परनाळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?परनाळी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .५५६ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
९८६ (२०११)
• १,७७३/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वंजारी,आदिवासी कातकरी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१५०२
• +०२५२५
• एमएच४८

परनाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला तारापूर मार्गाने गेल्यावर पास्थळ गावानंतर हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव ५.९ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २३५ कुटुंबे राहतात. एकूण ९८६ लोकसंख्येपैकी ५०८ पुरुष तर ४७८ महिला आहेत. गावाची साक्षरता ८५.९७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९२.७३ आहे तर स्त्री साक्षरता ७८.८४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १०२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.३४ टक्के आहे. मुख्यतः वंजारी आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा बोईसर रेल्वे स्थानकावरून दिवसभर उपलब्ध असतात.

जवळपासची गावे[संपादन]

कुडण, दहिसर तर्फे तारापूर, आंबटपाडा, मुंडवळी, साळगाव, नवी देलवाडी, अक्करपट्टी, उनभाट, पोफरण, पथराळी, वेंगणी ही जवळपासची गावे आहेत.परनाळी, मुंडवळी आणि आंबटपाडा ही गावे परनाळी ग्रामपंचायतीमध्ये येतात.

संदर्भ[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/