुम्ही तुमच्या रेअकॅशनची उत्पन्न वाढवू शकता. 3. कमी वेळेत तुम्ही ऑरगॅनिक रेअकॅशन करू शकता.[९][१०]
संदर्भ[संपादन]
"
- ^ Sachin, Lokapure (June 2020). "Motiloscope- A Novel Method and Device to Detect Bacterial Motility using Disk Type Sample Holder" (PDF). International Research Journal of Engineering and Technology. 07: 2265.
- ^ "Research Paper Publication".
- ^ "sachin-lokapure-gains-75-patents".
- ^ "sachin-lokapure-have-a-75-petant-and-his-name-is-in-limka-and-india-book-of-record".
- ^ a b "संग्रहित प्रत". Archived from the original on 2019-10-25. 2019-10-25 रोजी पाहिले.
- ^ "SPECIAL REPORT: सांगलीचा 'फुंगसुक वांगडू', मराठी तरुणाच्या नावावर आहे हा विक्रम". Archived from the original on 2019-10-24.
- ^ "75 पेटंट मिळवणारा सांगलीचा 'फुंगसुक वांगडू'". Archived from the original on 2022-09-20.
- ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2019-10-25. 2019-10-25 रोजी पाहिले.
- ^ "सांगलीतील प्राध्यापकाने मिळवले 240 पेटंट, आता बनवला मल्टीपल कंडेनसर".
- ^ "सचिन लोकापुरे प्राध्यापकाची पेटंट मॅन' म्हणून ओळख".
"