नागलीचे पापड
Appearance
साहित्य
[संपादन]कृती
[संपादन]नाचणी रात्री धुऊन त्याची पुरचंडी बांधून ठेवावी, दुसऱ्या दिवशी पुरचुंडी सोडून नाचणी चांगली सावतील सुकल्यावर दळावी. नंतर ते पीठ वस्त्रगाळ करून घ्यावे. जेवढे पेले पीठे असेल तेवढे पेले पण गॅसवर उकळत ठेवावे. पाण्यामध्ये वरील सर्व मसाला घालावा. पाण्याला उकळी आल्यावर नाचणीचे पीठ त्यात थोडे थोडे टाकावे आणि पिठाची उकड करावी. तेलाचा हात लावून पीठ चांगले मळून घ्यावे. त्यानंतर प्लॅस्टिक कागद खालीवर घालून पोळपाटावर छोटे छोटे पापड लाटावे आणि नंतर सावतील वाळवावेत. पापड ऐवजी लाटीला चिरल्यास नाचणी चिप्स तयार होतील. चिप्स छोटे असल्याने वाहतुकीस आणि तळण्यास सोपे जातात आणि पॅकिंगही सहजपणे चांगले करता येते.