बीजांडवाहिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रजननाच्या हेतूने कार्य करणाऱ्या मानवी प्रजननसंस्थेतील स्त्री प्रजननसंस्थेचा भाग असलेला हा अवयव आहे. बीजांडकोशातून मुक्त झालेले बीजांड ग्रहण करणे व त्याचे गर्भाशयाकडे वहन करणे ही बीजांडवाहिनीची कामे आहेत. योग्य वेळी शुक्रजंतू उपलब्ध झाल्यास बीजांडवाहिनीतच बीजांडाचे फलन होते व हे फलित बीजांड (गर्भ) गर्भाशयाकडे वाहून नेले जाते.

रचना[संपादन]

दोन्ही बीजांडकोशांजवळ प्रत्येकी एक अंडवाहिनी असते. गर्भाशयाजवळील अंडवाहिनीचा भाग फनेलच्या आकाराचा असून त्याच्या कडा झालरयुक्त असतात. झालरीच्या आतील बाजूस असलेल्या पक्षाभिकेमुळे अंडाशयातून उदरगुहेत मुक्त झालेले अंडपुटक अंडवाहिनीमध्ये वाहून नेले जाते. अंडवाहिनी सुमारे १०-११.५ सेमी लांब असते. अंडवाहिनीची आतील बाजू श्लेश्मकलेने युक्त असते.

कार्य[संपादन]

बीजांडकोशातून श्रोणीगुहेत मुक्त झालेले बीजांड बीजांडवाहिनीच्या बीजांडकोशाच्या जवळील मोकळ्या तोंडाकडून ग्रहण केले जाते आणि तिच्या गर्भाशयाच्या तोंडाकडे वाहून नेले जाते. बीजांडवाहिनीच्या आतील बाजूवरील श्लेष्मकलेवरील पक्षाभिकेमुळे आणि बीजांडवाहिनीच्या आकुंचनामुळे बीजांडाचे वहन होते. हे वहन एकाच दिशेने, गर्भाशयाकडे, केले जाते. संभोगाचे वेळी योनीत सोडले गेलेले व गर्भाशयमार्गे बीजांडवाहिनीत पोचलेले शुक्रजंतू योग्य वेळी उपलब्ध झाल्यास बीजांडाचे बीजांडवाहिनीतच फलन होते. फलित किंवा फलन न झालेले बीजांड शेवटी गर्भाशयात जाते. फलित बीजांडाचे गर्भाशयात रोपण होते. फलन न झालेले बीजांड मासिक स्रावाबरोबर शरीराबाहेर टाकले जाते

शरीरविकृतीशास्त्रीय माहिती[संपादन]

तपासणी[संपादन]

वैद्यकीय महत्त्व[संपादन]