हरिकेन डॅनियल (२००६)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चक्रीवादळ डॅनियल (२००६) या पानावरून पुनर्निर्देशित)
पीक तीव्रतेच्या जवळपासच्या चक्रीवादळ डॅनियलचा उपग्रह लूप

हरिकेन डॅनियल हे पॅसिफिक चक्रीवादळ त्या हंगामातील सर्वात जोरदार वादळ होत. हे त्या मोसमातील नाव दिलेले चौथे वादळ होते. डॅनियलची सुरुवात १६ जुलै रोजी मेक्सिकोच्या समुद्रकिनाऱ्यावर उष्ण कटिबंधाच्या लाटांमुळे झाला. हे चक्रीवादळ पश्चिमेला सरकत २२ जुलै रोजी १५० मीटर्स (२४० किमी / ताशी)च्या वेगाने सातत्याने तीव्र होत गेले. त्यावेळी याची वैशिष्ट्ये चक्रीवादळांसारखी बनली. डॅनिअल हळूहळू कमकुवत होत होतं कारण त्याला थंड पाणी तापमान आणि वाढलेले विरुद्ध वारे कारणीभूत होते. मध्य पॅसिफिक महासागरात गेल्यानंतर दोन दिवसानंतर म्हणजे २६ जुलै रोजी ते पूर्णतः शमले. आरंभिक अंदाजानुसार हे हवाई बेटांमधील उष्णकटिबंधीय वादळ असेल अस वाटले होते. वादळामुळे हवाई आणि माउइ बेटावर पाऊस पडत होता, ज्यात किंचित पूर आले, तरीही मोठे नुकसान झाले किंवा मृत्यू झाल्याचे आढळले नाही