सुनीता विल्यम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुनिता विल्यम्स
जन्म सुनिता पांड्या
१९६५
ओहिओ, अमेरिका
वांशिकत्व भारतीय-अमेरिकन
शिक्षण मास्टर्स (इंजिनिअरिंग मॅनेजमेंट)
पेशा टेस्ट पायलट
ख्याती अंतराळवीर


सुनीता लिन विल्यम्स (जन्म: सप्टेंबर १९, १९६५) या भारतीय-अमेरिकन अंतराळवीर आणि अमेरिकन नेव्ही ऑफिसर आहेत. त्यांनी सर्वाधिक स्पेसवॉक करणारी महिला म्हणून (सात वेळा) आणि सर्वाधिक वेळ (५० तास, ४० मिनिटे) स्पेसवॉक करणारी महिला म्हणून, असे दोन विक्रम केले होते.[१][२][३][४][५][६]

एक्सपिडिशन 14 आणि एक्सपिडिशन 15चे सदस्य म्हणून सुनितांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर नियुक्त करण्यात आले होते. 2012 मध्ये त्यांनी एक्सपिडिशन 32 वर फ्लाइट इंजिनीअर आणि नंतर एक्सपिडिशन 33चे कमांडर म्हणून काम केले.

बालपण आणि सुरुवातीचे जीवन[संपादन]

सुनीताचे वडील डॉ. दीपक पंड्या हे जन्माचे भारतीय आणि आई बोनी ही स्लोव्हियन. अभ्यासात सुनिता काही फार हुशार विद्यार्थिनी नव्हती. पण तिला लहानपणापासूनच पोहण्याची आवड होती. एक जलतरणपटू म्हणून ती मोठी होऊ लागली. मोकळा वेळ असो, नाहीतर शाळा सुटल्यानंतर, सुनीता कायम स्विमिंग टँकवरच असे. पोहण्याच्या छंदामुळे सुनीताला डायव्हर – पाणबुडे व्हायचे होते.परंतु डायव्हर बनण्याइतके ग्रेड पॉइन्ट्स तिच्यापाशी नव्हते. त्यामुळे डायव्हर न होता ती वैमानिक झाली.. सुनीताने पायलट व्हायचे ठरवल्यावरही तो मार्ग सुकर नव्हता. लढाऊ विमानांचे वैमानिक बनण्याची संधी त्यावेळी अमेरिकेतही महिलांना दिली जात नव्हती. घोंगावत येणारे जेट विमान उडवण्याऐवजी हेलिकॉप्टर उडवणे, हाही खरे तर सुनीताच्या आयुष्यातला तिला अंतराळाच्या दिशेने घेऊन जाणारा टर्निंग पॉइन्ट ठरला.. मेरीलँड टेस्ट पायलट स्कूलमध्ये तिने शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मास्टर डिग्री झाल्यावर तिने चंद्रावरच्या स्वारीसाठी अर्ज केला. अडथळ्यांची शयर्त तिने जिंकली. १० डिसेंबर, २००६ रोजी सकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी सुनीताचे डिस्कव्हरी अंतराळयान अवकाशात झेपावले. अवघ्या दोन दिवसांत ती इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचली. १६ सूर्योदय आणि १६ सूर्यास्त पाहण्याचा अपूर्व योग तिला मिळाला. आता तिचे पुढचे लक्ष मंगळावर जाण्याचे आहे. 

‘तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, कारण ती स्वप्ने निश्चितच वास्तवात येऊ शकतात. हा सुनीताने मुंबईभेटीत संदेश दिला.  

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • Navy Commendation Medal
  • Navy and Marine Corps Achievement Medal
  • Humanitarian Service Medal
  • NASA Spaceflight Medal
  • Medal "For Merit in Space Exploration", Government of Russia (2011)
  • Padma Bhushan, Government of India (2008)
  • Honorary Doctorate, Gujarat Technological University (2013)
  • Golden Order for Merits, Government of Slovenia (2013)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Astronaut Biography: Sunita Williams". www.spacefacts.de. 2022-01-03 रोजी पाहिले.
  2. ^ "nasa" (PDF).
  3. ^ "Peggy Whitson Breaks Spacewalking Record – Space Station". blogs.nasa.gov (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-05-21. 2022-01-03 रोजी पाहिले.
  4. ^ "NASA". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2021-12-27.
  5. ^ "Spacewalking astronauts conquer stiff bolt, install key power unit on 2nd trip outside - The Washington Post". web.archive.org. 2012-09-08. Archived from the original on 2012-09-08. 2022-01-03 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  6. ^ published, Tariq Malik (2007-02-08). "Orbital Champ: ISS Astronaut Sets New U.S. Spacewalk Record". Space.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी पाहिले.