विशू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विशु या पानावरून पुनर्निर्देशित)
विशूनिमित्त मिरवणुकीसाठी सजवलेले हत्ती

विशू' हा भारताच्या केरळ राज्यातील नववर्षाच्या स्वागताचा दिवस आहे.[१] मेड्डम नावाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हा नववर्ष आरंभाचा सण साजरा होतो. ग्रेगोरिअन कालगणनेनुसार सामान्यतः एप्रिल महिन्याच्या मध्यात चौदा किंवा पंधरा तारखेला हा सण साजरा केला जातो.[२] भौगोलिकदृष्ट्या वसंत ऋतूशी संबंधित हा विषुववृत्तीय सण आहे.[३]

कानि कनल[संपादन]

कानि कनल हा विशूच्या दिवशीचा हा एक महत्त्वाचा विधी आहे. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील सभासद एका मोठ्या भांड्यात तांदूळ, लिंबू, काकडी, नारळ, फणस, सुपारी,पैसे, पिवळी फुले, दिवा, विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा या सर्व पवित्र मानलेल्या गोष्टी एकत्र ठेवतात. या भांड्याला "उरुली" असे म्हणतात. पहाटे उठल्यावर सर्वात प्रथम या पवित्र वस्तूंचे "दर्शन" कुटुंबातील सर्व सदस्यांना घडवले जाते. [४]या दिवशी वडिलधाऱ्या व्यक्ती लहान मुलांना पैसे भेट देतात आणि गरीबांनाही पैशाचे दान दिले जाते.[५] विशूच्या निमित्त्ताने गोड, आंबट, तुरट असे वेगवेगळ्या चवींचे पदार्थ असलेले भोजन करतात. नवीन कपडे घालून लहान मुले फटाके उडवून आपला आनंद व्यक्त करतात.

विशू कानि

विष्णूपूजन[संपादन]

विशूच्या दिवशी श्रीविष्णूचे किंवा श्रीविष्णूच्या कृष्णरूपाचे पूजन केले जाते. लोक घरातील मूर्तीची पूजा करतात किंवा गावातल्या विष्णूच्या किंवा कृष्णाच्या देवळात जाऊन देवदर्शन करतात. या दिवशी अयप्पा मंदिरात किंवा गुरुवायुर मंदिरात दर्शनासाठी विशेष गर्दी होते.[६][७]

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Panikkar, T. K. Gopal (1983). Malabar and Its Folk (इंग्रजी भाषेत). Asian Educational Services. ISBN 978-81-206-0170-3.
  2. ^ LLC, Books (2010-05). Festivals in Keral: Onam, Vishu, Mar Thoma Weddings, International Film Festival of Kerala, Thrissur Pooram, Ayya Vaikunda Avataram (इंग्रजी भाषेत). General Books LLC. ISBN 978-1-155-70238-4. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ Ramachandran, Ammini (2008-11-13). Grains, Greens, and Grated Coconuts: Recipes and Remembrances of a Vegetarian Legacy (इंग्रजी भाषेत). iUniverse. ISBN 978-0-595-61403-5.
  4. ^ Jagannathan, Maithily (2005). South Indian Hindu Festivals and Traditions (इंग्रजी भाषेत). Abhinav Publications. ISBN 9788170174158.
  5. ^ Menon, A. Sreedhara (2010-07-12). Legacy of Kerala (इंग्रजी भाषेत). D C Books. ISBN 9788126437986.
  6. ^ Dalal, Roshen (2010). Hinduism: An Alphabetical Guide (इंग्रजी भाषेत). Penguin Books India. ISBN 9780143414216.
  7. ^ Ltd, Infokerala Communications Pvt (2015-08-01). Pilgrimage to Temple Heritage 2015 (इंग्रजी भाषेत). Info Kerala Communications Pvt Ltd. ISBN 978-81-929470-1-3.