वाकेड
वाकेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गाव आहे.
?वाकेड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | लांजा |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०८ |
भौगोलिक स्थिती
[संपादन]हे गाव मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा बस स्थानकापासून ८ किमीवर राजापूरकडे कुवे गावानंतर स्थित आहे. येथील हवामान उन्हाळ्यात उष्ण, हिवाळ्यात थंड तर पावसाळ्यात समशीतोष्ण असते. पावसाळ्यात येथे मुसळधार पाऊस पडतो परंतु डोंगराळ भाग असल्यामुळे कुठेही पाणी साचून राहत नाही.भातशेती, नागली शेती ह्या मुख्य व्यवसायासोबत हापूस आंबा, रातांबा, काजू, फणस ह्यांचे येथे मुबलक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कुक्कुटपालन, बकरी पालन, दुग्ध व्यवसाय हे जोडधंदे सुद्धा केले जातात.
लोकजीवन
[संपादन]मुख्यतः वाणी, कुणबी समाजातील लोक येथे पूर्वीपासून स्थायिक आहेत. येथील वाणी समाजातील लोकांची फार काळापासून मुंबई, रत्नागिरी,लांजा येथे किराणा सामानाची दुकाने आहेत. शेट्ये आडनाव असलेले लोक हे मूळचे वाकेडचे म्हणून ओळखले जातात. हे मेहनती, कष्टाळू,तसेच व्यवहारी म्हणून प्रसिद्ध आहेत.श्री रामफंड, वाकेड ही संस्था दरवर्षी रामनवमी उत्सव आयोजित करते.ह्या उत्सवाला २००२ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली.[१].
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
नागरी सुविधा
[संपादन]लांजा बस स्थानकातून राजापूर, पाचळ, ओणी, झर्ये कडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस वाटूळ तिठ्यावर थांबतात. येथे पाणी पुरवठा विहीर, झरे, पर्हे मधून होतो. जवळची बाजारपेठ लांजा आहे.
संदर्भ
[संपादन]१. https://www.census2011.co.in/census/state/maharashtra.html
२. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
- ^ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई, संवाद पुरवणी रविवार २५ एप्रिल २०२१