पर्जन्यमापक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Standard NOAA rain gauge

पर्जन्य मापनाचा इतिहास कौटिल्यापासून सुरू होतो. त्यांच्या अर्थशास्त्रात तसा उल्लेख आहे.प्रगत साधनांचा इतिहास पाचशे वर्षांपूर्वीपासून सुरू होतो. आधुनिक साधने विकसित होण्यापूर्वी दगडापासून पर्जन्यमापक यंत्र तयार केले जाई. तीन फूट व्यासाचा आणि दहा फूट उंचीचा दगड तयार केला जात असे. वरच्या बाजूला उखळासारखा आकार दिला जात असे. कमीत-कमी बाष्पीभवन व्हावे व पर्जन्य वापरण्यात अचूकता यावी यासाठी वरचा भाग निमुळता ठेवला जाई. उखळासारख्या या आकाराच्या तळाशी एक छिद्र असे. हे छिद्र चिखल व लाकडी पट्टी लावून बंद करता येत असे. असे तयार झालेले यंत्र जंगलात शेत शिवारात सहसा दृष्टिपथात येणार नाही अशा ठिकाणी खोल खड्डा खणून रोवले जाईल. पाऊस पडत असताना या वर्तुळाकार तोंडातून पाणी आत जाई. या साठलेल्या पावसाच्या पाण्याचे दैनंदिन किंवा साप्ताहिक मोजमाप केले जाई व खालच्या छिद्रातून पाणी सोडून दिले जाई. पुन्हा नव्या दिवशी नवे पावसाचे पाणी आल्यानंतर त्याचे मापन केले जाई. पूर्वीच्या काळी आधुनिक सीजीएस किंवा एमकेएस पद्धतीची परिमाणे नसल्यामुळे त्यावेळच्या चिपटे,मापटे, शेर, पायली या परिमाणात पावसाचे मोजमाप होत असे. पंचांगात या परिमाणानेच पावसाचे मोजमाप केल्याचे आजही वाचनात येते. माझ्या पाहण्यात पोहाळे तर्फ आळते, ता पन्हाळा, जि कोल्हापूर येथे असे पर्जन्यमापक यंत्र आहे ते जखिन या नावाने ओळखले जाते. कर्नाटक राज्यातील हुकेरी तालुक्यातील स्तवनिधी घाटानजीक असणाऱ्या बुगटे आलुर येथेही असे यंत्र रस्त्याच्या बाजूला पडलेले मी पाहिलेले आहे.चंद्रकांत निकाडे. सर्व ठिकाणच्या दैनंदिन पर्जन्यमापात एकसूत्रता आणून त्यांची तुलना करणे सोपे जावे म्हणून जो प्रमाणित पर्जन्यमापक बहुतेक सर्वत्र वापरतात. पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर प्रति चौरस मीटर ( litres per square meter) किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो. यात मेट्रिक पद्धतीत ‘मिलीमीटर’ तर ब्रिटीश पद्धतीत ‘इंच’ हे देखील एकेक वापरले जाते. पाऊस मोजण्यासाठी लागणारी यंत्र काहीशी वेगवेगळी असू शकतात.आपल्या देशातील सर्व भागांत साधारणत: वर्षांतील पावसाळ्याच्या चार-साडेचार महिने पाऊस पडतो. जून ते ऑक्टोबर हा पावसाचा कालावधी असतो. उत्तर भारतात हिमालयाच्या डोंगररांगावर पाऊस हिमवर्षांवच्या स्वरूपातदेखील पडतो. पाऊस हा पाण्याचा उगम असल्यामुळे पाण्याच्या मोजणीचा विचार करीत असताना पावसाची मोजणीविषयी समजून घेणेही आवश्यक आहे.पावसाच्या मोजणीचे एकक हे मेट्रिक सिस्टीममध्ये मिलिमीटर तर ब्रिटिश सिस्टीममध्ये इंच (एक इंच म्हणजे २५.४ मिलिमीटर) आहे. बर्फाच्या स्वरूपातील पावसाची मोजणीदेखील याच एककात केली जाते. पावसाची मोजणी ही पर्जन्यमापकाच्या मदतीने केली जाते. पर्जन्यमापक हे साधारणत: रेकोर्डिंग आणि नॉन रेकोर्डिंग अशा दोन प्रकारांत असतात.

प्रकार[संपादन]

रेकोर्डिंग पर्जन्यमापक- हे यंत्र स्वयंचलित असून याद्वारे नक्की किती पाऊस पडला याचा विश्वासार्ह अंदाज लावता येतो. पावसाचे पाणी भांड्यात जमा केले जाते आणि पडणाऱ्या पावसाच्या तीव्रतेतून माहिती गोळा केली जाते. रेकोर्डिंग पर्जन्यमापक हे स्वयंचलित असून; त्यामध्ये घडय़ाळावर चालणारा ड्रम, त्यावर बसवलेले आलेखपत्र (ग्राफ) आणि त्यावर आलेखन करणारी पेन्सिल, इत्यादींचा समावेश असतो. पडलेला पाऊस आलेखपत्रावर आपोआप वाचता येतो. या पर्जन्यमापकावर ठरावीक कालावधीत पडलेला पाऊस, तसेच पावसाची तीव्रतासुद्धा (मिलिमीटर/तास) मोजता येते. या पर्जन्यमापकाद्वारे पंधरवडय़ाचा एकूण पाऊसही मोजता येतो; म्हणूनच डोंगरदऱ्यांच्या दुर्गम भागात याचा वापर सोयीचा होतो. या उपकरणाच्या वापरासाठी माणसाची गरज नसते.

  1. टिपिंग बकेट रेन-गेज
  2. ध्वनिद्वारे पर्जन्यमापन
  3. ऑप्टीकल रेन गेज

नॉन रेकोर्डिंग पर्जन्यमापक- नॉन रेकोर्डिंग पर्जन्यमापक हे अगदी साधे सोप्पे यंत्र असून याद्वारे निश्चित असं प्रमाण सांगता येत नसलं, तरी पाऊस किती पडला असेल याचा एक अंदाज बांधता येतो. ही पद्धती भारतात मोठ्या प्रमाणात वापरता येते. या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ म्हटलं जातं. नॉन रेकोर्डिंग पर्जन्यमापक हे फार सोपे आणि साधे उपकरण आहे. भारतामध्ये मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ या नावाने ओळखले जाते. हे पर्जन्यमापक जमीन पातळीवर पक्के बसवलेले असते. दररोज सकाळी आठ वाजता पर्जन्यमापकाच्या बाटलीत जमा झालेला पाऊस प्रमाणित मोजपात्राद्वारे मिलिमीटर वा इंचामध्ये मोजला जातो. या पर्जन्यमापकाद्वारे मागील २४ तासांतील पडलेल्या पावसाची उंची मोजता येते. पाऊस जमा करणारी बाटली साधारणत: १०० मिमी व्यासाची असते आणि ती १०० ते १२५ मिमी पाऊस जमा करते. मोठय़ा पावसाच्या कालावधीत दिवसातून तीन -चार वेळा मोजणी करावी लागते.

संदर्भ[संपादन]

https://www.bobhata.com/lifestyle/how-rainfall-measured-1195

http://mr.vikaspedia.in/rural-energy/90a93094d91c93e-915936940-935-915941920947-93593e92a93093e932/92a93094d91c92894d92f93890292793e930923/92694892890292693f928-92a93094d91c92894d92f92e93e92a915

https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-science-education-rain-measurement-unit-4315532-NOR.html