चर्चा:बाबासाहेब आंबेडकर/चर्चा २

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पूर्ण सुरक्षित[संपादन]

हा लेखात पूर्वी नकल-डकव व आता भला मोठा मजकूर काढल्यामुळे सुरक्षित केले आहे. @अभय नातू आणि V.narsikar: कृपया या विषयात दखल घेऊन संपूर्ण बदल तपासावी. मी पाहिले की संदर्भ असून सुद्धा मजकूर काढण्यात आला आहे. याबद्दल फक्त प्रचालक कृपया बदल तपासा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १६:५९, १२ जुलै २०१८ (IST)[reply]

मी आधीच्या चर्चापानावर माझे सर्व आक्षेप आणि हे मजकूर काढायची कारणे दिलेली होती[संपादन]

  • मी‌ काढलेल्या मजकूरात, अतिशयोक्तीपूर्ण, संदर्भहीन, अविश्वकोशीय, अवास्तवर मजकूर काढलेला आहे.
  • प्रत्येक वेळा मजकूर हटवताना मी तेथे कारणे दिलेली आहेत.
  • ब्लॉगचे, युटूबचे संदर्भ आणि ऐतिहासिक घटनांना सध्याच्या वर्तमानपत्रांमधील बातम्यांचे संदर्भ कसे चालतील? म्हणून ते काढले आहेत. अनेक ठिकाणी संदर्भ द्यायचा म्हणून फ़क्त संदर्भ दिला आहे त्याचा प्रत्यक्ष मजकूराशी काहीएक संबंध नसल्याचे दिसले आहे.
  • @Tiven2240: यांच्या म्हणण्यानूसार माझीही अशी अपेक्षा आहे की,@अभय नातू आणि V.narsikar: अनुभवी प्रचालकांनी काढलेला मजकूर परत एकदा लवकरात लवकर नजरेखालून घालावा आणि मी काढलेला मजकूर योग्य असल्याची खात्री करावी, शिवाय तसा उल्लेख चर्चापानावर करावा, नसल्यास तो मजकूर पुर्ववत करण्यास माझी ना नाही.
  • ह्याच लेखाच्या आधीच्या चर्चापानावर नोंदवलेले माझे आक्षेप तपासणे हा एक मार्गही असू शकतो. (जे चर्चापान हिवाळे यांच्या संपादनात हरवलेले आहे.)
  • लेख सुधारणेच्या कामाला उगाचच संपादन युध्द म्हणून, काम करणाऱ्या सदस्यांचा हुरुप घालवण्याचे उद्योग करु नयेत अशी मी विनंती टायवीन यांना करित आहे. मुळातच जर मी केलेल्या बदलांचे सारांश जरी बदलांशी पडताळून पाहिले असते तरी असले वायफ़ळ शंका त्यांना आली नसती. (If Tiven could have cross-checked with my edit summaries and content of those edits, then this question wouldn't have emerged at all.
  • In the summaries when I have mentioned what I am doing in those edit's and it's very visible what kind of changes I have done. * But instead of looking at those summaries he marked my edits as "edit war" and that is very demoralizing for someone who is generously trying to improve the contents. And it's very funny that, those who did copyvio never got such strict warnings and I am who actually worked hard to bring(copyvio/citoid etc) that to surface got so many of such threats.)
  • शिवाय प्रचालकांनी चांगल्या लेखाच्या, वैध/अवैध संदर्भाच्या, उल्लेखनीयतेच्या मुद्यांबद्दल ध्येय/धोरणे ठरवण्यात पुढाकार घेऊन ती लवकरात लवकर अंमलात आणावीत, जेणेकरुन दरवेळेला असे वाद उत्पन्न होणार नाही. या आधी पर्यंत अनंत प्रकारची ध्येय/धोरणे न आखण्याचा हा परिणाम आहे की, आता प्रचालकांना वैयक्तिक पातळीवर प्रत्येक बाबींचा निर्णय घेणे भाग पडते. जर आवश्यक ती ध्येय/धोरणे ठरवली गेली असती तर ही वेळ कधीच आली नसती आणि असे संदर्भहीन, अविश्वकोशीय लेख तयारच झाले नसते.
  • आधी म्हणल्या प्रमाणे मी ह्या लेखावर काम करित आहे तर मला त्याचे संपादन करु द्यावे आणि ह्या लेखाला लावलेले संरक्षण तात्काळ काढण्यात यावे. शिवाय मराठी निटसं न समजणाऱ्या व्यक्तीला मी मतदान केल्याबद्दल आता मला पश्चाताप करायची वेळ येत आहे. हे ही स्पष्टच आहे, प्रत्येक वेळी चर्चांमध्ये मी लिहिलेल्या बाबी न समजल्याचे टायवीन यांनी दाखवून दिलेले आहे आणि मला परत एकदा इंग्रजीमध्ये माझे मुद्दे लिहावे लागलेले आहेत.
  • या पानावर मी सर्व मजकूर काढण्याची कारणे दिली आहेत[१], शिवाय त्यातील सर्व सिध्दही झाली होती. अत्ता मला यापूढे यावर वाद घालायची तीळमात्र इच्छा नाही.

WikiSuresh (चर्चा) १८:३८, १२ जुलै २०१८ (IST)[reply]

@Sureshkhole: मराठी निटसं न समजणाऱ्या व्यक्ती मराठी विकिपीडियाचे प्रचालक बनवू शकत नाही असे कुठे म्हटले आहे?. इतर अनेक विकीवर (इंग्लिशवर सुद्धा) ते भाषेचे पूर्ण ज्ञान नसलेले व्यक्ती प्रचालक आहेत. बरं तर आपल्याला काही दिवस विकी सुट्टी घेण्याची गरज वाटते. संपादन विशेष:diff/1608402, विशेष:diff/1608404, विशेष:diff/1608406, विशेष:diff/1608407 यात स्पष्टपणे दिसत आहे की संपादन युद्ध झाले आहे. खरं तर आपण आपल्या संदेश सोबत नुसतं व्यक्तिगत मतभेद विकिपीडियावर काढत आहेत. एकाद्या लेखात संदर्भ नसले तर ते लेख काढले जाईल असे धोरण मराठी विकिपीडियावर कुठे आहे याची माहिती द्यावी? संदर्भ नसलेले मजकुर काढले जाईल याची माहिती कुठे दिली आहे? आपण नुसते @संदेश हिवाळे, , आणि प्रसाद साळवे: यांच्या संपादनात चूक काढत बसले आहे. एकदा आपले संपादने पहा आपण फक्त रूपांतरचे काम करत आहेत. आपला स्वतःचा लेख फक्त १९ लिहिले आहेत इतर सर्व कंटेंट ट्रान्सलाशन आहे. सुधारणे करा याला कोण आपल्या थांबवत नाही. हो कॉपी राईट बदल आपण मदत करत आहेत परंतु इतर अनेक ठिकाणी काम कराचे आहे. विकिपीडियाचे अनेक धोरणांचे आपण उल्लंधन केलेले आहे. यांचे संपादन इतिहासात त्यांनी अनेक चांगले संपादन केले आहेत आपण त्यावर कधी लक्ष घातले आहे का? हो त्यांच्यातून चूक झालेले होती व ते त्यावर काम करतील अशी आशा आहे. त्यांच्यावर कारवाई नाही केल्यामुळे आपण प्रचालक मंडळींवर आरोप करतात. प्रसाद यांचे सदस्य पानावर पहा. त्यांनी प्रचालकांना याबद्दल माहिती दिली होती की काम चालू अवसतेत आपण साचा लावला आहे. ज यांच्यावर ताकीद प्रसाद याच्यावर ब्लॉक झाल्यावर आपण आता संदेश वर आले आहेत. व वर चर्चेत आपण माझ्यावर सुद्धा व्यक्तिगत हल्ला केला आहे. यामुळे ज यांनी सांगितले आपण सर्वजण मिळून मराठी विकिपीडिया बंद पाडू या.--(विशेष:diff/1606718). यावर काय उपाय काढायचे असे आता तुमीच सांगा. अनेक कामे बाकी आहेत. अनेक संपादकांची गरज आहे. असे एक एक करून आपण फक्त दोष काढुया तर नवीन संपादकांना प्रोत्साहन कोण देणार? असे भांडण पाहून व वरिष्ठ संपादक गायब करून विकिला फायदा होणार आहे का याबद्दल सोचा. ठीक मी तर तात्पुरता प्रचालक आहे व मला गर्व आहे की मी मराठी विकिपीडियावर तात्पुरत्या अवसतेत सर्वात जास्त प्रमाणात प्रचालकीय काम केले आहे (माझे रिपोर्ट कार्ड आपल्याला इथे भेटेल). मी पूर्ण प्रयत्न करत आहे भले मी मराठी मूळ भाषक नसून. आपल्याकडे माझ्यापासून जास्त ज्ञान आहे त्याचे फायदा विकिपीडियाचे भले साठी करा. प्रचालक असने काही मोठी गोष्ट नाही व मला खूप दुःख आहे की माझ्या असताना संदेश प्रसाद व ज सारखे संपादकांना मी विकीवर रकान्यास मदत करू शकत नाही व त्यातून मोठा दुःख असा की सुरेश यांचा मत वाया गेले आहे. असो माझे काम मी पूर्ण पणे करत आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. फक्त आपल्यात सद्भावना गृहीत धरत आहे. पुढील लेखनात शुभेच्छा --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०९:०५, १३ जुलै २०१८ (IST)[reply]

NPOV व सुधारणेच्या नावाखाली खोलेंचे उद्योग[संपादन]

खाली दिलेला सुरेश खोले यांनी या लेखावर अलीकडे केलेल्या संपदानांचा आढावा आहे. कृपया, @Tiven2240, V.narsikar, प्रसाद साळवे, , सुबोध कुलकर्णी, आणि संतोष दहिवळ: यांनी पडताळा करावा. यावर वाद घालण्याचा हेतू नाही मात्र जर इतक्या मोठ्या प्रमाणावर खोले चूका करत असतील त्याच्यांवर योग्य ती कारवाई प्रचालकांनी करावी, ही विनंती.

  • या संपादनात खोलेंनी बाबासाहेबांचे एकही कार्यक्षेत्र (जसे, राजकारणी, कायदेतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ इ.) ठेवले नाही. आंबेडकर हे एक प्रतिभावंत विद्यार्थी होते, सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. हा इंग्रजी विकितून अनुवाद केलेला मजकूर त्यांना खटकला व तो काढला गेला. तर इ.स. २०१४ साली कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात शिकलेल्या एकूण विद्यार्थांमधून पहिल्या १०० बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना "सर्वात बुद्धिमान विद्यार्थी" अर्थात फर्स्ट कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम म्हणून घोषित केले आहे." हा लोकमतचा संदर्भ असलेला मजकूर ही काढला गेला.
  • आंबेडकर जयंती जगभरात साजरी होते व इ.स. २०१२ मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय या सर्वेक्षणात बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय हे संदर्भ असलेले दोन्ही मुद्दे खोलेंना अतिशयोक्ती वाटले व त्यांनी ते काढले. प्रत्यक्षात वरील दोनही मुद्दे खरे आहेत.
  • येथे तर बालपणी बुद्धांचे चरित्र वाचून बाळ भिवावर झालेला परिणामच खोंलेंना चूकीचा वाटला व त्यांनी तो सुधारणीच्या नावाखाली हटवला.
  • facts च्या बातम्या संदर्भ होऊ शकत नाहीत असे सांगून आंबेडकरांच्या पदव्यांचा इतिहासच काढला.
  • अनावश्यक माहिती म्हणत संदर्भ असलेला खालील मजकूर काढला. भीमराव आंबेडकर ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लाला लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. लाला लजपतराय व बाबासाहेब आंबेडकर यांचा एकदा संवाद सुरू असताना प्राध्यापक एडवीन सेलिग्मन तिथे आले आणि त्यांनी सुद्धा या संवादात भाग घेतला. प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांच्या राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे ज्ञान ऐकून होते. त्यांनी लजपतरायांसमोर विद्यार्थी भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल गौरोद्गार काढले की, भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत. यासोबतच आंबेडकरांनी न्यूयार्क टाइम्स दिलेले पुढील मत सुद्धा काढण्यात आले - अमेरिकेत जाईपर्यंत भीमरावांचे अनेक गुण सुप्‍तावस्थेमध्ये होते. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांचा विकास करण्याचे काम प्रा. सेलिग्मन आणि इतर विद्वानांकडून झाले. अमेरिकेतील वास्तव्यात आंबेडकरांना काही चांगले मित्र आणि विद्यापीठातील प्राध्यापक, मार्गदर्शक लाभले. (याला ही संदर्भ आहे)
  • येथे संदर्भहिन माहिती म्हणत कोलंबिया विद्यापीठात असताना आंबेडकरांनी ग्रहण केलेल्या पदव्या, ६० अभ्यासक्रम (कोर्सवर्क) व इतर मजकूरही काढला. आणि याला संदर्भ उपलब्ध होता.
  • येथे बाबासाहेबांच्या आईवडीलांचे एक चित्र, लंडनमध्ये आंबेडकरांनी केलेला २१-२१ तास अभ्यास याशिवाय लंडन मध्ये बाबासाहेबांचे झालेले विविध सन्मान सुद्धा खोलेंना चूकीचे वाटले व त्यांनी ते काढले. ज्यांना संदर्भ होते.
  • येथे मी परतवलेल्या दोन आवृत्त्या खोलेंनी परत परतवल्या.
  • १० येथे अनेक संदर्भ खोलेंनी मागितले व हे करताना त्यांनी अनेक योग्य संदर्भही काढून टाकत पुन्हा संदर्भ मागितले.
  • ११ येथे तर लोकमत, झीन्यूज सारख्या बातम्यांचे अनेक संदर्भ व मजकूर खोलेंनी काढून टाकले. शैक्षणिक कार्य या विभागातील मजकूर खोलेंनी काढला, जो मी १२वी इतिहासाच्या पुस्तकातून लिहिला होता.
  • १२ कोलंबिया विद्यापीठाच्या १०० बुद्धिमान विद्यार्थांमध्ये बाबासाहेब अव्वल ठरले, हे विद्यापीठ मत खोलेंना खोटे वाटते म्हणून त्यांनी तो संपूर्ण विभागच काढून टाकला, ज्याला लोकमतचे, व विद्यापीठाचे संदर्भ होते.
  • १३ आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराचे झालेले परिणाम सुद्धा खोलेंना अनावश्यक वाटले व पूर्ण मजकूर काढला गेला.
  • १५ येथे तर खोलेंनी अतिशयोक्ती च्या पुढे पाउल टाकले आहे. ऐतिहासिक घटनांना, सध्याच्या वर्तमानपत्रातील बातम्यांचे संदर्भ कसे चालतील असे म्हणत त्यांनी लोकमत, दिव्य मराठीद हिंदू वर्तमानपत्रांच्या संदर्भ बातम्या काढून टाकल्या. घटना ज्या दिवशी घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी ती बातमी हिंदूमधे प्रकाशीत झाली, मात्र खोलेंना हे घटना व बातमी यातील अंतर काही दशके दिसली असावीत म्हणून ते यांना ऐतिहासिक घटना म्हणत संदर्भांना न पडताळताच हटवतात. यामागील नेमका हेतू इतर सदस्यांनी ओळखावा.
  • १६ येथे खोलेंनी लोकसत्ता व इतर बातम्यांचे संदर्भ अवैध ठरवत काढून टाकले.
  • १७ येथे खोलेंनी पूर्ण खोटारडेपणा केलेला आहे. आंबेडकरांचे सहयोगी यांचे उल्लेख इतर ठिकाणी/जीवनक्रम येथे आले आहेत असे म्हणत हा पूर्ण विभाग काढला गेला. प्रत्यक्षात आंबेडकरांचा जीवनक्रम लेखात वरील व्यक्तींचे उल्लेख नाही, व या लेखाला पानकाढा साचा खोलेंनीच जोडलेला आहे. सहयोगींचा मजकूर विकित कुठेच ठेवायचा नाही, असे त्यांचा बेत दिसतो.

--संदेश हिवाळेचर्चा १८:५३, १२ जुलै २०१८ (IST)[reply]

मी काय करतोय :[संपादन]

@Tiven2240:

    • मी मला जमेल तसे मी लेख भाषांतरीत करतोय, कारण सरळ नविन लेख लिहिण्यापेक्षा इंग्रजीमधील मजकूर मराठीत आणणे सोपे आहे, आणि जमेल तसे मी स्वत:ही लिहीत आहे.
    • जे काही लिहायचे ते संदर्भासहित लिहायचे जेणेकरुन ते टिकून राहिल असा माझा गैरसमज आहे, त्यामुळे एक एक शब्दांची संपादने मी करित नाही. संपादन संख्ये पेक्षा संपादीत मजकूराच्या स्थिर रहाण्याकडे माझा कल जास्त आहे.
    • भाषांतर करणे यात गैर काय आहे? स्वत:चे सगळे लेख नकल-डकव करुन मोठ्या संख्येने लेख निर्माण करणाऱ्यांशी म्हणजे आणि हिवाळे/साळवे यांच्याशी माझी तुलना होणार असेल तर मला असल्या तुलनेत काहीही स्वारस्य नाही.
    • मी माझे काम माझ्या पध्दतीने चालू ठेवीन (शिवाय मी कसे काम करायचे यावर वैयक्तीक आरोप का केला जात आहे?)

ज, हिवाळे, साळवे[संपादन]

    • ज यांनी अनेकदा प्रताधिकार भंग केला आहे, अनेक स्त्री सदस्यांनी त्यांच्याकडून त्रास होतो अशी तक्रार केलेली आहे. मला सांगा प्रचालक म्हणून काय केलं आपण ज यांच्या उत्पाती संपादने आणि नकल-डकव वर? ज यांनी निदान 350 पेक्षा जास्त लेख नकल-डकव आणि फ़क्त नकल-डकव करुन केलेले आहेत. एवढ्या प्रताधिकार भंगासाठी काय कारवाई व्हायला हवी आहे?
    • शिवाय ज यांनी "विकिपीडीया बंद पाडू[२] ही धमकी दिली आहे." "स्वत: मजकूर लिहायची ताकद असेल तरच नकल-डकव काढा." पुन्हा लिहितो,[३] 'मराठी संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली एखादी माहिती जर मराठी विकिपीडियावर आली नाही, तर ती कायमची नष्ट होईल." ज्यांना कुणाला मराठी संस्कृतीचे कायमचे नुकसान करायचे आहे, त्यांनी प्रतिकारभंग शोधत टाईमपास करावा. ... ज (चर्चा) २१:५१, ७ जुलै २०१८ (IST) असे आव्हान दिले आहे. गुंडाच्या टोपण नावांच्या याद्या[४], आणि फ़क्त याद्यां करणे आणि त्या टिकवण्यासाठी आग्रह धरणे. शरद पवार आणि संभाजी भिडे या पानांवर त्यांनी काही दिवसांपूर्वीच अपमानजनक मजकूरही टाकला होता(जो टायवीन यांनीच काढला आहे.). ही बहुतेक आपल्या मते चांगल्या आणि वरिष्ठ संपादकाची लक्षणे असावीत. माझ्यासाठी ते उत्पाती आणि नकल-डकव करणारेच आहेत.
    • हिवाळे-साळवे, या दोघांनीही अनेकदा प्रताधिकार भंग केला, अनेक सदस्यांशी वाद घालून(29000 बाईट्सचा प्रताधिकार भंग काढण्यासाठी त्याच्या 3 पट म्हणजे ९३,१८४ बाइट एवढी चर्चा झाली आहे, म्हणजे मराठी विकिवरील सर्वात मोठ्या लेखाच्या 25% मजकूर नुसता वादात लिहिला गेला.), हट्टीपणे आपले म्हणणे रेटले आहे, शेवटी इतर सदस्यांनी आणि प्रचालकांनी त्यांना त्यांच्या कॄतीबद्दल प्रश्न विचारल्यावर "आपण विकिपीडीया सोडत आहोत असे सांगितले", ज्यांच्याशी संवाद होउ शकत नाही अश्या सदस्यांना कसल्याही प्रकारचे गांभिर्य आणि समज आहे असे मला वाटत नाही आणि मला त्यांच्याबद्दल गुड फ़ेथ ठेवणेही शक्य नाही. तरीही मी तो पर्यंत त्यांनी जास्त संपादने केलेल्या(इथे विकिवर लिहिलेले लेख कुणाच्याही मालकीचे नसतात हे लक्षात ठेवावे!) लेखांना हात लावलेला नव्हता जो पर्यंत त्यांनी स्वत:च आम्ही विकिपीडीयावरील संपादने थांबवतो आहे हे म्हणले नव्हते. शिवाय हेच बदल मी आधीही केले होते आणि त्याची कारणे तेव्हाच दिली होती. तेव्हा हा मुद्दा आता का चर्चीला जात आहे मला कळत नाहीये. आणि आंबेडकर लेखात बदल करणे म्हणजेच हिवाळेंवर हल्ला हे समीकरण कुठून येते?
    • या इतिहासात स्पष्ट दिसते की, हिवाळे यांनी मी लावलेले साचे खालील पानांवरून परस्पर काढले आहेत आता हे आपल्याला संपादन युध्द वाटले नसेलच ना? मी साचे लावताना कारणे दिली होती हिवाळेंनी कोणती कारणे दिली आहेत?

आपण हे लक्षात घेणे आवश्यक आहे की[संपादन]

  • इतकी वर्षे कोणीही प्रताधिकार भंग, संदर्भासहित लिहीणे, NPOV इत्यादीचा आग्रह धरला नव्हता.
  • अगदी संपादन चाळण्यांनी "संदर्भासहित भलामोठा मजकूर" असे दाखवलेले संपादनही कधीच प्रताधिकार भंगासाठी तपासले जात नव्हते.
  • आता हे सर्व करताना आपल्याला काही कडक पावले उचलावी लागणार आहेत.
  • जर आपल्याला खरोखरच प्रताधिकार भंगाचे, संदर्भासहित लिहिण्याचे, NPOV धोरण लागू करायचे असेल तरच हा संवाद पुढे नेण्यात अर्थ आहे असे मला वाटते. मला आता शंका वाटतीय की, आपण खरोखरच प्रताधिकार भंग, संदर्भासहित लिहिणे, NPOV सारखे मुद्दे गांभिर्याने घेण्यास इच्छूक आहात.

प्रचालक बनण्यासाठी भाषेचे बंधन बिलकूल नाही, पण. . .[संपादन]

  • ज यांनी दिलेल्या धमक्या आणि आव्हानांचे गांभिर्य आपल्याला अजुनही समजलेले नाही. आपल्या चर्चापानावरही ज यांनी आपल्याला धमकावले आहे हे ही आपल्याला कळलेले नाही.
  • मला स्वत:ला अनेकदा मराठी मध्ये लिहिलेले इंग्रजीत भाषांतरीत करुन परत लिहावे लागलेले आहे. त्यामुळे जो पर्यंत मराठीतील संपादने समजण्यात आपल्याकडून घोळ होत नाही तो पर्यंत मला काहीही अडचण नाही. पण त्या घोळापाई जसे की, अजुनही आपण माझी आंबेडकर लेखाची संपादने आणि त्याच्या संपादन सारांशाकडे डोळे उघडून पाहिलेले नाही/किंवा आपल्याला ती समजलेली नाहित. (त्यामुळे आपल्याला शंका आहेत.)

मुद्याकडे परत जाताना[संपादन]

  • माझी अशी भाबडी समजूत आहे की, मला जमेल तसे मी मराठी विकिवरील प्रताधिकार भंग शोधणे, संदर्भ आणणे, भाषांतरे करणे याद्वारे मी मराठी विकिवर योगदान देत असतो. या सर्वांला आपल्याला योगदान म्हणायचे नसेल तर तो आपला प्रश्न आहे.
  • मी महाराष्ट्र भर प्रत्यक्ष जाऊन विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये कार्याशाळाही घेत असतो. शिवाय वैयक्तीक पातळीवर मुक्तस्त्रोत प्रकल्पांमध्ये योगदान देत आहेच.
  • ते सर्व करत असताना मला जे दिसले की, जर आपल्याला जास्तीत जास्त लोकांना आपल्या प्रकल्पाशी जोडायचे असेल तर आधी जे लेख सर्वात जास्त वाचले जातात त्यांची गुणवत्ता सर्वात जास्त चांगली असली पाहिजे. त्या हिशेबाने आंबेडकर, शिवाजी, जात, लैंगिकता, हिंदुत्व, आरोग्य या विषयाचे लेख सर्वात जास्त चांगले असावेत.
  • यां पैंकी मी जात/आंबेडकर आणि लैंगिकता, हिंदुत्व मधिल काही लेख माझ्या कामासाठी निवडले आहेत. आणि पहिल्यापासून मी त्यांच विषयावर काम करित आहे.
  • शिवाय मी नेहमी विशेष पानांमधील ; मोठी पाने, विकिडाटा कलम नसलेली पाने, वर्गीकरण नसलेली पाने, आणि चाळण्यांमधील "प्रताधिकार उल्लंघनासाठी तपासा, संदर्भाविना भलामोठा मजकूर" ही चाळणी सतत पहात असतो. आता ह्या सर्वांमध्ये मला जे जे काही सापडते त्यांना साचे लावणे, प्रताधिकार भंग तपासणे, त्या त्या लेखांमधील मजकूरावर काम करणे मी करतो. (ह्या सर्व कांमांसाठी इतर विकिंवर पेट्रोलिंग करणारे सदस्य आहेत. जे प्रचालकांच्या कामाचा भार कमी करतात.)
  • त्यामुळे माझी परत एकदा विनंती आहे की, अभय नातू आणि नरसीकर(प्रकॄती ठीक असेल आणि शक्य असेल तर) यांनी मी केलेली संपादने तपासावीत. संदर्भ प्रत्यक्ष पहावेत, काढलेला मजकूर पहावा आणि पुढे काय करायचे ते ठरवावे.
  • माझ्या मते जर आपली सर्वांची अशी इच्छा असेल की, मराठी विकिपीडीया विश्वास ठेवण्या जोगा विश्वकोश असावा. तर आंबेडकर आणि तत्सम लेख जे सर्वात जास्त वाचले जातात त्यांमध्ये प्रताधिकार भंग, संदर्भविहीन लिखाण, गौरवीकरण, अतिशयोक्ती, अविश्वकोशीय मजकूर, पाल्हाळीक मजकूर इ. बिलकूल असता कामा नये.
  • मी हट्ट धरतोय तो प्रताधिकार भंग न होण्याचा, संदर्भासहित लिखाण होण्याचा जर तो गैर आहे असे आपल्याला वाटत असेल तर, कुणाला विकिसुट्टीची गरज आहे ते सूज्ञांना कोणी सांगावे.
  • या उपर मला एकही शब्द लिहिण्याची इच्छा नाही, माझ्यावरील सर्व आरोपांची मी उत्तरे दिली आहेत. WikiSuresh (चर्चा) १२:५७, १३ जुलै २०१८ (IST)[reply]
@Sureshkhole, संदेश हिवाळे, अभय नातू, Tiven2240, आणि :@प्रसाद साळवे, आर्या जोशी, आणि सुबोध कुलकर्णी: व सर्व सदस्य

सध्या, तूर्तास मी जरी विकीवरील बहुतेक भाग जमेल तसे वाचत असलो तरी प्रत्यक्षरित्या अत्यल्प व मर्यादित संपादन सहभागाशिवाय मी जास्त काही करू शकत नाही. ईतका मोठा मजकूर तपासणे व त्यातून निष्कर्ष काढणे मला (मोबाईल वरून) सध्या तरी शक्य नाही. त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहे. --वि. नरसीकर , (चर्चा) १४:४३, १३ जुलै २०१८ (IST)[reply]

नोंद घेतली. लवकरच पुन्हा एकदा ही चर्चा सूक्ष्मपणे (त्यातील निरुपयोगी भागाकडे दुर्लक्ष करीत) वाचून उत्तर देत आहे.
तोपर्यंत सर्वांनी संयम दाखवावा ही विनंती.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०७:१५, १६ जुलै २०१८ (IST)[reply]
  • ह्या मासिकातील मजकुरामधून नकल-डकव करुन ह्या लेकाचा बराचसा भाग बनवला गेलेला आहे. पिडीफ़ मध्ये ही फ़ाईल असल्याने कोणत्याच इतर साधनांद्वारे ही नकल-डकव तपासली जाऊ शाकत नाही परंतु मजकूर पाहिल्यावर लक्षात येते. एकदा लेख पुऩ्हा उघडला की, मी त्यातला नकल-डकव मजकूर संदर्भा सहित अधोरेखित करिन. WikiSuresh (चर्चा) २२:१८, १७ जुलै २०१८ (IST)[reply]

आढावा आणि चर्चेचे मु्द्दे[संपादन]

वरील चर्चा अनेक वेळा उलटून, सुलटून वाचून लक्षात आले की येथे दोन वेगळ्या चर्चा चालू आहेत -

  1. टायवीन यांना मराठी (न) समजण्याबद्दल
  2. लेखातील संदर्भ, बदल आणि त्यावरील संपादन युद्ध

या दोन्ही चर्चा वेगळ्या केल्यास थोडी सुसूत्रता येईल.

मराठी समजणे[संपादन]

ही चर्चा येथून काढून थेट टायवीन यांच्या सदस्य चर्चा पानावर हलवावी किंवा पुन्हा तेथे सुरू करावी. येथे त्याला स्थान नाही

संदर्भ, संपादने, इ.[संपादन]

खोले यांनी अलीकडे केलेल्या संपादनांना हिवाळे यांनी हरकत घेतली आणि १७ मुद्दे आणले. यांना खोले उत्तर देतीलच परंतु दोन-चार गोष्टी दिसून येतात

  1. ऐतिहासिक घटनांना अर्वाचीन संदर्भ देणे नेहमी चुकीचे नाही परंतु त्यांची किंमत तत्कालीन संदर्भांपेक्षा कमी असते.
  2. हिवाळे यांचे संदर्भ आत्ताची प्रकाशने आहेत. या संदर्भात इतरत्र लिहिलेले उद्धृत केले गेले आहे परंतु मूळ संदर्भ नाहीत. याचा अर्थ हिवाळे या प्रकाशानांवर (लोकसत्ता, इ.) पूर्ण भिस्त ठेवतात. त्यांनी मूळ प्रकाशने वाचून स्वतः शहानिशा केली कि नाही हे कळत नाही परंतु इतरांना ही शहानिशा करण्याचा मार्ग दिलेला नाही.
  3. हिवाळे यांनी संदर्भ असलेला मजकूर अमुक काढला असे लिहिले आहे. अशा संपादनांचा फरक-अहवाल पाहिला असल्यास कळते की काही ठिकाणी (तरी) अमुक मजकूराला संदर्भ नाहीत. जो मजकूर काढला त्यात (येथे लिहिणाऱ्या) लेखकाचे वैयक्तिक मत होते, उदा - या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले यातील एका संदर्भात धिक्काराचा उल्लेख नाही आणि दुसरा संदर्भ गायब आहे.
  4. किमान एके ठिकाणी न काढण्याजोगा मजकूर काढला गेला आहे (आंबेडकरांच्या अर्थशास्त्रातील दोन पदव्या). हा मजकूर पुनर्स्थापित केला जावा. त्याच फरकात काढला गेलेला इतर मजकूर विषयवस्तूला संबंधित नाही हे उघड आहे तरी तो पुन्हा आणू नये.

असो. प्रत्येक मुद्द्याचा काथ्याकूट करण्यात मला स्वारस्य नाही. ही चर्चा हिवाळे, खोले (मुद्दा उठविणारे आणि फरक करणारे) या सदस्यांनी आणि विषयातील जाणकारांनी करावी. या पानावरील एकंदर चर्चा पाहता प्रत्येक मुद्द्याचा विचार झाल्यावर फरक परत आणावा कि नाही हे ठरल्यावर तो बदल केला जावा. तोपर्यत हा लेख सुरक्षितच असावा.

एकंदरित पाहता या लेखात अनेक बदल वादग्रस्त आहेत तरी सध्याचे रूप ठेवून एकएक बदल ठरवूनच केला जावा.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०६:१५, १९ जुलै २०१८ (IST)[reply]

ता.क. पीडीएफ फाइल अजून पाहिलेली नाही.
  • लेखात नकल-डकव आहे ती पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल लेखाच्या अर्ध्याच्या वर मजकूर तसाही जातो आहे. 3 तारखेला जोडलेला मजकूर लोकराज्यमधून जसाच्या तसा घेतलेला आहे. मला कळत नाही हा मजकूर पिडीएफ़ मधून बाहेर कसा काढला आहे याची दुसरी साईट असणार आहे ती तपासली पाहिजे.
  • मी काय आणखीन उत्तर देणार, आधीच्या चर्चेत सगळे मुद्दे आलेले आहेत, त्या उपर माझ्याकडे ताकद नाही.
  • काही मुद्दे प्रमाणाबाहेर खटकतात ते म्हणजे, तपासण्याजोगे संदर्भ म्हणजे काय असतात ते अजुनही हिवळे यांना कळलेले नाही. आणि ते समजून घ्यायला तयार नाहीत आणि आपल्याकडे अश्या परिस्थीतीवर उपाय नाही.
  • हा लेख हवा तर ठेवा असाच मी नव्याने धुळपाटीवर लिहितो/भाषांतरीत करतो आणि मग बदलू. इंग्रजी लेखात निदान नकल-डकव, संदर्भ वैधता असे मुळ मुद्दे तरी नाहीत.
  • आणि माझ्यावर बामनी कावा करण्याचे आरोप करण्या आधी महाड सत्याग्रह (लिहिला) आणि भारतीय जाती व्यवस्था (भाषांतरीत करत आहे) हे दोन लेख जे मी आता सुधारले आहेत ते पाहून घ्यावे. आणि लेखांचा मजकूर, त्याला दिलेले संदर्भ निदान दोनदा पहावेत, जेणेकरुन लेखात काय मजकूर असावा आणि त्याला संदर्भ कोठले असावेत हे आरोप करणाऱ्यांच्या लक्षात येईल. WikiSuresh (चर्चा) ०९:१९, १९ जुलै २०१८ (IST)[reply]

WikiSuresh (चर्चा) ०८:५१, १९ जुलै २०१८ (IST)[reply]

वरचा दुवा उघडत नाही आहे.
धोपटमार्ग - पीडीएफ मायक्रोसॉफ्ट वर्ड (किंवा तत्सम अॅपमध्ये) उघडून एचटीएमएल स्वरुपात जतन करावी. कामचलाऊ संकेतस्थळावर (ब्लॉग, इ) हा मजकूर चढवून कॉपीव्हायो चालवावा.
अशाने मिळणारा कॉपीव्हायो वृत्तांत ग्राह्य नसला तरी किती व कोठे नकल-डकव आहे हे लक्षात येण्यास मदत होईल.
०८:५७, १९ जुलै २०१८ (IST)

@अभय नातू: https://mr.wikipedia.org/w/index.php?limit=500&title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%3A%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8&contribs=user&target=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6+%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87&namespace=&nsInvert=1&tagfilter=&start=2016-10-01&end=2016-10-03 येथे] तपासा 3 तारिख खासकरुन, तसे सर्वच योगदान पाहाण्यासारखेच आहेWikiSuresh (चर्चा) ०९:२९, १९ जुलै २०१८ (IST)[reply]

वर उल्लेखिलेल्या बदलांपैकी बव्हंश बदलांतून ललितशैलीतील लेखन, उदात्तीकरण आणि वैयक्तिक मते आढळून येतात. अशा मजकूराला मराठी विकिपीडियावर स्थान नाही.
आता असा मजकूर शिल्लक असेल तर तो कसा काढावा यावर वाद न घालता खालील पावले उचलावी -
हा लेख सध्याच्या सुरक्षितता पातळीवर ठेवावा.
लेखावर वादग्रस्त असल्याचा व काम चालू असल्याचा (वेगळा) साचा घालावा.
लेखाला अनेक उपपाने करावी व १-३ उताऱ्यांचे त्यावर पुनर्लेखन करावे. असे करणाऱ्याने त्यावर कामचालू साचा लावावा. इतरांनी हा साचा असे पर्यंत बदल करू नयेत.
एकदा असे उपपान लिहून झाले की त्याची चिकित्सा करण्यास खुला करावा.
चिकित्सा झाल्यावर या उपपानातील उतारे मुख्य लेखात हलवावे
वादग्रस्त/कामचालू साचा हलवून खाली आणावा.
अभय नातू (चर्चा) ०९:३९, १९ जुलै २०१८ (IST)[reply]

या लेखात खूप जागी npov व कॉपीराईट प्रॉब्लेम आहेत असे दिसून येते. जर आपण इंग्लिश भाषेतील लेख मराठीत भाषांतर केले जर चांगले होईल का? यांनी लेखाची गुणवत्ता सुद्धा वाढू शकते. हा लेख काढून भाषांतर केलेले लेख ठेवूया असे मला वाटते. आपण मत द्यावे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०९:४६, १९ जुलै २०१८ (IST)[reply]

सहमत, नव्याने लिहिणे/भाषांतरीत करणे सर्वात उत्तम. माझ्यात खरोखरच वाद घालायला ताकद नाहीये Disruptive editing, competency required, verifiable referencing अशी सगळी जंत्रीच मराठीवर येत नाही तो पर्यंत उत्पाती संपादकांचे असेच चालणार आहे. त्यामुळे सरळ नव्याने भाषांतरीत/लिहिलेला लेख तयार होईपर्यंत हा ठेवूयात आणि नवा झाला की हा काढून नवा टाकूयात. शिवाय नवा लेख ही जुनी मंडळी कदापी लिहिणार नाहीत ह्याचीही व्यवस्था करावी लागेल, नाहीतर पुऩ्हा तेच होईल. Topic ban सारखं काहीतरी असायला पाहिजे होतं आपल्याकडे WikiSuresh (चर्चा) १०:२७, १९ जुलै २०१८ (IST)[reply]

@Tiven2240, V.narsikar, आणि अभय नातू: व सारे, आपण आपल्या विकिपीडियाची गुणवत्ता कशी वाढवायची याचा स्वतंत्र विचार करण्यास सक्षम नाही का? नेहेमी 'इंग्रजी विपीचे अनुकरण करूया, कारण त्यावर जे आहे ते योग्य परिपूर्ण,दर्जेदार आहे' ही श्रद्धा (की अंधश्रद्धा) ही सबब दिली जाते.जर इंग्रजीच्या विविध भाषेतील आवृत्त्या करणे हेच ध्येय असते तर प्रत्येक विकीला नियम,धोरणे बनविण्याचे स्वातंत्र्य कशाला दिले आहे? म्हणून आपण त्या भाषेतील विधायक चर्चेची पद्धत,लेखनाची प्रक्रिया,विषयांची रचना,एक चांगली संपादन संस्कृती कशी आकाराला आली ते अभ्यासूया आणि त्याचा आधार घेवून स्वतंत्र विचाराने आपली धोरणे आखण्याचा वेगाने प्रयत्न करूया असे मला वाटते.अनुभवी प्रचालकांनी याबाबतीत सुरुवात कशी करावी यावर मार्गदर्शन करावे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:४१, १९ जुलै २०१८ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी:,
इंग्रजी विपीचे अनुकरण करूया, कारण त्यावर जे आहे ते योग्य परिपूर्ण,दर्जेदार आहे असे ब्लँकेट स्टेटमेंट कोणीही केल्याचे आठवत नाही आणि येथे किंवा इतरत्रही कोणत्याही विकिपीडियाचे अंधानुकरण आपण केलेले नाही. कमीतकमी, असा मुद्दाम केलेले नाही तरी तुम्ही या मताप्रत कसे पोचलात?
आपला आपण विचार करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत आणि तुमच्या वरील पोस्टातील दुसरा भागाप्रमाणेच पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहोत.
इतर विकिपीडियांकडे पाहण्यासाठी दोन साक्षेप आहेत --
१. धोरणे, नियम, इ. --
इतर विकिपीडिया किंवा विकिमीडिया प्रकल्पांमध्ये आपल्यासारखेच किंवा तेच प्रश्न उभे राहतात आणि राहिले आहेत. असे असता हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न कसा केला गेला? कोणते प्रयत्न सफल झाले? कोणते आपटले? कोणत्या उपायांनी नस्त्या कटकटी उभ्या राहिल्या? हे सगळे पाहणे गरजेचे आहे. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या न्यायाने चालणे इष्ट. त्याचबरोबर जे उपाय लागू पडले ते घेण्यास लाज कसली? (तुम्ही असे म्हणता आहात हे ध्वनित नाही करत आहे) क्राउडसोर्सिंगचा हाच तर फायदा आहे. आणि सफल ठरलेले उपायांचे उपयोजन करताना विचार न करता लागू करू नयेत. यात जेथे गरजेचे आहे तेेथे आणि गरजेचे आहेत ते बदल करुन मगच हे वापरावे. रिइन्व्हेंटिंग द व्हील हा घासून गुळगुळीत झालेला वाक्प्रचार येथे चपखल बसतो (गुळगुळीत असूनही!) इंग्लिशमधील धोरणे ही योग्य, परिपूर्ण, दर्जेदार आहेत हे इंग्लिश विकिपीडियावरील मंडळीही म्हणणार नाहीत. पण हे लक्षात घ्या की या प्रवासात इंग्लिश, जर्मन, रशियन, स्पॅनिश विकिपीडिया आपल्या पुढे आहेत. त्यांनी चोखाळलेल्या वाटेवर प्रत्येक पाउल नाही टाकले तरी साधारण त्या दिशेने प्रवास केल्यास आपण आपल्याला इच्छित ठिकाणी पोचू यात शंका नाही.
२. लेख --
लेखांचे भाषांतर करताना इंग्लिश विकिपीडियातून शब्दशः भाषांतर मुळीच करू नये नाहीतर मट्राचा कचरा येथे येतो. :-( परंतु आशयांतर करण्यास काय हरकत? तेथे असलेले संदर्भ वापरुन जेथे पाहिजे तेथे (मराठी विकिपीडियाशी जेथे अधिक जवळीक आहे किंवा जेथे समर्पक आहे तेथे) अधिक खोलात जाउनही लिहावे. याशिवाय मराठी (किंवा बिगरमराठी) संदर्भही वापरावे. असे मूठभर तरी लेख आज मराठीत आहेत जे इंग्लिशमधील लेखांपेक्षा सरस आहेत. आज येथील बव्हंश मंडळी इंग्लिशपारंगत आहे म्हणून आपण तेथील आशय पाहतो. उद्या एखाद्या गोवेकऱ्याने आपल्या पोर्तुगीझ ज्ञानाचा वापर करुन किंवा फ्रांसमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाने फ्रेंच भाषेतील निपुणता वापरुन तेथील लेखनाचा उपयोग मराठी विकिपीडियावरील लेख लिहिला तर उत्तमच. मराठीचा गाभा कायम राखून इतर भाषा, संस्कृती, प्रदेशांतील चव (फ्लेवर) येथे आणणे हे हितावह.
असो. ही चर्चा या लेखाबद्दलच नव्हे तर सर्वसमावेशक आहे तरी ती चावडीवर हलवावी.
प्रस्तुत ठिकाणी या लेखाच्या पुनर्लेखनाबद्दल तुम्हाला काय वाटते?
अभय नातू (चर्चा) ११:३७, १९ जुलै २०१८ (IST)[reply]


अंतिम निर्णय[संपादन]

आंबेडकर यांचे नाराठीत अनेक स्रोत उपलब्ध असू शकतात जे इतर भाषिक विकिपीडियामध्ये नाही. मराठी विकिपीडियावर सद्या हा लेख खूप मोठा झाला आहे व एक ज्ञानकोशनिय माहिती दिसत नाही. हा पान काढला जाईल असे नक्कीच परंतु जर आपण कॉपीराईट उल्लंघन बिना, नक्कल-डकव बिना, विकिपीडियाचे मार्गदर्शन तत्वांचे पालन करून एक नवीन लेख बनवत असेल तर यावर उपाय भेटेल. नवीन लेख जर छोटे सुद्धा असले तरी चालेल. परंतु स्वतःचे भाषेत, विश्वसनीय स्रोत व धोरणात असला की त्याला मुख लेखात प्रकाशित केले जाईल. आपल्याला ७ दिवसाची मुद्दत देत आहे लेखाची पूर्ण रचना आपल्या स्वतःच्या भाषेत बिना धोरणाचे उल्लंघन करून, धूळपाटीवर बनवणे. आशा आहे की हे काम येईल. इतर संपादक सुद्धा यात बदल करण्यास सहभागी होऊ शकतात परंतु फक्त ७ दिवस नंतर, तेव्हपर्यंत फक्त आपण धूळपाटीच्या चर्चापानावर आपले मत द्यावे. हा लेख मजकुर काढण्यास सुरक्षित केले आहे परंतु ती अवस्था पुन्हा येऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे.@अभय नातू: याची नोंद घ्यावी. जसे धूळपाटीवर एकाद्या सदस्याचा अधिकार आहे की ते आपले लेखावर काम करू शकते तेच अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी हे ७ दिवसाची मुदत देत आहे. या प्रक्रियेत कुठल्याही मराठी विकिपीडियाचे धोरणाचे उल्लंघन होत नाही जर इतर सदस्याला यावर काहीही आपत्ती असेल तर प्रचालकांना त्याची माहिती त्वरित द्यावी. पुन्हा एकदा मी प्रसाद व संदेश यांच्यात अझुम गुड फेथ धोरणाचे पालन करून धूळपाटीवर काम करण्यास निवेदन करत आहे. बाबासाहेब अांबेडकर/धूळपाटी धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०९:०७, २० जुलै २०१८ (IST)[reply]

आधी खोलेने वगळलेला मजकूर पुनर्स्थापित करावा. व त्या लेखावरच कामं करावे. धूळपाटी करून भाषांतर करावयाचे असेल तर म.गांधी, सावरकर, टिळक, छ. शिवाजी महाराज या सर्व नेत्यांच्या लेखांचे करावे. केवळ आंबेडकरांच्या लेखाबाबत असे केल्यास विकिपीडिया विश्वाहर्तेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होईल. तो शुद्ध जातिवाद असेल.
ता.क. खोले महाशयांचे टार्गेट ठरलेले आहे. आधी साळवे, नंतर हिवाळे त्यानंतर @:, त्यानंतर टायविन... प्रसाद साळवे (चर्चा) १८:२८, २० जुलै २०१८ (IST)[reply]
@प्रसाद साळवे:,
इतर सदस्यांचा एकेरी उल्लेख करू नका.
अभय नातू (चर्चा) २१:५६, २० जुलै २०१८ (IST)[reply]
कॉपीराईट उल्लंघन नेमके कोठे झालेय हे आधी स्पष्ट करावे. [खोलेंनी माझ्या डिसेंबर २०१६ त्या आवृत्तींचा दुवा दिला आहे, जो मी लोकराज्य मासिकातील मजकूर पाहून विकिपीडियावर स्वतः टाइप करून लिहीला आहे, तांत्रिकरित्या copy करून past केलेले नाही. पण तरीही त्यात आवश्यक तो बदल मी करेन, मात्र खोले जसे म्हणतात की, या पीडीएफ मधील मी खूप मोठा भाग लेखाचा मोठा भाग आहे याला अर्थ नाही] खोलेंनी उडवलेला सगळाच मजकूर नकल-डवक किंवा अविश्वकोशीय नव्हता हे स्पष्ट आहेच. खोले जे करतात ते योग्यच असते/असावे हा गैरसमज सर्वांनीच मनातून काढून टाकवा. कारण ते फक्त टार्गेट करतात व आक्रमक भाषा वापरतात. मी दिलेल्या १७ मुद्द्यांवर खोलेंनी काहीही उत्तर दिले नाही, मोघमच १-२ मुद्दापर्यंत बोलले. केवळ खोलेंना लेखातील अनेक (संदर्भ असलेले) मजकूर गैरसोयीचे वाटले आणि म्हणून त्यांनी ते लेखातून काढून टाकले ही असमाधानकारक बाब आहे. त्यामुळे कृपया Tiven यांनी यातील खोलेंनी केलेले सर्व बदल पूर्ववत करावे, त्यानंतरच लेखात चांगल्या प्रकारे सुधारणा करता येईल. किंवा बाबासाहेब अांबेडकर/धूळपाटी येथे खोलेंनी हटवलेल्या मजकूरांसह संपूर्ण लेख हलवावा. तुमचे पुढील विधान "लेखात ज्ञानकोशनिय माहिती दिसत नाही " हे खरे नाही. मात्र अविकिकरणीय वाटणाऱ्या मजकूरांना समूळ/'डायरेक्ट' हटवण्याएवजी त्यांना विकिकरणीय करणे गरजेचे आहे. तुम्ही दिलेल्या मुदती प्रमाणे ७ दिवसांत लेख उत्तम रित्या बनवला जाईल.
--संदेश हिवाळेचर्चा २०:२३, २० जुलै २०१८ (IST)[reply]
मी लोकराज्य मासिकातील मजकूर पाहून विकिपीडियावर स्वतः टाइप करून लिहीला आहे, तांत्रिकरित्या copy करून past केलेले नाही.
हे असले हास्यास्पद युक्तिवाद करुन करमणूक करायला बघता आहात का? तुम्ही येथे प्रताधिकार उल्लंघन केल्याचे सपशेल कबूल केले आहे. पुढील लिखाणाची तपासणी करताना हे लक्षात घेतले जाईल.
@Tiven2240 आणि V.narsikar:, येथे सदस्य संदेशहिवाळेंवर लगोलग बंदी घातली पाहिजे असे वाटते. तुमचे मत काय आहे?
अभय नातू (चर्चा) २१:५६, २० जुलै २०१८ (IST)[reply]


@Tiven2240 आणि V.narsikar: मी विकिपीडियात सहभागी झालो ही त्या दरम्यानची म्हणजेच २०१६ ची नवीन संपादने आहेत. तेव्हा नकल-डवक प्रकारही मला माहिता नव्हता आणि नकल-डवक धोरण लागू झाल्यानंतर मी नकल-डवक केलेली नाही. संपूर्ण पीडीएफ किंवा त्याची पानेच पाने मी नकल-डवक केली किंवा संपूर्ण लेख हा नकल-डवक आहे, असे काहीही नाही. --संदेश हिवाळेचर्चा ००:०४, २१ जुलै २०१८ (IST)[reply]

@Tiven2240, V.narsikar, आणि अभय नातू:

  • मी मजकूर काढण्यासाठी दिलेली कारणे आधीच्या चर्चापानांवर पाहिलेली नाहीत. आता प्रचालकांचे निर्णयही मान्य नाहीत. इतर सदस्यांचा सतत त्रास देऊन वेळ वाया घालवला जातोय.
  • मराठी विकिचे वातावरण सतत गेली काही वर्षे दुषीत करण्यामध्ये सहभागी कोण आहे हे समोर प्रत्यक्ष "आम्हीं लोकांच्या" भाषेवरुन आणि मजकूरावरुन स्पष्ट दिसून येत आहे.
  • साळवे आणि हिवाळे यांना ताबडतोब उत्पाती संपादने, न ऐकणे, बिनबुडाचे आरोप, वारंवार प्रताधिकार भंग करुन त्याचे निर्लज्जपणे समर्थन करणे, माझ्यावर खालच्या थराला जाऊन दोषारोपण करणे ह्यासाठी कायमचे अवरुध्द केले जावे अशी मी विनंती करीत आहे. WikiSuresh (चर्चा) १५:५७, २१ जुलै २०१८ (IST)[reply]

@Sureshkhole: हा पान एकाद्या सदस्याला तडीपार कराची चर्चा नाही आहे. सुरेश यांची चर्चा काही दिसवपासून वाचतो. त्यात फक्त ३ गोष्टी लक्षात येतात. एक म्हणजे ३ सदस्यांना तडीपार, दुसरी म्हणजे इतर सदस्यांना सांगून प्रशासक च्या चर्चा पानावर तडीपार करण्याचे संदेश/दबाव देने तिसरी म्हणजे प्रचालकीय अधिकारांचे विभाजन करणे. यात ते फक्त बोलतात की आपण नवीन धोरण निश्चित करूया, आपण हे करू ते करू, परंतु एकही दिशा/पाऊल आता पर्यंत त्यांनी उच्चली नाही व त्यांची व इतर सदस्यांची इच्छा नाही असे दिसून येते. मराठी विकिपीडियावर इतके लेख नाही की आपल्याला पेट्रोलर आणि रोलबॅक सारखे अधिकारांची गरज आहे. कॉपीराईट साठी वेगळे सदस्य अधिकार का? इतके बॅकलॉग आहे का मराठी विकिपीडियावर? लेखाची गुणवक्त कशी वाढवायची याचे जवाब नाही. आंबेडकर लेख पुन्हा कोण लिहिणार याचे आता पर्यंत काहीही नोंद नाही. या लेखावर काम केले की संदेश हिवाळे याला तडीपार करा. पूर्वी सदस्य:ज याना तडीपार करा असे फक्त चालू आहे. मी आपल्याला एका संदर्भात काही म्हणालो आपण म्हणता माझे मराठी समजण्याची क्षमता कमी आहे. जर प्रचालकांचे काम फक्त सदयाना तडीपार करण्याचे राहिले आहे तर एक 'पपेट प्रचालक' बनण्याची माझी इच्छा नाही. मी माझे काम विकिपीडियाचे धोरणांचे अंतर्गत करत आहे व भविष्यात सुद्धा करेल. माझ्या मनात जे आहे ते मी विकिपीडियाचे भलेसाठी करेल. आपण कुठल्या संदर्भात सदस्याला तडीपार करायला सांगत आहेत, आपल्या व्यक्तिगत कारणांमुळे? की आपण असे धोरण मराठी विकिपीडियावर आहे? @अभय नातू: मराठी विकिपीडिया हा विकिपीडिया या मुक्त ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्पातील मराठी भाषेतला ज्ञानकोश आहे. संदेश हिवाळे व प्रसाद साळवे यांनी फक्त बौद्ध धर्म आणि त्याचे अंतर्गत असलेले लेखात महत्वपूर्ण योगदान केले आहेत. त्यांना तडीपार नाही करून ही लेख सुधारण्यासाठी सुरेश खोले यांच्या अनुपस्तीत काम करण्याचे मोके दिले पाहिजे असे माझे मत आहे. ते खोले यांचे ढवळाढवळ बिना संपूर्ण कॉपीराईट मजकुर काढतील अशी आशा आहे.

एकाद्या सदस्यांवर नवीन कायदा लागू करणे हे बरोबर नाही व संदेश यांनी वर याबद्दल सांगीतले आहे. त्यांनी काहीही त्यावेळी असलेली धोरणांचे उल्लंधन केले नाही असे वाटते व त्यांच्यावर आरोप लागल्यामुळे ते व्यक्तिगत हल्ले करतात असे दिसत आहे.

सुरेश हे आपले काम करावे व संदेश व प्रसाद यांचे कामात हस्तक्षेप करू नये. व संदेश आणि प्रसाद साळवे हे सुरेश खोले यांचे कामात हस्तक्षेप करू नये असे अंतिम निर्णय प्रचालक म्हणून घेत आहे.

हस्तक्षेप केल्यास सूचना न देता मराठी विकिपीडियावर वाद घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिन्ही सदस्य. सुरेश, संदेश, प्रसाद यांना अनंत काळापर्यंत तडीपार केले जाईल.

या निर्णयाला फक्त प्रशासक बदलू शकतात व ते बद्दलण्यापूर्वी प्रचालकांचे मत घ्यावे. याची नोंद विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन वर करावी.

या विषयात पुढे चर्चेची आवश्यकता नाही व फक्त हे लेख कसे सुधारण्याचे याचे चर्चा यावर करावी.

मराठी विकिपीडियावरील व्यक्तिगत वाद थांबवण्यासाठी. प्रचालक --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:०१, २१ जुलै २०१८ (IST)[reply]

Edit request[संपादन]

@अभय नातू: वरील चर्चा चौकट भ्रमणध्वनी दृश्यातून दिसत नाही, कृपया भ्रमणध्वनी दृश्यातही वाचकांना दिसेल असा साचा/चौकट वापरा. --संदेश हिवाळेचर्चा १८:०३, ६ मे २०१९ (IST)[reply]
@अभय नातू: प्रस्तुत लेखात मोठ्याप्रमाणावर प्रताधिकार भंग झालेला आहे आणि तो हाताळण्यास आता प्रचंड उशीरही होऊन गेलेला आहे, त्यामुळे योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि प्रताधिकारीत मजकूर काढून टाकण्यात यावा ही विनंती QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १०:५५, ७ मे २०१९ (IST)[reply]
@QueerEcofeminist:, अहवाल देता येईल का? -- अभय नातू (चर्चा) ०४:२५, १० मे २०१९ (IST)[reply]
@QueerEcofeminist: प्रस्तुत लेखात प्रताधिकार भंगाच्या नावाखाली तुम्ही आधीच मोठा मुर्खपणा करून ठेवलाय त्याचे काय?? या लेखाला जेवढे तुम्हाला नूकसान करायचे होते तेवढे करुन झालेय. आता उंटावरुन शेळ्या राखण्याचे काम इतरत्र केले तरच उत्तम. --संदेश हिवाळेचर्चा १३:४९, ७ मे २०१९ (IST)[reply]

NPOV व सुधारणेच्या नावाखाली खोलेंचे उद्योग
खाली दिलेला सुरेश खोले यांनी या लेखावर अलीकडे केलेल्या संपदानांचा आढावा आहे. कृपया, @Tiven2240, V.narsikar, प्रसाद साळवे, , सुबोध कुलकर्णी, आणि संतोष दहिवळ: यांनी पडताळा करावा. यावर वाद घालण्याचा हेतू नाही मात्र जर इतक्या मोठ्या प्रमाणावर खोले चूका करत असतील त्याच्यांवर योग्य ती कारवाई प्रचालकांनी करावी, ही विनंती.

  • या संपादनात खोलेंनी बाबासाहेबांचे एकही कार्यक्षेत्र (जसे, राजकारणी, कायदेतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ इ.) ठेवले नाही. आंबेडकर हे एक प्रतिभावंत विद्यार्थी होते, सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. हा इंग्रजी विकितून अनुवाद केलेला मजकूर त्यांना खटकला व तो काढला गेला. तर इ.स. २०१४ साली कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात शिकलेल्या एकूण विद्यार्थांमधून पहिल्या १०० बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना "सर्वात बुद्धिमान विद्यार्थी" अर्थात फर्स्ट कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम म्हणून घोषित केले आहे." हा लोकमतचा संदर्भ असलेला मजकूर ही काढला गेला.
  • आंबेडकर जयंती जगभरात साजरी होते व इ.स. २०१२ मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय या सर्वेक्षणात बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय हे संदर्भ असलेले दोन्ही मुद्दे खोलेंना अतिशयोक्ती वाटले व त्यांनी ते काढले. प्रत्यक्षात वरील दोनही मुद्दे खरे आहेत.
  • येथे तर बालपणी बुद्धांचे चरित्र वाचून बाळ भिवावर झालेला परिणामच खोंलेंना चूकीचा वाटला व त्यांनी तो सुधारणीच्या नावाखाली हटवला.
  • facts च्या बातम्या संदर्भ होऊ शकत नाहीत असे सांगून आंबेडकरांच्या पदव्यांचा इतिहासच काढला.
  • अनावश्यक माहिती म्हणत संदर्भ असलेला खालील मजकूर काढला. भीमराव आंबेडकर ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लाला लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. लाला लजपतराय व बाबासाहेब आंबेडकर यांचा एकदा संवाद सुरू असताना प्राध्यापक एडवीन सेलिग्मन तिथे आले आणि त्यांनी सुद्धा या संवादात भाग घेतला. प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांच्या राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे ज्ञान ऐकून होते. त्यांनी लजपतरायांसमोर विद्यार्थी भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल गौरोद्गार काढले की, भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत. यासोबतच आंबेडकरांनी न्यूयार्क टाइम्स दिलेले पुढील मत सुद्धा काढण्यात आले - अमेरिकेत जाईपर्यंत भीमरावांचे अनेक गुण सुप्‍तावस्थेमध्ये होते. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांचा विकास करण्याचे काम प्रा. सेलिग्मन आणि इतर विद्वानांकडून झाले. अमेरिकेतील वास्तव्यात आंबेडकरांना काही चांगले मित्र आणि विद्यापीठातील प्राध्यापक, मार्गदर्शक लाभले. (याला ही संदर्भ आहे)
  • येथे संदर्भहिन माहिती म्हणत कोलंबिया विद्यापीठात असताना आंबेडकरांनी ग्रहण केलेल्या पदव्या, ६० अभ्यासक्रम (कोर्सवर्क) व इतर मजकूरही काढला. आणि याला संदर्भ उपलब्ध होता.
  • येथे बाबासाहेबांच्या आईवडीलांचे एक चित्र, लंडनमध्ये आंबेडकरांनी केलेला २१-२१ तास अभ्यास याशिवाय लंडन मध्ये बाबासाहेबांचे झालेले विविध सन्मान सुद्धा खोलेंना चूकीचे वाटले व त्यांनी ते काढले. ज्यांना संदर्भ होते.
  • येथे मी परतवलेल्या दोन आवृत्त्या खोलेंनी परत परतवल्या.
  • १० येथे अनेक संदर्भ खोलेंनी मागितले व हे करताना त्यांनी अनेक योग्य संदर्भही काढून टाकत पुन्हा संदर्भ मागितले.
  • ११ येथे तर लोकमत, झीन्यूज सारख्या बातम्यांचे अनेक संदर्भ व मजकूर खोलेंनी काढून टाकले. शैक्षणिक कार्य या विभागातील मजकूर खोलेंनी काढला, जो मी १२वी इतिहासाच्या पुस्तकातून लिहिला होता.
  • १२ कोलंबिया विद्यापीठाच्या १०० बुद्धिमान विद्यार्थांमध्ये बाबासाहेब अव्वल ठरले, हे विद्यापीठ मत खोलेंना खोटे वाटते म्हणून त्यांनी तो संपूर्ण विभागच काढून टाकला, ज्याला लोकमतचे, व विद्यापीठाचे संदर्भ होते.
  • १३ आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराचे झालेले परिणाम सुद्धा खोलेंना अनावश्यक वाटले व पूर्ण मजकूर काढला गेला.
  • १५ येथे तर खोलेंनी अतिशयोक्ती च्या पुढे पाउल टाकले आहे. ऐतिहासिक घटनांना, सध्याच्या वर्तमानपत्रातील बातम्यांचे संदर्भ कसे चालतील असे म्हणत त्यांनी लोकमत, दिव्य मराठीद हिंदू वर्तमानपत्रांच्या संदर्भ बातम्या काढून टाकल्या. घटना ज्या दिवशी घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी ती बातमी हिंदूमधे प्रकाशीत झाली, मात्र खोलेंना हे घटना व बातमी यातील अंतर काही दशके दिसली असावीत म्हणून ते यांना ऐतिहासिक घटना म्हणत संदर्भांना न पडताळताच हटवतात. यामागील नेमका हेतू इतर सदस्यांनी ओळखावा.
  • १६ येथे खोलेंनी लोकसत्ता व इतर बातम्यांचे संदर्भ अवैध ठरवत काढून टाकले.
  • १७ येथे खोलेंनी पूर्ण खोटारडेपणा केलेला आहे. आंबेडकरांचे सहयोगी यांचे उल्लेख इतर ठिकाणी/जीवनक्रम येथे आले आहेत असे म्हणत हा पूर्ण विभाग काढला गेला. प्रत्यक्षात आंबेडकरांचा जीवनक्रम लेखात वरील व्यक्तींचे उल्लेख नाही, व या लेखाला पानकाढा साचा खोलेंनीच जोडलेला आहे. सहयोगींचा मजकूर विकित कुठेच ठेवायचा नाही, असे त्यांचा बेत दिसतो.

--संदेश हिवाळेचर्चा १८:५३, १२ जुलै २०१८ (IST)[reply]


@अभय नातू:, वरील मुद्दांना आपण दुर्लक्षित करणार का? जर असे लेखाला नुकसान पोहोचवणारे संपादनांवर काहीच विचारच होत नसेल तर विकिपीडियावर निपक्षपणे कार्य होते असे म्हणता येणार नाही. चांगली कारणे सांगून चूकीच्या गोष्टी केल्या जात असतील तर आपण दोन्ही बाजूने विचार करणे गरजेचे आहे. --संदेश हिवाळेचर्चा ११:०६, १० मे २०१९ (IST)[reply]

या विषयावर अनेकदा उलटसुलट चर्चा झालेली आहे. या व इतर अनेक मुद्द्यांकडे लक्ष देउन निष्पक्ष पावले उचलली गेलेली आहेत.
आत्ता एकमेकांवर ताशेरे ओढून भांडणे काढण्यापेक्षा जे ठरविले आहे ते करावे - धूळपाटीवर बदल करुन योग्य ते बदल संदर्भांसहित विश्वकोशीय भाषेत येथे आणणे
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २३:५६, १० मे २०१९ (IST)[reply]

१५ जून २०१९ पासून Protected संपादन विनंत्या[संपादन]

Getbasicknowledge (चर्चा) १५:०५, १५ जून २०१९ (IST)[reply]

Replace file[संपादन]

Hi, Please replace File:Second round tableconf.gif by File:Gandhi at the Round Table Conference.jpg or File:Gandhi in London meeting, 1931.jpg. Thanks, Yann (चर्चा) १७:४५, २९ जून २०१९ (IST)[reply]

२७ जानेवारी २०२० पासून Protected संपादन विनंत्या[संपादन]

The audiobook of The Biography of Dr. B R Ambedkar by PocketFM Navya1217 (चर्चा) १६:४१, २७ जानेवारी २०२० (IST)[reply]

@Navya1217: तुमच्या संपादन विनंतीचा अर्थ मला कळालेला नाही. सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे या लेखाचे पुनर्लेखन मी करत आहे.--संदेश हिवाळेचर्चा १७:२६, २७ जानेवारी २०२० (IST)[reply]
  1. ^ "चर्चा:बाबासाहेब अांबेडकर/चर्चा १". विकिपीडिया. 2018-07-12.
  2. ^ "सदस्य चर्चा:प्रसाद साळवे". विकिपीडिया. 2018-07-09.
  3. ^ "चर्चा:गुंफण सद्भावना साहित्य संमेलन". विकिपीडिया. 2018-07-07.
  4. ^ "टोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी". विकिपीडिया.
  5. ^ "चर्चा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोयासन विद्यापीठ". विकिपीडिया. 2018-07-04.