चर्चा:संभाजी भिडे
संदर्भ जोडणे
[संपादन]संदर्भ जोडण्या करीत सहायता हवी कृपया तसे करणे Yogesh Khandke (चर्चा) ०७:४०, २३ जानेवारी २०१८ (IST)
विधाने
[संपादन]युट्यूबवर अनेक व्यक्तींची अशी चिथावणीखोर भाषणे,निवडक तुकडे उपलब्ध आहेत.ते संदर्भ म्हणून वापरणे विकीच्या नियमात बसत नाही.जाणकारांनी मार्गदर्शन करावे. ज्ञानकोशात अशा गोष्टींची भर घालण्याने चुकीचे पायंडे पडतील असे वाटते.आपली मते पसरविण्यासाठी या माध्यमाचा वापर केला जाईल. शिवाय साध्य काय होईल?
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:२३, २७ मार्च २०१८ (IST)
- भिडे यांची चिथावणीखोर विधाने चित्रलेखा च्या दिनांक ०५ फेब्रुवारी २०१८ च्या अंकात पान क्रमांक २० ते २३ वरील दीर्घ लेखात आलेली आहेत. प्रसाद साळवे (चर्चा) २२:२०, २९ मार्च २०१८ (IST)
- स्रोतातील माहिती खरी असली तरी आपण येथे नमूद करताना विकी मार्गदर्शक तत्वांचे (खालील साचे पहा) पालन होते आहे का याचा विचार व्हायला नको का? अन्यथा ज्ञानकोश हा विधाने,मते,घोषणा इ.चा साठा म्हणून वापरला जाईल असे वाटते. आपण तारतम्य सोडता कामा नये.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:२८, ३० मार्च २०१८ (IST)
ऐतिहासिक व राष्ट्रीय व्यक्तींबद्दल तसेच संविधानाच्या एका महत्त्वाच्या तत्त्वावरील भिडेंची वादगस्त विधाने तुम्हाला सामान्य वाटतात का? येथे फक्त अशाच विधानांचा समावेश आहे, सध्याचे राजकारणी व इतरांवर केलेल्या टिकांचा येथे समावेश नाही. --संदेश हिवाळेचर्चा ११:२७, ३० मार्च २०१८ (IST)
- इथे मला काय वाटते, तुम्हाला काय वाटते हे महत्वाचे नाही.अशा अनेक आक्षेपार्ह विधानांच्या याद्या अनेक व्यक्तींच्या चित्रफिती पाहून त्या त्या लेखात येणे योग्य आहे असे तुम्हाला खरंच वाटते का? तटस्थपणे व्यक्तिगत अभिनिवेश बाजूला ठेवून विचार करावा ही विनंती. मी पुन्हा म्हणतो - स्रोतातील माहिती खरी असली तरी आपण येथे नमूद करताना विकी मार्गदर्शक तत्वांचे (खालील साचे पहा) पालन होते आहे का याचा विचार व्हायला हवा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:५१, ३० मार्च २०१८ (IST)
- मुद्दामहून चिथावणीखोर विधाने येथे उद्धृत करू नये.
- चिथावणीखोर विधाने केली असतील तर चिथावणीखोर विधाने केली आहेत असे लिहून संदर्भ द्यावे.
- विषयास थेट पूरक असलेली विधाने द्यावीत परंतु अपवादानेच.
- अभय नातू (चर्चा) २२:२८, ३० मार्च २०१८ (IST)
जन्म नाव
[संपादन]जोडलेला संदर्भ पहा.मुलाखतीत भिडे हे आपले जन्म नाव संभाजी भिडे असे सांगतात. हा प्राथमिक स्रोत आहे.दुसरे नाव येथे नमूद करण्यासाठी विश्वसनीय संदर्भ हवा असे वाटते.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०७:५८, २८ मार्च २०१८ (IST)
संभाजी भिडे यांचे नाव संभाजी नसल्याचा पुरावा द्या.. Vipul dhavan (चर्चा) ०१:३२, ३ जून २०१८ (IST)
सुरक्षित करावा
[संपादन]@संतोष दहिवळ: सर, या लेखात अनामिक सदस्य मोठ्या संख्येने करत असल्यामुळे सदर लेख सुरक्षित अथवा अर्धसुरक्षित करावा ही विनंती. प्रसाद साळवे (चर्चा) २१:३१, २९ मार्च २०१८ (IST)
हेही पहा
[संपादन]प्रा. माधव रामचंद्र भिडे
[संपादन]पुणे विद्यापीठात इ.स. १९७० ते १९७९ या काळात प्रा. माधव रामचंद्र भिडे नावाचे फिजिक्सचे खातेप्रमुख होते.(ते १९९४मध्ये वारले.) त्या काळात संभाजी भिडे तेथे असल्याचे माहीत होत नाही. कदाचित ते तेथे नसावेतच. पहा : प्रो भिडे ... ज (चर्चा) २२:१३, २९ मार्च २०१८ (IST)
महत्वाचा मुद्दा आहे, अधिक माहिती शोधण्याचा प्रयत्न करू.--संदेश हिवाळेचर्चा २२:२८, २९ मार्च २०१८ (IST)
पुराव्यांच्या कागदांची रद्दी आहे..अधिक माहिती हवी असेल तर ती सांगली मध्ये मिळेल Vipul dhavan (चर्चा) ०१:३८, ३ जून २०१८ (IST)
लेखात सुधारणा
[संपादन]- कुठल्याही लेखाला संदर्भ देताना कृपया विडीयोचे संदर्भ देण्यापेक्षा लिखीत मजकूराचे (संशोधन निबंध/बातम्या/पुस्तके इ.चे) संदर्भ द्यावेत. युट्यूब विडीयोचे संदर्भ ग्राह्य धरता येत नाहीत.
- प्रचारकी/जाहिरातबाजीचे लिखाण काढून टाकले पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही विचारश्रेणीचे (ह्या ठिकाणी हिंदू उजव्या विरुध्द पुरोगामी असे उघड संपादनयुध्द होत आहे.) असेल तरीही ते काढलेच पाहिजे. असा सर्वच विकीवर नियम आहे.
- वादग्रस्त विधाने जर मोठ्या ऐतिहासिक घटनेला कारणीभूत ठरली असतील तर त्यांना अवतरणात आणि वैध संदर्भासहित जोडता येईल.
- भिडेंच्या व्याख्यानाची यादी येथे देणे उचीत नाही, त्यामुळे ती काढली आहेत. WikiSuresh (चर्चा) ०२:३८, ३१ मार्च २०१८ (IST)
संभाजी भिडे यांचे नाव संभाजी भिडेच आहे नसल्यास पुरावानद्या Vipul dhavan (चर्चा) ०१:३०, ३ जून २०१८ (IST)4
ज द्वारे नकल-डकव
[संपादन]ज यांना नकल-डकव मधून काही उसंत मिळत नाही. ज यांनी परत एकदा लोकसत्ता मध्ये दोन दिवसांपुर्वी आलेल्या लेखातून सरळ मजकूर नकल-डकव केला आहे, शिवाय तो मजकूर पहाता त्याची विश्वकोशात आणि तो नकल-डकव करणाऱ्या सदस्याची विकीवर नक्की काय आवश्यकता आहे हे मला पामराला तरी कळत नाही. WikiSuresh (चर्चा) १९:०२, १४ जून २०१८ (IST)
- झाले. +ताकीद देण्यात आली आहे. Special:diff/1601826 --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २०:५३, १४ जून २०१८ (IST)