सर्गेई इव्हानोविच वाव्हिलोव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर्गेई इव्हानोविच वाव्हिलोव्ह (रशियन:Серге́й Ива́нович Вави́лов;२४ मार्च, १८९१:मॉस्को, रशिया - २५ जानेवारी, १९५१:मॉस्को, सोवियेत संघ) हे सोवियेत भौतिकशास्त्रज्ञ होते. हे १९४५पासून मृत्यूपर्यंत रॉसीस्काया अकादेमिया नाउकचे अध्यक्ष होते.

त्यांनी पावेल चेरेंकोव्हबरोबर वाव्हिलोव्ह-चेरेंकोव्ह परिणामाचा शोध लावला. याबद्दल चेरेंकोव्ह यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. काशा-वाव्हिलोव्ह नियम हा सर्गेई वाव्हिलोव्ह यांच्या नावे आहे.

वाव्हिलोव्ह यांनी गॅलिलियो, लुक्रेटियस, न्यूटन, मिकाइल लोमोनोसोव्ह आणि मायकेल फॅराडे यांसह अनेक शास्त्रज्ञांच्या कार्यावर आणि जीवनावर पुस्तके लिहिली.

सर्गेई वाव्हिलोव्ह यांचे भाऊ निकोलाई वाव्हिलोव्ह जनुकशास्त्रज्ञ होते.